Online Land Record
Online Land Record System 2023 जमिनीचा सातबारा डिजिटल स्वरूपात मिळेल पण त्यासाठी तलाठी ऑफिसला चकरा मारायची आणि ते मागतील तितके पैसे देण्याची गरज नाही गरज आहे ती फक्त जमिनीच्या माहितीची जसे गट नंबर, सर्वे नंबर, जर असेल तर फक्त पाच मिनिटातच ओरिजनल आणि कायदेशीर मान्यता असलेला सातबारा मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये डाऊनलोड करता येतो.
सातबारा कसा डाऊनलोड करायचा
- Online Land Record System 2023 भुलेख नावाने महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ज्यावर मोबाईल किंवा लॅपटॉप वर ओपन करा वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे.
- या वेबसाईटवर दोन प्रकारचे दस्तऐवज मिळतात एक ज्यांना शासकीय मान्यता नाही कारण ते स्वाक्षरीत नसतात आणि त्यांचा उपयोग फक्त माहिती तपासण्यासाठी केला जाऊ शकतो कारण इथे पैसे द्यावे लागत नाही.
- आणि दुसरे दस्तऐवज ज्यावर अधिकृत स्वाक्षरी असते ज्याला डिजिटल साईन म्हणतात कागदपत्र कायदेशीर रित्या कोणत्याही सरकारी कामासाठी वापरले जाऊ शकतात.
- कारण इथे छोटी फी भरावी लागते आणि जेव्हा तलाठी ऑफिस मध्ये जातो त्यावेळी ते सांगतील ती रक्कम द्यावे लागते तर छोटी फी किती असेल ते खली पाहा.
- या वेबसाईटवर अमरावती, औरंगाबाद ज्याला आता छत्रपती संभाजीनगर असे म्हणतात ,कोंकण, नागपूर, नाशिक, आणि पुणे या सहा विभागातील जमिनीची माहिती मिळू शकते.
कायदेशीर मान्यता असलेला सातबारा कसा मिळवायचा
Online Land Record System 2023 डिजिटल साईंड सातबारा
- सातबारा काढण्यासाठी डीजिटल साईड सातबारा या सर्कल वर क्लिक करा नंतर आलेल्या स्क्रीनवर नवीन युजर रजिस्ट्रेशनने अकाउंट तयार करून किंवा ओटीपी बेस्ट लॉगिन च्या साह्याने लॉगिन करा.
- त्याठिकाणी बॉक्सवर क्लिक करा आणि मोबाईल नंबर टाईप करून सेंड ओटीपी बटन क्लिक करा आलेला ओटीपी टाईप करून वेरिफाय बटनवर क्लिक करा.
- एक डिजिटल साईन सातबारा डाऊनलोड करण्यासाठी पंधरा रुपये फी भरावी लागते यासाठी खाते रिचार्ज अकाउंट किंवा त्याठिकाणी खाली दिलेले बटन क्लिक करून रिचार्ज करा.
- या खात्यात पंधरा रुपये ते एक हजार रुपयांच्या दरम्यान कोणतेही रक्कम भरून या दोन गेटवेच्या सहाय्याने खाते रिचार्ज करता येते.
सातबारा उतारा ऑनलाईन कसा पाहावा
- Online Land Record System 2023 रक्कम भरा आणि गेटवे सिलेक्ट करून नाव बटन क्लिक करा यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आणि यूपीआय यापैकी एका ऑप्शन चा वापर करून पेमेंटची प्रोसेस पूर्ण करू शकता.
- या पेजवर आल्यावर पहिले जिल्हा, तालुका,आणि त्या तालुक्यातील गावाचे नाव कोणते ते निवडा नंतर अंकित सात बारा ऑप्शनवर क्लिक करून त्याखाली सर्वे नंबर किंवा गट नंबर एंटर करा.
- ज्यामुळे सर्वे नंबर व गट नंबरची एक लिस्ट दिसेल त्यातून पुन्हा योग्य तो गट नंबर आणि सर्वे नंबरचे कॉम्बिनेशन निवडा.
- जो सर्वे नंबर निवडला असेल त्यासाठीचा सातबारा कोणत्या तारखेला आणि किती वाजता स्वाक्षरी झाला आहे त्या माहितीचा बॉक्स स्क्रीनवर दिसेल त्यावर क्लिक करा आणि डाउनलोड बटन क्लिक करा
- खात्यातील बॅलन्स मधून पंधरा रुपये कापले जाइल त्यानंतर त्या मॅसेजवर ओक क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर कायदेशीर मान्यता असलेला डिजिटली साईंड सातबारा पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड केला जाईल तो प्रिंट करता येतो कोणासोबतही शेअर करता येतो आणि कुठल्याही सरकारी काम करिता वापरता येतो.
- आणि या वेबसाईटवरून आठ अ उतारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, सर्व कागदपत्र डाऊनलोड करता येतात.
- प्रत्येक कागदपत्र डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती आणि त्यासाठी लागणारी फी वेगवेगळी असते.
Fraud in land record 2023 :फसवणुकीने करून घेतलेला खरेदी दस्त कसा रद्द करावा?
Land Record 2 2023 : वडिलोपार्जीत प्रॉपर्टी ची विक्री होऊ नये म्हणून काय करावे?
3 Responses