Salokha Yojana 2023
Salokha Yojana 2023 राज्यात जमिनीबाबत असंख्य वाद असून न्यायालयात सुद्धा खूप प्रकरणे प्रलंबित आहे. जमिनी बाबतचे वाद संपुष्टात येऊन समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा याकरिता राज्य शासनाकडून सलोखा योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
![Salokha Yojana 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
राज्याच्या गटशेती योजनेला रु.४ कोटी निधी उपलब्ध
“सलोखा योजना” नक्की काय आहे?
- Salokha Yojana 2023 राज्यात जमिनीबाबत असंख्य वाद असून न्यायालयात सुद्धा खूप प्रकरणे प्रलंबित आहे.
- जमिनी बाबतचे वाद संपुष्टात येऊन समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा याकरिता राज्य शासनाकडून सलोखा योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
- ही योजना कशी आहे ते समजून घ्या एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा प्रत्यक्ष ताबा हा दुसऱ्या शेतकऱ्याकडे
- आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा हा प्रत्यक्ष पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांची जमीन अदलाबदल दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री ही अत्यल्प फी आकारून सलोखा योजनेमधून करता येते.
- शेतजमीन कितीही असली तरी फक्त दोन हजार रुपयांमध्ये दस्त नोंदणी करून जमिनीची अदलाबदल सलोखा योजनेअंतर्गत करता येते.
![Salokha Yojana 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
वनरक्षक व्हायचंय ? लगेच करा अर्ज
Salokha Yojana 2023 मुद्रांक शुल्क व नोंदणी फी
- दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देणे बाबत हा जीआर प्रकाशित केलेला आहे.
अटी व शर्ती
- 1)
- Salokha Yojana 2023 सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यावाबतची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांचा राहील
- 2)
- सदर योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा तावा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षापासून असला पाहिजे.
![Salokha Yojana 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
लाभासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती
- Salokha Yojana 2023 तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गावातील पंचासह चौकशी करुन किंवा चतुर्सिमाधारकांशी चर्चा करुन किंवा तलाठी चावडीमध्ये चर्चा करुन.
- किंवा अदलाबदल करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचे किंवा चतुर्सिमा धारकांच्या घरी चर्चा करुन सदर ठिकाणी पहिल्याची मालकी असलेली जमीन किमान १२ वर्षापासून दुसऱ्याचे ताब्यात आहे किंवा कसे ?
- व दुसऱ्याची मालकी असलेली जमीन किमान १२ वर्षापासून पहिल्याचे ताव्यात आहे किंवा कसे ?
- याबाबतची नोंद विहित नमुन्यातील पंचनामा नोंदवहीमध्ये करावी.
- त्याआधारे तलाठी यांनी पक्षकारांना जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र द्यावे.
- एकूण चतुर्सिमा धारकांपैकी अधिकार अभिलेखात नावे असणाऱ्या कमीत कमी दोन (वेगवेगळ्या गटातील)
- सज्ञान व्यक्तीच्या सह्या पंचनामा नोंदवही मध्ये सगळ्यात एखाद्या गटाला चतुर सीमा धारक एकच गट असेल.
![Salokha Yojana 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
नुकसानभरपाई अनुदान असे वाटप होणार
Salokha Yojana 2023 अर्ज कोठे करावा?
- सलोखा योजनेमधून लाभ घेण्याकरिता अर्ज कशाप्रकारे करायचा व इतर माहिती सलोखा योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता अर्ज कोठे करावा.
- शेतजमींनच्या तलाठी कार्यालयाच्या हद्दीमध्ये येते तिथल्या तलाठ्याकडे सलोखा योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता अर्ज करावा लागतो.
- किंवा मंडळ अधिकारी यांकडे सुद्धा अर्ज हा करता येतो एक बाब महत्त्वाचे अशी आहे.
- की जमीन अदलाबदल झालेल्या दोन्ही शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता संमतीही आवश्यक आहे दोन्ही अर्जदाराचे नाव अर्जामध्ये नमूद असायला हवे.
![Salokha Yojana 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
उद्यापासून महाराष्ट्राला भिजवणार, पंजाबराव डख
कागदपत्रे
- Salokha Yojana 2023 दोन्ही शेतमालकाचे आधार कार्ड,
- दोन्ही शेत जमिनीचे सातबारा उतारे,
- दोन्ही शेत जमिनीचे नकाशे,
- दोन्ही शेतमालकाचे संमती पत्र,
- सलोखा योजनेअंतर्गत जमीन अदलाबदलीचा अर्जात हा उल्लेख केलेला असावा.
![Salokha Yojana 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
सरकारर्फे विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना
अर्ज सादर केल्यानंतर ची प्रक्रिया
- Salokha Yojana 2023 तलाठी यांकडे सलोखा योजनेअंतर्गत अर्ज सादर केल्यानंतर तलाठी कार्यालयाकडून अर्जात नमूद जमिनी बाबत पंचनामा तयार केल्या जातो.
- पंचनामा तयार करून अर्जदारांना जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र दिले जाते व अहवाल तयार केला जातो.
- त्यानंतर संबंधित अहवाल व पंचनामा प्रमाणपत्र दुय्यम निबंध कार्यालयाकडे सादर केल्या नंतर सलोखा योजनेमधून दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री ही अत्यल्प दरामध्ये दुय्यम निबंध कार्यालयाकडून केल्या जाते.