kanda chal anudan yojana 2023
kanda chal anudan yojana 2023 कांदाचाळीसाठी लोखंड, सिमेंट, जाळीचा अधिक वापर होतो. गेल्या दीड वर्षांपासून लोखंडासह सर्वच साहित्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे साधारण ५ टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी किमान ३ लाखांचा खर्च येतो. शासन मात्र दहा वर्षांपूर्वी निश्चित केलेल्या १ लाख ७५ हजार रुपये गृहीत धरूनच अनुदान देते. अनुदान वाढीबाबत चर्चा सुरू होती.
मनरेगा वैयक्तिक लाभाच्या योजना, लाभ घेण्याचे आवाहन
दरवाढीचा उभारणीवर परिणाम
- kanda chal anudan yojana 2023 दीड वर्षापूर्वी येथील कृषी उपसंचालक रवींद्र माने यांच्यासह राज्यातील काही अभ्यासू अधिकाऱ्यांकडून लागणाऱ्या खर्चाबाबत कृषी विभागाने अहवाल मागितला होता.
- मात्र त्यावर अजून काहीच निर्णय नाही त्यामुळे वाढत्या दराचा कांदाचाळ उभारणीवर परिणाम होत आहे.
- राज्यात दरवर्षी साधारण ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
- खरिपासह, लेट खरीप, रब्बीत आणि उन्हाळी हंगामात कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा भर असतो गेल्या वर्षी पाण्याची उपलब्धता चांगली होती.
- त्यामुळे दरवर्षीपेक्षा सुमारे २० टक्के अधिक क्षेत्रावर लागवड झाली होती. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे कांदाचाळ नाही. २५ टन क्षमतेच्या कांदाचाळसाठी ८७ हजार ५०० रुपये शासन अनुदान देते.
नमो शेतकरी योजनेमध्ये खूप मोठे बदल; पाहा काय आहे बदल?
kanda chal anudan yojana 2023 कांदाचाळींचे उद्दिष्ट (कंसात रक्कम)
- नाशिक : ५२५ (५ कोटी ४७ लाख),
- धुळे : ३८० (३ कोटी ३२ लाख ५० हजार),
- नंदुरबार : १९२ (१ कोटी ६८ लाख),
- जळगाव : १९० (१ कोटी ६६ लाख),
- पुणे : २७५ (२ कोटी ४० लाख),
- नगर : ५९० (५ कोटी १६ लाख),
- सोलापूर : २८६ (२ कोटी ५० लाख),
- छत्रपती संभाजीनगर ५९५ (५ कोटी २० लाख ६२ हजार),
- जालना : ४४० (३ कोटी ८५ लाख ५० हजार)
- बीड : ४४३ (३ कोटी ८७ लाख),
- लातूर : २८८ (१ कोटी ९९ लाख ५० हजार),
- नांदेड : १३२ (१ कोटी १५ लाख ५० हजार),
- परभणी : ३४० (२ कोटी ९७ लाख ५० हजार),
- हिंगोली : ६३ (५५ लाख १२ हजार),
- धाराशीव : ३३५ (२ कोटी ९३ लाख),
- अमरावती ८२ (७१ लाख ७५ हजार),
- अकोला : ११८ (१ कोटी ०३ लाख),
- वाशीम : ११८ (१ कोटी ०३ लाख),
- यवतमाळ : ९२ (८० लाख ५० हजार)
- बुलडाणा : १९० (१ कोटी ६६ लाख)
Crop Insurance Update 2023 :गेल्या हंगामातील विमा परताव्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरुच
CM Kisan Yojna नमो शेतकरी योजनेत होणार बदल, 2 हजार ऐवजी मिळणार 3 हजार रुपये