Bachat Gat
Bachat Gat Loan Interest Rate उमेद म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती त्यानंतर प्रेरिका त्यानंतर सखी तसेच बिजनेस डेव्हलपमेंट सपोर्ट पर्सन म्हणजे बीडीएसपी यांच्या मासिक मानधनात शासनाकडून वाढ करण्यात आलेली आहे.
तसेच या अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयसहायता समूहांच्या म्हणजे महिला बचत गटांचा फिरता निधी यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे या संदर्भामध्ये दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून हा जीआर प्रकाशित करण्यात आला आहे. हा जीआर डाऊनलोड करायचा असेल तर या जी आर ची लिंक खाली दिलेली आहे.
प्रस्तावना :-
- Bachat Gat Loan Interest Rate राज्यातील ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलनासाठी केंद्र शासनामार्फत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत असून.
- यासाठी राज्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अर्थात उमेशची सन 2011 मध्ये स्थापना संदर्भीय शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.
- सदर अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलनाचे प्रयत्न करण्यात येत असून, यासाठी केंद्र शासनामार्फत 60% तर राज्य शासनामार्फत 40% अनुदान देण्यात येत आहे.
- या अभियानाची अंमलबजावणी करताना राज्यात ग्रामीण भागातील गरीब व जोखीम प्रवण महिलांना समृद्ध आत्म सन्मानाचे व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक लोकशाही तत्त्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करण्यात येत आहे.
- अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्य स्तरापासून ते क्लस्टर स्तरापर्यंत स्वतंत्र समर्पित व संवेदनशील यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.
PM किसान योजनेचा 15 वा हप्ता यादिवशी; कृषी विभागने केले जाहीर
Bachat Gat Loan Interest Rate सदर अभियान या ठिकाणी राबविण्यात येत आहे ?
- सदर अभियान राज्यातील 34 जिल्हे व 351 तालुक्यांत राबविण्यात येत असून यात गरीब महिलांचे सोय सहायता गट व स्वयंसहायता गटाचे ग्रामसंग व ग्राम संघाचे प्रभाग संघ तयार करून गरीब महिलांचे संघटन तयार करण्यात येते.
- तसेच गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात, समुदाय स्तरीय संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरिका व विविध प्रकारच्या समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत आहे.
- सदर कार्यरत प्रेविकांचे मूल्यमापन करून अ ब व क वर्गवारी नुसार दरमहा मानधन अदा करण्यात येते, तर इतर समुदाय संसाधन व्यक्ती सखी यांना महाराष्ट्राचे ग्रामीण जीवन्नोती अभियानाने निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांच्या कामाची प्रगती अहवालानुसार त्यांना दरमहा मानधन अदा करण्यात येते.
अभियानांतर्गत स्थापन स्वयं सहाय्यता गट
- तुम्ही हे वाचलं का ? तसेच अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहाय्यता गटांच्या अ, ब, आणि क, वर्गवारी सैनिकरण करून फिरता निधी वितरित करण्यात येतो.
