e shram card benefits
e shram card benefits ई-श्रम कार्ड योजनेअंतर्गत जर तुम्ही तुमचे ई-श्रम कार्ड बनवून घेतले असेल तर तुम्ही शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात, ई-श्रम कार्ड योजना ही भारत सरकार द्वारा असंघटित कामगारांच्या हितासाठी सुरू करण्यात आली असून या योजनेत नोंदणी केलेल्या श्रमिकांना या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे फायदे व विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळतो.
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
या योजनेत नोंदणी केल्यानंतर श्रमिकांना या योजनेअंतर्गत एक विशिष्ट प्रकारचे कार्ड हे मिळत असते. त्यालाच ई-श्रम कार्ड असे म्हणतात. जर तुम्ही ई-श्रम कार्ड काढले असेल तर तुम्हाला सुध्दा ई-श्रम कार्ड वर शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत असतो. ई-श्रम कार्ड वर कोणकोणत्या योजनांचा लाभ हा घेऊ शकतात याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या.
ई-श्रम कार्डचे फायदे
- जर तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई-श्रम कार्ड काढल्याच्या दिवसापासून असंघटित कामगारांना सरकारकडून एक वर्षासाठी दोन लाखांचा विमा हा मोफत दिला जातो.
- यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही हा विमा अगदी मोफत दिला जातो.
- ई-श्रम कार्ड धारकांना सरकारकडून त्यांचे कौशल्य प्रमाणे विविध क्षेत्रात रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली जाते.
- यामुळे बऱ्याचशा बेरोजगार कामगारांच्या हाताला काम मिळण्यास मदत होते. e shram card benefits
ई-श्रम कार्ड द्वारे शासनाच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकता e shram card benefits
- ई-श्रम कार्ड असेल तर श्रम विभागाच्या सर्व योजनांचा लाभ ई-श्रम कार्ड धारकांना दिला जातो.
- श्रम विभागअंतर्गत ज्या-ज्या योजना या राबवल्या जातात त्या सर्व योजनांचा लाभ ई-श्रम कार्ड धारक घेऊ शकतात.
- आरोग्य सेवांच्या योजनांचा लाभ सर्वप्रथम ई-श्रम कार्ड धारकांना दिला जातो.
- आरोग्य संबंधित जेवढ्या पण योजना शासनाचे आहे त्या सर्व योजनांच्या लाभासाठी ही श्रमकार धारकांना प्राधान्य दिले जाते.
- अगोदर ई-श्रम कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांना या योजनांचा लाभ हात दिला जातो.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
ई-श्रम कार्ड धारकांना घरकुल योजनेसाठी सुद्धा प्राधान्य
- असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर प्राधान्य दिले जाते.
- बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास ई-श्रम कार्ड धारकांना उदरनिर्वाहासाठी दरमहा 500 रुपयाची मदत सुद्धा शासनाकडून दिली जाते.
- कोरोना सारखी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हाताला काम राहत नाही. e shram card benefits
- आणि त्यांचा उदरनिर्वाहक करणे त्यांना खूप अवघड होऊन जाते अशा वेळेस जर ई-श्रम कार्ड योजनेअंतर्गत नोंदणी करून ई-श्रम कार्ड हे काढले असेल तर अशी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दरमहा 500 रुपयाची मदत सुद्धा दिली जाते.
- असंघटित कामगारांनी जर ई-श्रम कार्ड काढले असेल तर त्यांना अन्नधान्य मिळवण्यासाठी सुद्धा मदत होत असते.
- तुमच्याकडे जे स्किल असेल त्यानुसार तुम्ही त्या त्या क्षेत्रातील रोजगार मिळवण्यासाठी पोर्टल वर माहिती भरून काम मिळू शकता.
- असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी जर ई-श्रम कार्ड काढले असेल तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी सवलती ह्या मिळत असतात.
- तसेच भविष्यात येणाऱ्या शासनाच्या जेवढ्या पण योजना असतील त्या सर्व योजनांच्या लाभासाठी ई-श्रम कार्ड धारकांना प्राधान्य असणार आहे.
शेळी-मेंढीपालन योजना मंजुरी; सरकार देणार येवढं अनुदान
अशा प्रकारच्या पन्नास हुन अधिक योजनांचा लाभ तुम्ही या ई-श्रम कार्ड वर घेऊ शकता. हे कोण कोणते लाभ आहेत हे जर सविस्तरपणे जाणून घ्यायचे असतील तर ई-श्रम पोर्टल वर लॉगिन करून युअर स्कीम या नावाच्या ऑप्शन वर क्लिक करून सर्व योजना तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि त्या सर्व योजनांचा लाभ तुम्ही ई-श्रम कार्ड वर घेऊ शकता. e shram card benefits