Cash On Ration Card Update
Cash On Ration Card Update राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, आणि वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल म्हणजे केसरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना प्रति महिना प्रति सदस्य 2 रुपये प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ या दराने पाच किलो अन्नधान्याचा लाभ दिला जात होता पण यापुढे गहू तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य ऐवजी रोख रक्कम देण्यासाठी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
GR आणि अर्जाचा नमुना पाहण्यासाठी क्लिक करा
शासन निर्णय
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल म्हणजे केसरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना.
- जानेवारी 2023 पासून अन्नधान्य ऐवजी प्रत्येक महिन्याला प्रति लाभार्थी 150 रुपये रोख रक्कम थेट DBT मार्फत बँकेच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे.
- तसेच किमतीत होणारी वाढ प्रति महिना प्रति लाभार्थी रोख स्वरूपात थेट ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा मान्यता देण्यात आली आहे. Cash On Ration Card Update
बनावट खते आणि बोगस बियाणे कायदा अंतिम टप्प्यात!!
Cash On Ration Card Update सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रमाणभूत कार्यप्रणाली ?
- शेतकरी योजनेच्या लाभासाठी आरसीएमएस म्हणजे रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम वर नोंद झालेल्या पात्र रेशन कार्डधारकांकडून एक अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात येणार आहे.
- ज्यासोबत DBT म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर साठी आवश्यक बँक खात्याचे तपशील आणि योग्य कागदपत्रे जोडावी लागणार आहे.
- सदर माहितीची छाननी करून संबंधित तहसीलदार पात्र लाभार्थ्यांची रास्तभाव दुकान निहाय यादी तयार करतील.
- सदर यादी तहसीलदार संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आग्रेशित करतील.
- संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी RCMS वरील लाभार्थ्यांच्या माहितीच्या आधारे त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे लाभ हस्तांतरणासाठी PFMS मध्ये पेमेंट फाईल तयार करतील.
- व PFMS प्रणाली द्वारे पेमेंट करण्यात येईल त्यासाठी जिल्हास्तरावर बँक खाते सुरू करण्यात यावे.
- दिलेल्या बँक खात्याचे नोंदणी DBT मध्ये यशस्वी झाल्यानंतरच त्यापुढील महिन्यात जानेवारी 2023 पासूनचे लाभ मिळेल.
- सदर योजनेअंतर्गत दिली जाणारी रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय करावे ?
- रेशन कार्ड वर कुटुंबातील ज्या सर्व व्यक्तींची नावे आहे त्यांचे आधार कार्ड आरसीएमएस रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम सोबत लिंक असणे गरजेचे असेल.
- ज्यांच्या आधार कार्ड लिंक असेल फक्त त्यांच्या नावे पैसे ट्रान्सफर केले जातील त्यामुळे आधी सर्वांचे आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करा. Cash On Ration Card Update
टोमॅटोच्या संकटाला सरकारी धोरणही जबाबदार; काय आहे सरकारी धोरण?
Cash On Ration Card Update अर्जाचा नमुना आणि अर्ज कसा भरावा ?
- अर्जाचा नमुना या जीआर सोबत जोडलेला आहे या GR ची लिंक वर दिली आहे.
- औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील.
- एपीएल म्हणजे केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ मिळण्याकरिता अर्जाचा नमुना.
- सर्वप्रथम अर्जदाराचे किंवा कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता भरा.
- त्याखाली रेशन कार्डचा डिजिटल 12 अंकी नंबर इथे भरायचा आहे.
- त्याखाली आधार सोबत लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती जसे बँकेचे नाव शाखा कुठली आहे.
- खाते नंबर खात्याचा प्रकार जसे सिंगल अकाउंट वैयक्तिक खाते किंवा जॉईन खाते म्हणजे संयुक्त खाते आणि नंतर बँकेचा आयएफसी कोड भरा.
- या अर्ज सोबत रेशन कार्ड च्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स तसेच बँक पासबुकच्या पहिल्या पानाचे किंवा ज्या पानावर खाते नंबर मेंशन केलेला असेल त्या पानाची झेरॉक्स जोडायची आहे.
- नंतर खाली स्थळ व तारीख लिहून येथे सही किंवा डाव्या हाताचा अंगठा लावून कागदपत्र जोडा व फॉर्म जमा करा.
- फॉर्म एकदाच जमा करायचा आहे एकदा पेमेंट प्रोफाइल किंवा पेमेंट फाईल तयार झाल्यानंतर दर महिन्याची रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल