PM Awas Yojana 2023
PM Awas Yojana 2023 इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) येत्या तीन वर्षांत १२ हजार कोटी रुपये खर्चून मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. लिंगायत, गुरव, वडार आणि रामोशी समाजासाठी स्वतंत्र चार महामंडळे स्थापन करण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.
विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा?
‘मोदी आवास योजना’
- PM Awas Yojana 2023 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठी घरकूल योजना व लहान समाजघटकांसाठी महामंडळांची घोषणा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केली होती.
- ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी त्यानुसार अहवाल सादर केला.
- योगायोग म्हणजे आता ओबीसी व गृहनिर्माण ही दोन्ही खाती सावे यांच्याकडेच असल्याने योजनेला गती मिळेल.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! वेतन बिले तयार झालेले कर्मचारी
PM Awas Yojana 2023 अशी राबविणार योजना
वर्ष | इतका खर्च करणार | घरकुले |
२०२३-२४ | ३ लाख | ३६०० कोटी रुपये |
२०२४-२५ | ३ लाख | ३६०० कोटी रुपये |
२०२५-२६ | ४ लाख | ४८०० कोटी रुपये |
एकूण | १० लाख | १२००० कोटी रुपये |
- ओबीसी महामंडळांतर्गत दोन उपकंपन्या —
- महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ वीरशैव लिंगायत समाजासाठी. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ गुरव समाजासाठी.
योजनेत राज्यातील इतके शेतकरी पात्र
किती घरे? कसा मिळेल लाभ?
- PM Awas Yojana 2023 मोदी आवास योजनेंतर्गत २०२६ पर्यंत ओबीसींसाठी १० लाख घरे बांधण्यात येतील.
- स्वतःचे किंवा कुटुंबाचे मालकीचे राज्यात पक्के घर नसणाच्यांना आणि महाराष्ट्रात किमान १५ वर्षापासून वास्तव्य असणाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळेल.
- पात्र व्यक्तीस १ लाख २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल.
Jobs For Senior Citizens 2023 :ZP मध्ये रिटायर्ड शिक्षक भरती