Ayushman Bharat Yojana Maharashtra
Ayushman Bharat Yojana Maharashtra राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही दोन जुलै 2012 पासून राज्यात राबविण्यात येत आहे आणि आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे ही केंद्र शासनाची योजना आहे ही योजना दिनांक 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात लागू करण्यात आलेली आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रित योजनेत काही बदल योजनेची विस्तारीकरण करण्याची बाब शासनाच्या विचारधिन होती.
शासन निर्णय
- Ayushman Bharat Yojana Maharashtra सध्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (PMJAY) योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रुपये एवढा आहे.
- तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत (MJPJAY) आरोग्य संरक्षण प्रतिक्रुटंब प्रतिवर्षीय रुपये 1.5 लक्ष एवढे आहे.
- आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अंतर्गत ही आरोग्य संरक्षण प्रति कूटंब प्रतिवर्षी पाच लाख रुपये एवढा करण्यात येत आहे.
- तो विमा काही जणांना दिला जातो आता जे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना हे एकत्र करून सगळ्यांना आता 5 लाख रुपये जे विमा मिळणार आहे.
- आणि त्या संदर्भात जो उपचार आहे तो करण्यात येणार आहे.
Ayushman Bharat Yojana Maharashtra योजनेत करण्यात आलेले बदल ?
- यामध्ये सध्या मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये खर्च मर्यादा जी होती ती अडीच लाखापर्यंत होती.
- आता मात्र ती साडेचार लाखापर्यंत करण्यात आलेली आहे.
- आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जी आहे त्यात 996 उपचार होते आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार होते.
- यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात येणार आहे.
- तर 328 मागणी असलेल्या नवीन उपचारांचा समावेश करण्यात येणार आहे.
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण उपचार संकेत 147 ने वाढ होऊन उपचारांची संख्या 1356 एवढी करण्यात आलेली आहे.
- आणि जे हॉस्पिटल होते ते 1000 हॉस्पिटल होते अगोदर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता यामध्ये 350 ने वाढ होणार आहे.
- म्हणजे टोटल आता जे रुग्णालय होतील हॉस्पिटल होतील ते 1350 राहणार आहे.
वन्य प्राण्यांपासून शेती पिकांच नुकसान, भरपाई साठी करा ऑनलाईन अर्ज
योजना कोणा कोणाला लागू आहे कार्ड वगैरे लागेल का ?
- तर या मध्ये कार्ड वगैरे लागणार नाही पण आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या कुटुंबांना लागून लागू करण्यात येणार आहे.
- म्हणजे महाराष्ट्रात सर्वांना ही योजना लागू आहे कोणतेही शिधापत्रिका धारक असेल केशरी असेल, पिवळे असेल, किंवा पांढरे असेल, किंवा महाराष्ट्र मध्ये राहत असाल तरी सुद्धा ही योजना लागू आहे.
- स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा म्हणजे एक्सीडेंट झाल्यानंतर जी काही प्रक्रिया असते ती तीस हजार एवढी खर्च मर्यादा होती ती आता एक लाखापर्यंत करण्यात आली आहे. Ayushman Bharat Yojana Maharashtra
लाभार्थी घटक
- लाभार्थी घटक मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी जे आहे ते घटक पुढीलप्रमाणे असणार आहे.
- आता कशा पद्धतीने घटक आहे आणि कशा पद्धतीने लाभ मिळू शकतो.
- लाभार्थी घटक —
- आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामध्ये सामाजिक आर्थिक व जातनिय जनगणनेत एसईसीसी नोंदणी समाज कुटुंबे आहे.
- अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंब तसेच याशिवाय राज्य शासनाने शिफारस केल्यानुसार केंद्र शासनाचे निश्चित केलेले कुटुंब असणार आहे.
असं घ्या पर्सनल लोन; मोबाईल वरून अप्लाय करा
Ayushman Bharat Yojana Maharashtra कोणत्या गटांमध्ये मोडतात ?
- गट अ —
- पिवळी किंवा अन्न किंवा अन्नपूर्ण योजना आणि केसरी म्हणजे पिवळे रेशन कार्ड धारक अन्नपूर्णा योजने मधील आणि केसरी शिधापत्रिका धारक हे कुटुंब गट अ मध्ये मोडणार.
- म्हणजे कोणतेही कार्ड लागणार नाही तर रेशन कार्ड आणि आधार कार्ड एवढ जर दिलं तरी सुद्धा उपचार होणार आहे जे 1365 रुग्णालय असतील त्यामध्ये.
- गट ब —
- शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंब (शासकीय /निमशासकीय कर्मचारी यांसह) म्हणजे जे पांढरे रेशन कार्ड असेल ज्यांकडे तर ते शासकीय असतील किंवा निम शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश होईल.
- व कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसलेली कुटुंबे सुद्धा जर शिधापत्रिकाधारक म्हणजे रेशन कार्ड नसेल पण महाराष्ट्र राज्यात राहत आहे.
- हे सुद्धा गट ब मध्ये येणार आहे म्हणजे या योजनेसाठी पात्र असणार आहे.
