Fertilizer Anudan 2023
Fertilizer Anudan 2023 शेतकऱ्यांना अनुदानित परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत फॉस्फेट आणि पोटॅश खताची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
शासनाचा मोठा निर्णय, आता मागेल त्याला योजना
रब्बी हंगाम
- Fertilizer Anudan 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2022 -23 साठी 1/1/2023 ते 31/3/2023 या कालावधीसाठी.
- नत्र, फॉस्फरस, पोटॅश आणि गंधक या विविध खतांसाठी पोषण आधारित अनुदान (NBS) दरामध्ये सुधारणा करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
- खरीप हंगाम 2023 साठी 1/4/2023 ते 30/9/2023 पर्यंतच्या कालावधीसाठी फॉस्फेट आणि पोटॅशियुक्त खतांसाठी पोषक तत्त्वावर आधारित अनुदानदारांना मान्यता दिली आहे.
- शेतकऱ्यांना आता या अनुदानाचा लाभ खत खरेदी करताना होणार आहे.
- फॉस्फेट आणि पोटॅश खतावरील अनुदान हे 1/4/2010 पासून पोषक तत्वावर आधारित अनुदान योजनेद्वारे नियंत्रित केले जाते.
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र
Fertilizer Anudan 2023 शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत 25 ग्रेट ची खते उपलब्ध
- Fertilizer Anudan 2023 शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत फॉस्फेट आणि पोटॅश खतासाठी युरिया 25 ग्रेट ची खते उपलब्ध करून देण्यासाठी
- सरकारने रब्बी हंगाम 2022-23 साठी 1/1/2023 ते 31/3/2023 या कालावधीसाठी पोषण आधारित अनुदान म्हणजेच एनबीएस दरामध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली असून.
- खरीप हंगाम 2023 साठी 1/4/2023 ते 30/9/2023 पर्यंतच्या कालावधीसाठी फॉस्फेट आणि पोटॅशियुक्त खतांसाठी पोषक तत्त्वावर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली आहे.
- शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे फॉस्फेट आणि पोटॅशियुक्त खते अनुदानित दारात देण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी सरकार खरीप हंगाम 2023 साठी एकूण 38 हजार कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे.
- हे अनुदान शेतकरी ज्यावेळी खत खरेदी करण्याकरिता जातो त्यावेळी त्या खताच्या गोणीवर आधीच किमती मधून वजा केलेले असते.
- अनुदान वजा करून शेतकऱ्याला खरेदी किंमत ही खताच्या गोणीवर दिलेली असते.
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे दुहेरी लाभ होणार असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानित परवडणाऱ्या.
- आणि वाजवी किमतीत डीएपी आणि इतर फॉस्फेट आणि पोटॅशियुक्त खतांची उपलब्धता सुनिश्चित होईल आणि फॉस्फेट आणि पोटॅशियुक्त खतावरील अनुदानाचे सुसूत्रीकरण देखील शक्य होईल.
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फॉस्फेट आणि पोटॅशियुक्त खतावर एकूण 38 हजार कोटी रुपयांचे अनुदान खरीप हंगामा करिता वितरित केले जाणार आहे.
Shet Rasta Niyam 2023 :शेतरस्ताची सातबाराला ईतर अधिकारात नोंद
One Response