Land Record Update 2023
Land Record Update 2023 जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा नीट तपासणे– ज्या गावात जमीन खरेदी करायची आहे त्या गावातल्या तलाठी कार्यालयात जाऊन त्या जमिनीचा सातबारा उतारा काढू शकता. त्याशिवाय जर जमिनीचा गट क्रमांक माहीत असेल तर ऑनलाईन सुद्धा सातबारा उतारा काढू शकता. सातबारा उतारा काढून झाल्यानंतर त्या जमिनीचा फेरफार उतारा तपासून घ्या.
वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा वारसा हक्क किती हक्क असतो?
सातबारा उताऱ्यावर कोणत्या तीन गोष्टी बघायच्या
- 1)
- Land Record Update 2023 सातबारा उतारावरील नाव चेक करा.
- म्हणजे जे व्यक्ती शेत जमीन विक्री करणार आहे त्या व्यक्तींचीच नाव सातबारा उतारावर आहे का ते क्रॉस चेक करा.
- सातबारा उताऱ्यावर मयत जुना मालक किंवा इतर वारसांचे नाव असल्यास ती आधी काढून घ्यावी.
- 2)
- सातबारा उतारावर कर्जाचा बोजा आहे का म्हणजे संबंधित शेतकऱ्यांना किंवा जमीन मालकांना बँक असेल संस्था असेल त्यांच्याकडून कर्ज घेतला आहे का ते तपासून घ्यायचा आहे.
- त्याशिवाय ही जमीन एखाद्या न्यायालयीन खटल्यात अडकली आहे का त्या संदर्भात तपासून पहावे लागणार आहे.
- 3)
- या जमिनीमधून नियोजित महामार्ग रस्ता जात आहे का त्याची सातबारा उतारावर नोंद आहे का ते तपासून पाहणं गरजेचं आहे.
- जी जमीन तुम्हाला खरेदी करायची आहे त्या जमिनीचे 1930 सालापासूनचे सातबारा आणि फेरफार उतारे महसूल कार्यालयातला अभिलेख कक्षा कडून मिळू शकतात.
- यामुळे या जमिनीच्या अधिकाराअभीलेखात वेळोवेळी कसे बदल होत गेले त्याचे सविस्तर माहिती मिळते.
शेताच्या हद्दी ठरवण्याबाबतचा कायदा जमीन महसूल अधिनियम?
Land Record Update 2023 भूधारणा पद्धत
- भूधारणा पद्धत तपासून पहावं एकदा जर सातबारा उतारा हातात आला तर जी शेतजमीन खरेदी करायची आहे ते कोणत्या भुधारणा पद्धती अंतर्गत येते ते तपासून घ्यावी.
- सातबारा उतारावर भुधरणा पद्धत नमूद केलेली असते त्या सातबारा उतारावर डावीकडे भूधारणा पद्धतीचा प्रकार हा भोगवटादार वर्ग 1 असा दिलेला असतो.
- जर सातबारावर भोगवटादार वर्ग एक पद्धत असेल तर या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचा हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात.
- शेतकरीच या जमिनीचा मालक असतो म्हणजे ही जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वतःच्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अशी अडचण येत नाही असा याचा अर्थ होतो.
- सातबारा उताऱ्यावर जर भोगवटादार वर्ग 2 नमूद केला असेल तर या जमिनीच्या व्यवहार करण्यावर शासनाचे निर्बंध असतात.
- सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचं हस्तांतरण होत नाही.
- यामध्ये देवस्थान इनाम जमिनी भूमीहिन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इत्यादींचा समावेश होतो.
- यामुळे भोगवटादार वर्ग दोन अंतर्गत येणारी जमीन जर खरेदी करायची असेल तर सक्षम सरकारी अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच ती खरेदी करावी.
सरकारी पट्टेदार या प्रकाराच्या जमिनी?
- Land Record Update 2023 यामध्ये जमिनी सरकारच्या मालकीच्या पण भाडेतत्त्वावर दिलेले असतात.
- त्या जमिनीत 10:30 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिल्या जातात.
गटाचा नकाशा
- गटाचा नकाशा पाहणे एकदा नकाशा पाहिला की त्यामुळे दोन गोष्टी करतात एक जमिनीची हद्द कळते त्यामुळे जर नकाशा हातात आला की नकाशा प्रमाणे त्या जमिनीची हद्द आहे की नाही तपासून बघावी.
- आणि दुसरी गोष्ट त्या जमिनीचा किंवा त्या गटाच्या चारी बाजूंना कोणते शेतकरी आहे कोणते गट क्रमांक आहे याची माहिती स्पष्टपणे कळते.
महाडीबीडी पाईप अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरू
Land Record Update 2023 शेत रस्ता
- जे जमीन खरेदी करायची आहे तिथपर्यंत जाण्यासाठी क्षेत्र रस्ता आहे की नाही ते बघावं.
- जमीन बिनशेती असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवलेला असतो.
- पण जमीन बिनशेती नसेल तर व खाजगी रस्ता असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करून घ्यावी.
खरेदी खत ?
- तालुक्यातील दुय्यम निबंध कार्यालय मध्ये आवश्यकता कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावे.
- यात गट नंबर, मूळ मालकाचे नाव, चतु : सीमा, क्षेत्र बरोबर आहे की नाही ते तपासून घ्यावा.
MahaDBT Farmers Beneficiary List 2023 :महाडीबीटी योजना लाभार्थी यादी