Stolen Mobile phone
Stolen Mobile phone मोबाइल हरवला अथवा चोरीला गेल्यास आपण बेचैन होते. अनेकदा पोलिसांत तक्रार करूनही मोबाइल मिळत नाही. मात्र, आता मोबाइल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास चिंता करण्याची गरज नाही. सरकार या आठवड्यात हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल फोन ‘ब्लॉक’ किंवा ट्रेस करण्यासाठी ट्रैकिंग सिस्टम सुरू करणार आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
हरवलेले मोबाइल ब्लॉक, ट्रेस करण्याचे तंत्रज्ञान केंद्र सरकार आणणार
- १७ मे रोजी जागतिक दूरसंचार दिनानिमित्त सरकार मोबाइल ब्लॉकिंग आणि ट्रैकिंग सिस्टम सुरू करणार आहे.
- केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव अधिकृतपणे संचार साथी पोर्टल (सीईआयआर) लाँच करणार आहेत.
- याद्वारे लोक चोरीला गेलेले किंवा हरवलेले फोन ब्लॉक आणि ट्रॅक करू शकतील.
- सेंटर फॉर डिपार्टमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) सध्या दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ईशान्य प्रदेशातील काही दूरसंचार कार्यालयांमध्ये या प्रणालीचा एक पायलट प्रकल्प चालवत आहे, जो आता संपूर्ण भारतात लागू करण्यात आले.
शासकीय वाळू मिळवा 600 रू. प्रती ब्रास
नेमका कुणाला फायदा?
- Stolen Mobile phone सीडॉटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष राजकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, मोबाइल ब्लॉकिंग आणि ट्रैकिंग सिस्टम भारतभर सुरु करण्यासाठी सज्ज करण्यात आली आहे.
- या तिमाहीत ती संपूर्ण भारतात आणली जाईल. ही प्रणाली लोकांना त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल ब्लॉक आणि ट्रॅक करण्यास सक्षम करेल.
Stolen Mobile phone तस्करीला आळा
‘सिस्टममध्ये एक अंगभूत यंत्रणा आहे जी मोबाइलच्या तस्करीलाही आळा घालेल. मात्र, ते कधी सुरू होणार, याची निश्चित तारीख त्यांनी दिलेली नाही.
रेशन कार्डचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरू
कसा शोधणार फोन?
- Stolen Mobile phone दूरसंचार ऑपरेटर आणि सीईआयआर सिस्टमला डिव्हाइसचा आयएमईआय नंबर आणि त्याच्याशी संबंधित मोबाइल नंबरची माहिती असेल.
- काही राज्यांमध्ये याचा उपयोग हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल फोन शोधण्यासाठी ही माहिती वापरली जाईल.
- ४.७०० लाख हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल या पोर्टलद्वारे ब्लॉक करण्यात आले आहेत.
- २.४० लाख + मोबाइल ट्रॅक करण्यात आले आहेत.
- ८,००० फोनही या पोर्टलद्वारे जप्त करण्यात आले आहेत.
- २,५०० + हरवलेले मोबाइल परत मिळवून मालकाच्या ताब्यात देण्यास कर्नाटक पोलिसांना या पोर्टलची मदत झाली.
आयएमईआय नंबर बदलला तरीही…..
- दूरसंचार नेटवर्कवर क्लोन केलेल्या मोबाइल फोनचा वापर शोधण्यासाठी सीडॉटने नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत.
- सध्या, गुन्हेगार मोबाइल चोरल्यानंतर मोबाइलचा आयएमईआय क्रमांक बदलतात, त्यामुळे मोबाइल ट्रैक किंवा ब्लॉक करता येत नाही.
- राजकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, हे पोर्टल आयएमईआय नंबर बदलल्यानंतरही डिव्हाइस ट्रॅक व ब्लॉक करण्यास सक्षम असेल.
काय बंधनकारक?
- Stolen Mobile phone सरकारने भारतात मोबाइल उपकरणांची विक्री करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख (आयएमईआय -१५ अंकी क्रमांक) उघड करणे बंधनकारक केले आहे.
- मोबाइल नेटवर्कमध्ये त्यांच्या नेटवर्कमध्ये अनधिकृत मोबाइल फोन प्रवेश शोधण्यासाठी मंजूर आयएमईआय क्रमांकांची सूची असेल.
PM Kissan Schemes 2023 :शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपयेचा हप्ता होणार या दिवशी जमा
Panchayat Samiti Yojana 2023 :पहा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात
4 Responses