Saur Krishi Vahini Yojana Maharashtra राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय. हा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अखेर त्या योजनेला शासनाची मंजुरी मिळाली आता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला एक लाख 25 हजार रुपये. योजनेसाठी कोणतेही अट नाही कोणत्याही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
अर्थात प्रत्येक वर्षाला एक लाख 25 हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळत राहणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे यासंदर्भात सविस्तर माहिती तसेच शेतकऱ्यांना प्रतिवर्ष एक लाख 25 हजार रुपये कसे मिळतील हे सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत
शेतकऱ्यांना मिळणार 1.25 लाख
- शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यास मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला एक लाख 25 हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत.
- शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा त्याचप्रमाणे वर्ष 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
- मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
- वीज खरेदी करारानुसार वीज बिलाची रक्कम देण्यासाठी सातशे कोटी रुपयांचा स्वातंत्र्य रिवाल विंग फंड देखील स्थापन करण्यात येईल.
- आणि चालू वर्षासाठी याकरिता शंभर कोटी रुपये इतका निधी हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यात येईल.
- अभियानात वीज वाहिनीसाठीची जमीन अ कृषी करण्याची गरज नाही.
- तसेच अशा जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना तीस वर्षांपर्यंत सर्व कर व शुक्लांतून सूट देण्यात येईल.
- कृषी वीज वाहिनी योजनेसाठीची जमीन नाममात्र एक रुपया वार्षिक भाडेपट्याने देण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.
- या जमिनीचे नोंदणी व मुद्रांक विभागाने ठरवलेल्या किमतीच्या सहा टक्के दरानुसार किंवा प्रतिवर्ष एक लाख 25 हजार प्रती हेक्टर यापेक्षा जी रक्कम जास्त असेल त्या दराने वार्षिक भाडेपट्टा दर निश्चित करण्यात येईल.
- पाच-सहा दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की जे शेतकरी आपली जमीन सौर पॅनल लावण्यासाठी शासनाला भाडेतत्त्वावर देतील त्यांना एकरी पन्नास हजार रुपये प्रमाणे वर्षाला हेक्टरी एक लाख 25 हजार रुपये मिळणार.
- तर बघा अखेर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेऊन या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
- त्याचबरोबर 700 कोटी रुपये खर्च करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.
- जे शेतकरी आपली जमीन तीस वर्षांसाठी शासनाला भाडेतत्त्वावर देतील त्यांना 30 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षाला हेक्टरी एक लाख 25 हजार रुपये मिळणार आहेत.
- ही जमीन शासनाला भाडेतत्त्वावर दिल्यानंतर त्या जमिनीत शासनामार्फत सौर पॅनल बसवण्यात येतील.
- ज्या मार्फत शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार तर हा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे.
Saur Krishi Vahini Yojana Maharashtra शेतकऱ्यांचे फायदे
- ज्याचे दोन फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
- शेतात सौर पॅनल लावल्यामुळे दिवसा अखंडित वीज मिळेल.
- त्यासोबतच प्रति हेक्टरी त्या शेतकऱ्याला एक लाख 25 हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत.
- तीस वर्षाचा करार संपल्यानंतर ती जमीन पुन्हा त्या शेतकऱ्याला परत केली जाणार आहे.
Land Record Nominee :मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची
8 Responses