Kanda Anudan
Kanda Anudan 2023 उपरोक्त कारणमीमांसा विचारात घेऊन कांदा अनुदान वितरणाबाबत दिनांक 18 ऑगस्ट 2023 चा शासन निर्णय या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी कांदा अनुदानाबाबत शासनाचा पहिला जीआर प्रकाशित करण्यात आलेला होता त्या जीआर मध्ये काही बाबींचा उल्लेख केलेला होता त्यामध्ये आता या जीआर मध्ये काही बदल हे करण्यात आले आहे काय बदल आहे हे जाणून घ्या खालील नुसार.
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला मिळणार !
शासन निर्णय :-
- Kanda Anudan 2023 या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करावयाच्या एकूण अनुदानाची रक्कम रुपये 857 कोटी 67 लाख 58 हजार 608 इतकी आवश्यक असल्याचे पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.
- मात्र सद्यस्थितीत वित्त विभागाने या योजनेसाठी अक्षरी रुपये 465 कोटी 99 लाख फक्त इतकी रक्कम खर्च करण्यास मान्यता दिली असल्यामुळे.
- या योजनेखाली उपलब्ध रुपये 465 कोटी 99 लाख फक्त इतक्या निधीतून सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात खालील प्रमाणे निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- आता पहिल्या टप्प्यात किती निधी कोणत्या जिल्ह्याकरिता वितरित करण्यात येत आहे ते या जीआरमध्ये सांगण्यात आलेला आहे तोच बदल या जीआर मध्ये करण्यात आला आहे.
- पहिल्या टप्प्यात चौदा जिल्ह्यांकरिता अनुदानाची रक्कम ही संपूर्ण वर्ग करण्यात येणार आहे.
मधमाशी पालन योजनेसाठी अर्ज सुरु
Kanda Anudan 2023 या 14 जील्ह्याकरिता आवश्यक अनुदानाची रक्कम ?
- कांदा अनुदानासाठी रुपये दहा कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक 14 जिल्ह्यातील.
- यामध्ये नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम, या जिल्ह्यातील लाभार्थी यांना संपूर्ण शंभर टक्के प्रमाणे आवश्यक अनुदानाची रक्कम रुपये 22 कोटी 69 लाख 17 हजार 681 रुपये इतकी आहे.
- सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचा तपशील संगणक प्रणालीवर अपलोड केल्यानंतर उपरोक्त नमूद अनुदानाच्या रकमेत वाढ अथवा घट होऊन निश्चित होईल इतकी अनुदानाची रक्कम.
- सबब सदर 14 जिल्ह्यातील लाभार्थी यांना संपूर्ण अनुदानाची रक्कम सर्वप्रथम अदा करण्यात यावी.
- उल्लेख केलेल्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण अनुदानाची रक्कम ही प्रथम मिळणार आहे.
उर्वरीत 10 जिल्ह्यांसाठी अनुदानाची रक्कम
- Kanda Anudan 2023 त्यानंतर रुपये दहा कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक उर्वरित दहा जिल्ह्यातील,
- यामध्ये धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जळगाव, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, इत्यादी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आवश्यक अनुदानाची रक्कम रुपये 834 कोटी 98 लाख 40 हजार 926 फक्त इतकी आहे.
- सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचा तपशील संगणक प्रणालीवर अपलोड केल्यानंतर उपरोक्त नमूद अनुदानाच्या रकमेत वाढत व घट होऊन निश्चित होईल,
- इतके अनुदानित ची रक्कम सबक सदर लाभार्थी यांना खालील प्रमाणे अनुदान वाटप करण्यात यावे.
- ज्या दहा जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे त्या दहा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता अनुदानाची रक्कम ही कशाप्रकारे वितरित केली जाणार आहे.
या कार्डचे नेमके फायदे काय ? ई श्रम कार्ड अर्ज पद्धत,
Kanda Anudan 2023 10 जिल्ह्यांना अश्याप्रकारे होणार अनुदान वितरित
- अनुदान लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रुपये दहा हजार पेक्षा कमी आहे.
- त्यांचे प्रकरणी संपूर्ण अनुदानाची रक्कम तसेच ज्या लाभार्थ्यांची एकूण अनुदानाची रक्कम दहा हजार पेक्षा जास्त आहे.
- त्यांचे प्रकरणी पहिल्या टप्प्यात दहा हजार इतक्या कमाल मर्यादित अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी.
- ज्या दहा जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे त्या दहा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना अनुदान हे दहा हजार पर्यंत मिळणार आहे.
- त्यांना संपूर्ण दहा हजार इतका अनुदान दिले जाणार आहे.
- मात्र ज्या शेतकऱ्यांना दहा हजारापेक्षा जास्त अनुदान मिळणार आहे.
- अशा शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यामध्ये दहा हजार रुपये इतके दिले जाणार आहे.
- उर्वरित हे दुसऱ्या हप्त्यामध्ये शासनाकडून त्यांना अनुदान दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांना मदतीसाठी आता अॅपवरच नोंद
पात्र लाभार्थ्यांची यादी
- पात्र लाभार्थी यांच्या याद्या संबंधित ग्रामसभा तसेच चावडी येथे वाचन करण्यात येणार आहे.
- ग्रामपंचायतच्या फलकावर सुद्धा याद्या या प्रसिद्ध करण्याची निर्देशित देण्यात आले आहे.
- अपात्र लाभार्थी अथवा अनियमित्ता आढळून आल्यास संमती तावर खडक कारवाई सुद्धा करण्याचे या जीआरमध्ये सांगण्यात आले आहे.
- अशा प्रकारे नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम, या जिल्ह्यातील पात्र शेतकरी हे दहा हजार रुपये इतके कांदा अनुदानासाठी पात्र आहे.
- याकरिता त्यांना संपूर्ण अनुदान रक्कम ही एक रकमी प्रथम शासनाकडून अदान करण्यात येणार आहे.
- तसेच उर्वरित जे दहा जिल्हे आहेत धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जळगाव, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पर्यंत अनुदान मंजूर आहे त्यांना एकदाच अनुदान दिले जाणार आहे.
- मात्र ज्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेक्षा जास्त अनुदान शासनाकडून मिळणार आहे.
- अशा शेतकऱ्यांना प्रथम दहा हजार व दुसऱ्या हप्त्यात उर्वरित अनुदान दिले जाणार आहे.
- असा बदल या जीआर च्या अनुषंगाने या योजनेत करण्यात आलेला आहे. Kanda Anudan 2023