Senior Citizen Earn Interest
Senior Citizen Earn Interest सीनियर सिटीजन सेविंग स्कीम कमीत कमी 1000 रुपये आणि 1000 रुपयांच्या पटीतच जास्तीत जास्त 30 लाख रुपये योजनेअंतर्गत एका व्यक्तीला सिंगल अकाउंट मध्ये जमा करता येते. आणि वैवाहिक जोडीदार पती किंवा पत्नी यांसोबतच जॉईंट संयुक्त खाते उघडता येते. ज्यामध्ये प्रत्येकाच्या नावे 30 लाख रुपये असे एकत्रित 60 लाख रुपये जमा करता येतात.
या अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे
Senior Citizen Earn Interest वयोमर्यादा
- खाते उघडताना खातेधारकाचे वय 60 वर्षाहून अधिक असणे गरजेचे आहे कारण ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच राबविले जाते.
- परंतु रिटायरमेंट बेनिफिट सेवानिवृत्तीचे लाभ जसे फंड ग्रॅच्युईटी इत्यादी मिळाल्याच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत गुंतवणूक सुरू करायची असेल.
- तर 55 ते 60 वर्षाच्या रिटायर्ड सिव्हिलियन एम्प्लॉईज आणि 50 ते 60 वर्षाच्या रिटायर्ड डिफेन्स एम्प्लॉईजला सुद्धा योजनेमध्ये सहभागी होता येते.
- खात्यामध्ये पैसे जमा करून केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायदा 1961 च्या सेक्शन 80C च्या अंतर्गत लाभ मिळवता येतो.
- ज्यानुसार जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम वजावटीसाठी क्लेम करता येते.
सिंगल अकाउंट मध्ये मॅक्सिमम लिमिट
व्याजदर
- Senior Citizen Earn Interest एक एप्रिल 2023 पासून नवीन 8.2% वार्षिक व्याजदर गुंतवणुकीवर दिला जात आहे व्याज दर तीन महिन्याला खातेधारकाच्या खात्यावर जमा केले जाते.
- आणि त्यासाठी ठराविक तारका दिल्या आहे म्हणजे पैसे जमा केल्याच्या तारखेपासून पहिल्यांदा 31 मार्च 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर या दिवशी.
- आणि त्यानंतर दरवर्षी 31 मार्च 30 जून 30 सप्टेंबर व 31 डिसेंबरच्या दिवशी व्याज खात्यावर जमा केले जाते.
- प्रत्येक तिमाहीला जमा होणारे व्याज खात्यातून काढले नाही तर व्याजाच्या त्या रकमेवर रक्कम खात्यात जमा आहे म्हणून कोणतेही अतिरिक्त व्याज दिले जात नाही.
- संपूर्ण आर्थिक वर्षभरामध्ये खात्यावर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम 50000 पेक्षा जास्त असेल तर त्यावर टीडीएस आकारला जाऊ शकतो.
- टीडीएस म्हणजे टॅक्स डिरेक्ट सोर्स जर फॉर्म 15h भरून जमा केला तर टीडीएस वाचवता येतो.
- फॉर्म 15g किंवा 15h काय आहे जर माहिती नसेल आणि ते जाणून घ्यायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.
Senior Citizen Earn Interest 5 वर्ष पैसे जमा ठेवल्यावर
- पाच वर्ष पैसे जमा ठेवून त्याद्वारे व्याज कमवता येते. पाच वर्षे पूर्ण झाल्यावर खाते मॅचअर होते आणि जमा रक्कम पुन्हा काढता येते.
- जर काढायची नसेल तर आणखी तीन वर्षांसाठी खाते वाढवता येते एक्सटेंड करता येते आणि त्यावेळी उपलब्ध व्याजदरानुसार पुढच्या तीन वर्षांसाठी व्याज कमवता येते.
- फक्त ज्या तारखेला पाच वर्षे पूर्ण होणार आहे त्या तारखेपासून एका वर्षाच्या आतच खाते एक्सटेंड करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अर्ज करता येतो त्यानंतर नाही.
- जर खातेधारकाचा मृत्यू झाला तर मृत्यू दिनांक पासून उर्वरित कालावधीसाठी योजनेचा नाही तर पोस्टाच्या बचत खात्याचे व्याजदर लागू होतात.
- कदाचित पती किंवा पत्नी सिंगल अकाउंट वर नॉमिनी असेल किंवा जॉईन खात्यावर खातेधारक असतील तर मूळ खातेदारकाच्या मृत्यूनंतर खाते सुरू ठेवता येते.
One Response