Maximum Investment In PPF
Maximum Investment In PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंट कोण उघडू शकत भारतातील कोणत्याही सज्ञान व्यक्तीला तसेच अल्पवयीन किंवा अस्वस्थ मनाच्या व्यक्तींच्या वतीने त्यांच्या पालकांना उघडता येते. परंतु हे अकाउंट संपूर्ण देशात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत एकदाच उघडता येऊ शकते.
अकाउंट डिपॉझिट आणि ठेव
- Maximum Investment In PPF कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजारांची ठेव किंवा डिपॉझिट आर्थिक वर्षांमध्ये करता येते.
- प्रत्येक आर्थिक वर्षात पन्नास रुपयांच्या पटीत कितीही इन्स्टॉलमेंट किंवा हप्त्यांमध्ये रक्कम जमा केली जाऊ शकते.
- जार पहिल्या महिन्यात पाचशे रुपये जमा केले आणि अकाउंट उघडले तर दुसऱ्या महिन्याला 300 रुपये तसेच तिसऱ्या महिन्यात दोनशे रुपये किंवा 250 रुपये असतील तर ते जमा करू शकतात.
- इथे पूर्ण वर्षात जास्तीत जास्त एक लाख 50 हजार जमा करू शकतात पोस्टातील हे पीएफ खाते कॅश किंवा चेकने उघडता येते
- जर चेकने उघडले तर ज्या तारखेला चेकची रक्कम सरकार खाते जमा होईल त्या दिवसापासून खाते सुरू करण्यात येईल.
- आणि खात्यामध्ये जमा रक्कम ही इन्कम टॅक्सच्या 80 C. Section अंतर्गत वजावटीसाठी म्हणजे डिडक्शन साठी पात्र असते याचा अर्थ या गुंतवणुकीचा आयकर वाचविण्याकरिता उपयोग करता येतो.
शेतकऱ्यांनो गाई किंवा म्हैशी खरेदी करा आणी 50 टक्के अनुदान मिळवा
Maximum Investment In PPF खात्यावर मिळणारे व्याज आणि इंटरेस्ट
- या खात्यामध्ये जमा रकमेवरील व्याज हे कॉटरली दर तीन महिन्यांनी वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार लागू होते.
- व्याज हे कॅलेंडर महिन्यासाठी पाचव्या दिवसाच्या शेवटी आणि महिन्याच्या शेवट या दरम्यान खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमेवर मोजले जाईल.
- तसेच प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यामध्ये जमा केले जाईल काही कारणामुळे खाते पोस्ट ऑफिस मधून बँकेत किंवा बँकेतून पोस्ट ऑफिस मध्ये ट्रान्सफर केले.
- तर त्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस खाते ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी व्याजाची रक्कम जमा केली जाईल आणि मिळणारे व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त म्हणजे टॅक्स फ्री असेल त्यावर कुठलाही टॅक्स लागू होणार नाही.
- जर दरवर्षी या पीपीएफ खात्यामध्ये लम्सम किंवा इन्स्टॉलमेंट 12500 महिना याप्रमाणे एक लाख 50 हजार रुपये जमा केले.
- आणि खात्याची मॅच्युरिटी आहे पंधरा वर्षे आणि त्यावर व्याज मिळणार आहे 7.1% (EPFO) प्रमाणे या खात्यावरही गरज असेल तर कर्ज मिळवता येते.
- जमा रकमेच्या पंचवीस टक्के पर्यंत कर्ज घेता येणार असून प्रत्येक आर्थिक वर्षात एकदाच घेऊ शकता तसेच पहिले घेतलेले कर्ज पूर्णपणे फेडल्याशिवाय दुसरे कर्ज घेता येणार नाही.
- जर कर्ज घेतल्यापासून पुढील 36 महिन्यांमध्ये ते परतफेड केली तर वार्षिक एक टक्का व्याजदर लागू होईल आणि 36 महिन्यानंतर कर्ज फेडले तर कर्ज दिल्याच्या तारखेपासून वार्षिक सहा टक्के व्याज आकारणी केली जाईल.
- ज्या वर्षी पोस्टात पीएफ खाते उघडले ते वर्ष सोडून पुढच्या पंधरा आर्थिक वर्षांमध्ये खाते परिपक्व म्हणजे मॅच्युअर होईल आणि खाते मॅच्युअर झाल्यानंतर हे तीन पर्याय असते.
नवीन घरकुल यादी आली, तुमच नाव पहा
मॅच्युरिटीचे प्रकार
- 1)
- Maximum Investment In PPF संबंधित पोस्ट ऑफिस मध्ये पासबुकसह खाते बंद करण्याचा फॉर्म सबमिट करून मॅच्युरिटीची संपूर्ण रक्कम घेऊ शकता.
- 2)
- अतिरिक्त डिपॉझिट शिवाय मॅच्युरिटीची रक्कम खात्यात ठेवू शकता ज्यावर पीपीएफ व्याजदर लागू होतो.
- त्याप्रमाणे केव्हाही पेमेंट घेता येऊ शकते किंवा प्रत्येक आर्थिक वर्षात एकदा पैसे काढता येऊ शकतात.
- 3)
- खाते मॅचवर झाल्यापासून एका वर्षात पुढच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ते एक्सटेंड करू शकतात म्हणजे वाढवू शकतात यासाठी संबंधित पोस्ट ऑफिस मध्ये पुन्हा फॉर्म भरून देणे आवश्यक असेल.
विड्रॉल किंवा पैसे काढणे
- ज्यावेळी खात्याला खाते उघडले ते वर्ष सोडून पाच वर्ष पूर्ण होतील त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षात एकदा खात्यातून पैसे काढता येऊ शकतात.
- पैसे काढण्याची रक्कम खात्यामध्ये क्रेडिटवर शिल्लक रकमेच्या 50% पर्यंत घेतली जाऊ शकते.
- जर 31 मार्च 2013 किंवा 31 मार्च 2016 यापैकी ज्या तारखेला कमी बॅलन्स किंवा शिल्लक असेल त्याच्या 50% रक्कम 2016-17 या आर्थिक वर्षात काढता येऊ शकते.
Maximum Investment In PPF खाते बंद करणे
- एखाद्या आर्थिक वर्षात पाचशे रुपये जी कमीत कमी डिपॉझिट रक्कम आहे ती नाही भरली तर पीपीएफ खाते बंद केले जाईल.
- बंद केलेल्या खात्यावर कुठलीही कर्जाची सुविधा मिळणार नाही खाते जेव्हापासून बंद झाले असेल.
- तर प्रत्येक डिफॉल्ट वर्षाकरिता मिनिमम डिपॉझिट अमाऊंट पाचशे रुपये आणि पन्नास रुपये डिफॉल्ट फी भरून खातेदारकाला त्याचे बंद झालेले खाते मॅच्युरिटीच्या पूर्वी पुन्हा सुरू करता येते.
- डेट ऑफ अकाउंट होल्डर जर खातेधारकाचा मृत्यू झाला तर खाते बंद केले जाईल आणि त्याच्या नॉमिनी किंवा वारसदाराला खात्यामध्ये पैसे जमा करण्याची परवानगी नसेल.
- मृत्यूमुळे खाते बंद होत असल्याने पीपीएफ चा व्याजदर ज्या महिन्यात खाते बंद होत आहे त्या महिन्यापर्यंत दिले जाते.
Tur Market Price Update 2023 :स्टाॅक लिमिटनंतरही तुरीचे भाव तेजीतच
Fertilizer Update 2023 :शेतकऱ्यांचा खतांचा खर्च कमी करणारी माहिती
One Response