Cotton Update
Cotton Update हे वाचलं का ? – जर कापूस पिकाच्या बोंडाचे वजन वाढवायचे असेल बोंडे अधिक टपोरे करायचे असतील तर त्यासाठी अशी अचानक एक कोणतीतरी आश्चर्यकारक फवारणी असू शकत नाही नक्की कापूस पिकाचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे जे काही एकात्मिक व्यवस्थापन आहे. ते अतिशय चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे.
म्हणजे रान तयार करण्यापासून कापूस लागवडीपासून खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आंतरमशागत असेल किंवा कीड रोग व्यवस्थापन असेल या सर्व मुद्द्यांकडे सुरुवातीपासून लक्ष देणे गरजेचे आहे. कारण पिकाची जी वाढ होत असते ती या सर्व मुद्द्यांवर अवलंबून असते. एखादा फवारा घेतला आणि बोंडे टपुरे झाले असं होत नाही त्याला वेगवेगळे फॅक्टर त्याठिकाणी कारणीभूत असू शकतात.
अश्या 5 विमा पॉलिसी ज्यात बचत छोटी फायदे मोठे
कोण कोणत्या उपाययोजना केल्यानंतर बोंड टपोरे होण्यात कश्या प्रकारे मदत होणार
- Cotton Update सजीवकाचा वापर करणे आता बरेच शेतकरी वेगवेगळ्या पिकांमध्ये संजीवकाचा वापर करतात.
- आणि आवश्यक त्या अवस्थेमध्ये पिकाची गरजेनुसार वाढ करून आणतात किंवा त्या ठिकाणी वाढ थांबवतात.
- तर कापूस पिकामध्ये संजीवकाचा वापर हे लागवडीच्या अंतरावर ते अवलंबून असतो.
- जर कापूस पीक पाच बाय पाच याप्रमाणे लावला असेल किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर लीहोसिन चा वापर कापूस पिकामध्ये करू शकता.
- याचं प्रमाण आहे 4 मिली. लिहोसिन 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून कापूस पिकावर फवारणीसाठी वापरा.
- सोबतच कापूस पिकाचा त्या ठिकाणी वरचा शेंडा देखील खुडायचा आहे जेणेकरून कापसाची उभी वाढ थांबणार आहे.
- आणि त्या ठिकाणी जे काही फुलं आहे बोंड आहे त्याकडे अन्नद्रव्य स्थलांतरित केली जाणार आहे.
- ज्यावेळेस कापूस 90 इंचाच होईल त्यावेळेस बोरॉन 15 ग्राम होशी 30 मिली आणि नॅनो युरिया 30 मिली प्रती 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून कापूस पिकावर ते फवारणी घ्या.
पशुपालन लोन योजना 2023; जानिए गाय, भैंस के लिए लोन कैसे लें
Cotton Update या फवारणीमुळे काय होणार
- आता यामुळे काय होणार कापूस पिकाच्या पानांवरील प्रकाश संश्लेषण वाढणार.
- तसेच यामध्ये असलेले जिब्रेलिक ऍसिड मुळे कापूस पिकातील बोंडांचा आकार वाढण्यामध्ये मदत होणार आहे.
- वजन वाढण्यासाठी कापूस लागवडीनंतर 100 ते 110 दिवसांनी ०.५२.३४. – ७५ ग्राम आणि बायर कंपनीच अंबिशन 30 ml प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून कापूस पिकावर फवारणी घ्या.
- या फवारणीनंतर वीस दिवसाच्या अंतराने दोन वेळा पोटॅशियम शोनाईट 60 ग्रॅम अधिक मिक्स चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून कापूस पिकावर फवारणी घ्या.
- बोंडे भरत असतानाच तुम्ही जर कापूस पिकाला ट्रीप केलं असेल तर 0.0.50 – 3 किलो अधिक रिलीज प्लस एक किलो जे की सल्फर आहे 90% यातील हे दर दहा दिवसांच्या अंतराने तीन वेळा खालून सोडायचा.
- प्रत्येक वेळी ज्यावेळेस झिरो झिरो 50 सोडाल त्याच्या पाचव्या दिवशी पाचशे मिली पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टरीया घ्या.
- आणि त्यामध्ये 250 ग्रॅम काळा गुळ मिसळा आणि दोन लिटर पाणी मिसळून एक रात्र भिजून दुसऱ्या दिवशी ड्रीपने सोडून द्या.
- तर अशा प्रकारे कापूस पिकांमध्ये वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करायचे आहे.
- बोंडांचा आकार वाढवण्यासाठी बोंडनचं वजन वाढवण्यासाठी तसेच बोंडांवरती एक चकाकी येण्यासाठी.
- एवढ्या उपाययोजना जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिजल्ट त्याठिकाणी मिळणार आहे.
जन्माचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? तो कोणकोणत्या कामांसाठी पुरावा म्हणून वापरता येणार?