Property Purchasing Tips
Property Purchasing Tips एखाद्या सातबारा उताऱ्यावर इतर हक्कमध्ये एखाद्या नाव असणे याचा अर्थ असा होतो त्या प्रॉपर्टी मध्ये त्या व्यक्तीला मालकी हक्क नसला तरी काही ना काही हक्क असतो. जर एखादा संरक्षित कुळ हा कृषक दिनाच्या अगोदर किंवा कृषक दिनापासून एक एप्रिल 1957 पासून एखादी जमीन कुळ या नात्याने वही वाटत असेल तर त्याला त्या प्रॉपर्टीचे मानिव खरेदीदार मानले जाते.
आणि अशा कुळने तहसीलदार समोर कुळ कायदा कलम 32 ग अन्वये ती प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी अर्ज केला की तहसीलदार साहेब त्या कुळाला ती प्रॉपर्टी खरेदी करून देतात.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
वनरक्षक भरती जाहिरात २१३८ व्याकंसी करिता होणार पद भारती?
अधिकारात कुळाचे नाव असलेली जमीन
- Property Purchasing Tips जर मूळ मालकाकडून खरेदी केली आणि नंतर त्या कुळाणे कुळ कायदा कलम 32 ग अन्वये
- प्रॉपर्टी मूळ मालकाकडून खरेदी करण्यासाठी तहसीलदारांना अर्ज दिला आणि ती प्रॉपर्टी तहसीलदार साहेबांनी त्या कुळाला खरेदी करून दिली तर ती प्रॉपर्टी खरेदी करून तसा मालकी हक्क प्राप्त होणार नाही.
- कारण ती प्रॉपर्टी खरेदी करण्याचा कुळाचा हक्क कुळाने बजावलेला असतो त्यामुळे जर सातबारा उताऱ्यावर इतर हक्कांमध्ये कुळाचे नाव पाहीले तर दोन गोष्टी पाहणे गरजेचे आहे.
- हक्कांमध्ये कुळाचे नाव का पाहणे गरजेचे आहे.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरुवात?
Property Purchasing Tips प्रॉपर्टीचे कुळ
- 1)
- कुळ एक एप्रिल 1957 पासून त्या कुळ या नात्याने वहिवाट करतो आहे का?
- आणि आता त्या जमिनीवर मूळ मालकाची वहिवाट आहे का त्या कुळाची वहिवाट आहे.
- 2)
- ज्यामध्ये कुळाने 32 ग अन्वये प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे आणि त्या कुलाकडून ती प्रॉपर्टी खरेदी करत असाल.
- या प्रकारांमध्ये अत्यंत कमी जोखीम पहायला मिळेल कारण प्रॉपर्टी कुळाने 32 गं अन्वये खरेदी केलेली असते.
- त्या कुळाला त्या प्रॉपर्टी मध्ये खरेदीने मालकी हक्क प्राप्त झालेला असतो आणि त्यामुळे त्या खरेदीदार कुळा सोबत तसा खरेदीचा व्यवहार करणार असाल तर त्यामध्ये काहीच अडचण येणार नाही..
- जी प्रॉपर्टी कुळाणे 32 ग चा आदेश प्राप्त करून मूळ मालकाकडून खरेदी केलेली असते ती प्रॉपर्टी खरेदी घेऊ शकता.
- परंतु अशी प्रॉपर्टी खरेदी घेण्या अगोदर काही महत्त्वाच्या आणि कायदेशीर बाबी लक्षात घेणे आवश्यक राहतील.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय
प्रॉपर्टी खरेदी करण्या अगोदरच्या बाबी
- Property Purchasing Tips जस कुळ कायद्याची जमीन खरेदी करण्या अगोदर एखादी परवानगी सक्षम अधिकारी यांकडून घेणे आवश्यक आहे का?
- जर काही कारणास्तव ती प्रॉपर्टी वर्ग दोन मध्ये मोडत असेल तर तिची वर्ग एक मध्ये रूपांतरण करणे आवश्यक राहील.
- ज्या कुळाने ती प्रॉपर्टी खरेदी केली आहे त्याच्या सह हिसेदरणपैकी कोणाचा त्या प्रॉपर्टी मध्ये हक्क हितसंबंध आहे का?
- कारण कधी कधी प्रॉपर्टी चे 32 ग एकाच व्यक्तीच्या नावे होते परंतु त्या 32 ग च्या खरेदीसाठी जे पैसे भरलेले असतात ते पैसे त्या व्यक्तीने त्या एकत्र कुटुंबातील मिळकती मधूनच भरलेले असतात.
- आणि अश्या प्रॉपर्टी मध्ये त्या खरेदी दाराच्या कुटुंबांमधील अन्य हिस्सेदारांचे त्या प्रॉपर्टी मध्ये हक्क हितसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- त्यामुळे जी प्रॉपर्टी 32 ग अन्वये एखाद्या कुळाने खरेदी केलेली असते ती प्रॉपर्टी खरेदी करू शकता.
- परंतु ती खरेदी करण्या अगोदर काही कायदेशीर बाबी लक्षात घेणे आवश्यक राहतात.
- एखाद्या प्रॉपर्टीवर इतर हक्कात कुळाचे नाव आहे परंतु तो कुळ कोठे आहे किंवा त्याची वारस कोठे आहे.
- हे मूळ मालकाला किंवा कोणालाच माहिती नाही आणि प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्याबाबत काय करता येईल.
- अशा अनेक प्रॉपर्टी असतात की ज्यामध्ये कुळ बेपत्ता असतो किंवा त्या कुळाबाबत किंवा त्या कुळाच्या वारसांबाबत कोणालाच काहीच माहिती नसते.
- तरी याबाबतीत कायदा अगदी स्पष्ट आहे अशी प्रॉपर्टी घेण्याअगोदर त्या जमिनीवरील कुळ तहसीलदार साहेब यांच्या समोर अर्ज देऊन.
- बेधखल करावे लागेल किंवा ते कोण नष्ट करून घ्यावे लागेल त्यानंतर प्रॉपर्टी खरेदी करता येईल.
Matritva Vandana Yojana महिलाओं के लिये खुशखबर! मिलेंगे पूरे 6000 रुपये, सरकार ने किया ऐलान…
Election Commission Department 2023 :मतदान कार्डची सर्व कामे आता घरबसल्या करा
One Response