- गट क —
- शासकीय निमशासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी असेल आश्रम शाळेतील महिला असतील वृद्धाश्रद्धा ज्येष्ठ नागरिक असतील यांचा समावेश गट क मध्ये होणार आहे.
- यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार असतील किंवा रहिवासी असलेल्या बांधकाम कामगार जे कुटुंबे आहे त्या सगळ्यांचा समावेश यात होणार आहे.
- गट ड —
- लाभार्थ्यांना “अ” “ब” “क” या गटांमध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील जे महाराष्ट्राच्या सीमा भागात असतील रस्त्या अपघात जखमी झालेले महाराष्ट्र बाहेरील व देशाबाहेर रुग्ण सुद्धा गट ड मध्ये याचा सुद्धा समावेश होणार आहे.
- जे हॉस्पिटल असणार आहे ते हॉस्पिटल पाहण्यासाठी वर जीआर ची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही कोणकोणते हॉस्पिटल असणार आहे ते पाहू शकता.
- जर काही आजार झाला किंवा काही अपघात वगैरे कुठे झाला तर त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जे काही रेशन कार्ड आहे ते आणि आधार कार्ड आणि शेतकरी असाल तर सातबारा अशा पद्धतीने तिथे जाऊन उपचार करू शकता.
- जीआर मध्ये खाली जीआर संपल्यानंतर इथे १३५६ उपचारांची जी यादी आहे ती यादी जीआर मध्ये दिलेली आहे.
आभा हेल्थ कार्ड मोबाईल मधून काढा मिनिटात
योजनेतील रूग्णालये, रूग्णालयांचे अंगीकरन, अंमलबजावणीचे नियम,
- वित्तीय भार–
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) योजनेंतर्गत केंद्र शासनाचा हिस्सा ६० टक्के व राज्य शासनाचा हिस्सा ४० टक्के राहील.
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या हिश्यापोटी आवश्यक निधी व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पामध्ये आवश्यक निधी / अतिरिक्त अनुदान सर्वसाधारण (General),
- अनुसूचित जाती उप योजनेंतर्गत (SCP) व अनुसूचित जमाती उप योजनेंतर्गत (TSP) राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.
- रूग्णालयांचे अंगीकरन–
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येणाऱ्या रुग्णालयांची प्रत्येक तालुक्यात किमान २ रूग्णालये याप्रमाणे महसूली विभाग निहाय संख्या निश्चित करण्याचे,
- राज्याच्या सर्व महसुल विभागात एकसमान पध्दतीने रुग्णालयांचे जाळे तयार करणे इ. बाबत निर्णय घेण्याचे अधिकार सचिव / प्रधान सचिव / अ.मु.स., सार्वजनिक आरोग्य विभाग यांना राहील.
- उपचार–
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या एकूण उपचारांची संख्या निश्चित करणे,
- उपचारांच्या संख्येत बदल करण्याचे (कमी/जास्त), वर्णनात व दरात बदल करण्याचे व काही उपचार शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्याचे.
- अधिकार सचिव / प्रधान सचिव/अ.मु.स., सार्वजनिक आरोग्य विभाग यांना राहतील.
- योजनेतील रूग्णालये–
- सदर योजनांसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटी / सचिव / प्रधान सचिव/ अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग निश्चित करतील.
- अशा निकषांनुसार खाजगी रुग्णालयांचा, विश्वस्त संस्थांच्या रुग्णालयांचा समावेश करण्यात येईल.
‘इस’ फसल से किसानों की होगी बंपर कमाई! मात्र 2 माह में करोड़पति बन जायेंगे
- अंमलबजावणीचे नियम–
- सदर योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते नियम करण्याची जबाबदारी राज्य आरोग्य हमी सोसायटीची राहील.
- तथापि, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार नियामक परिषद व शासनास राहतील,
- कर्मचारी नियुक्त्यांबाबत–
- योजनांसाठी आवश्यक असणारा अधिकारी व कर्मचारी वर्ग कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटीस राहतील.
- खर्चाचे अधिकार–
- राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनावरील खर्च, कार्यालयीन खर्च आणि विमा कंपनीस अदा करावयाचा खर्च व हमी तत्वावरील दाव्यांचा खर्च अदा करण्याचे अधिकार सोसायटीस राहतील.
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकारांचा व त्यांच्या कुटुंबांचा आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी कार्यान्वित असलेले बांधकाम कामगार या लाभार्थी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
- या घटकांची संख्या अनुक्रमे सामान्य प्रशासन विभाग व उद्योग उर्जा व कामगार विभागाने निश्चीत करून राज्य आरोग्य हमी सोसायटीस उपलब्ध करून देण्यात यावी व वेळोवेळी अद्ययावत माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीस पुरविण्यात यावी.
- सदर लाभार्थ्यांसाठी होणारा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीस संबंधित विभागाने / कार्यालयाने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. Ayushman Bharat Yojana Maharashtra
land record information system 2023 :जमीन खरेदी करण्यासाठी १००% अनुदान