- सदर कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती प्रेरिका सखी तसेच बिजनेस डेव्हलपमेंट सपोर्ट पर्सन यांच्या मानधनात वाढ करणे व अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहायता गटांना देण्यात येणाऱ्या फिरता निधीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
Bachat Gat Loan Interest Rate शासन निर्णय :-
- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सद्यस्थितीत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात तसेच अभियानांतर्गत स्थापन झालेल्या सोय सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरता निधीत खालील प्रमाणे वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
महिलाओं के लिये खुशखबर! मिलेंगे पूरे 6000 रुपये, सरकार ने किया ऐलान…
समुदाय संसाधन व्यक्ती [Community Resource Person-CRP] प्रेरिका (ICRP)/ सखी / Business Development support Person मानधन वाढ :-
अ. क्र | समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person CRP) / प्रेरिका (ICRP ) / सखी / Business Development support Person (BDSP) | कामाच्या मुल्यमापन / कामाच्या वर्गवारीनुसार सद्य:स्थितीत देय असलेले कमाल मासिक मानधन | मासिक मानधनामध्ये प्रती व्यक्ती प्रति महा करावयाची मानधन वाढ | कामाच्या मुल्यमापन/कामाच्या वर्गवारीनुसार सुधारीत कमाल देय असलेले एकूण मासिक मानधन |
१ | प्रेरिका (ICRP ) | ३००० | ३००० | ६००० |
२ | बॅंक सखी | ३००० | ३००० | ६००० |
३ | आर्थिक साक्षरता सखी (FLCRP) | ३००० | ३००० | ६००० |
४ | पशु सखी | ३००० | ३००० | ६००० |
५ | कृषी सखी | ३००० | ३००० | ६००० |
अ. क्र | समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person CRP) / प्रेरिका (ICRP ) / सखी / Business Development support Person (BDSP) | कामाच्या मुल्यमापन / कामाच्या वर्गवारीनुसार सद्य:स्थितीत देय असलेले कमाल मासिक मानधन | मासिक मानधनामध्ये प्रती व्यक्ती प्रति महा करावयाची मानधन वाढ | कामाच्या मुल्यमापन/कामाच्या वर्गवारीनुसार सुधारीत कमाल देय असलेले एकूण मासिक मानधन |
६ | मत्स्य सखी | ३००० | ३००० | ६००० |
७ | वन सखी | ३००० | ३००० | ६००० |
८. | मास्टर CRP (कृषी) | ४५०० | १५०० | ६००० |
९ | कृषी उद्योग सखी | ३५०० | २५०० | ६००० |
१० | Business Development support Person (BDSP) | ३५०० | २५०० | ६००० |
११ | कृतिसंगम सखी | ४५०० | १५०० | ६००० |
PhonePe कडून झटपट कर्ज कसे घ्यावे किंवा कसे मिळवावे
सोय सहायता गटांना अतिरिक्त फिरता निधी :-
- Bachat Gat Loan Interest Rate महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या सोय सहायता गटांना सद्यस्थितीत अ, ब, क, वर्गवारी श्रेणीकरण करून अधिकतम रुपये 15000 फिरता निधी वितरित करण्यात येतो.
- यामध्ये वाढ करण्यात येत असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे स्वयंसहायता गटाची वर्गवारी करून वर्गवारी प्राप्त होणाऱ्या सोयी सहायता गटांना रुपये तीस हजार दे राहील व वर्गवारी ब, क, मध्ये येणारे सहायता गटांना प्रचलित पद्धतीने फिरता निधी अनुज्ञेय राहील.
- अ वर्ग गटातील स्वयसहायता गटांना आता 30000 रुपये इतका फिरता निधी हा देण्यात येणार आहे आणि पंधरा हजार रुपये इतका निधी दिल्या जात होता.
- वरील प्रमाणे अतिरिक्त फिरता अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
- यापूर्वी ज्या स्वयंसहायता गटांना त्यांच्या वर्गवारी नुसार अभियानामार्फत फिरता निधी अदा केलेला आहे अशा गटांना रुपये 15000 रुपये अतिरिक्त फिरता निधी देय राहणार आहे.
- तसेच ज्या स्वयं सहाय्यता निधी गटांना अद्याप दिलेला नाही परंतु जे स्वयं सहायता गट फिरता निधी मिळण्यासाठी पात्र आहे.
- अशा सोयी सहायता गटांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून वरील प्रमाणे फिरता निधी त्यांच्या वर्गवारीनुसार अभियानातील प्रचलित पद्धतीप्रमाणे अनुज्ञ राहणार आहे.
- तर अशा प्रकारे आता उमेद म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत कार्यरत असणारे समुदाय संसाधन व्यक्ती प्रेरिका सखी तसेच बिजनेस डेव्हलपमेंट सपोर्ट पर्सन म्हणजे बीडीएसपी यांच्या मासिक मानधनात या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे.
- तसेच या अभियानांतर्गत स्थापन झालेल्या सोय सहायता समूहाच्या फिरत्या निधीत म्हणजे महिला बचत गटाच्या फिरत्या निधीत वाढ सुद्धा करण्यात आली आहे.