Post Office NSC Scheme
Post Office NSC Scheme नॅशनल सेविंग सर्टिफिकेट यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर एक सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र दिले जाते यावर जमा केलेला रकमेचा तपशील असतो हे प्रमाणपत्र कर्ज घेण्यासाठी तारण ठेवू शकता तसेच सिक्युरिटी म्हणून ट्रान्सफरही करू शकता.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट/गुंतवणूक
- Post Office NSC Scheme पैसे जमा केल्यापासून पुढील पाच वर्षांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट अकाउंट मॅच्युअर होते.
- म्हणजे पाच वर्षानंतर सर्व रक्कम परत मिळते कमीत कमी एक हजार रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीमध्ये कितीही रक्कम एनएससी योजनेअंतर्गत गुंतवता येते.
- नो मॅक्सिमम लिमिट तसेच एनएससी अंतर्गत कितीही खाते उघडता येते त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
- योजनेमध्ये केलेली गुंतवणूक इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 च्या अंतर्गत कर कपातीसाठी पात्र असते.
- एन एस सी मध्ये कोणत्याही सज्ञान व्यक्तीला तसेच दहा वर्षीय मायनरला त्याच्या नावाने खाते उघडता येते.
- आणि तीन सज्ञान व्यक्ती मिळून एकत्रित जॉईन खाते म्हणजे संयुक्त खाते उघडू शकता.
- आणि लहान मुलांच्या नावाने त्यांच्या पालकांनाही खाते उघडता येते.
- खाते सुरू केल्यानंतर पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे मॅच्युरिटी पूर्वी ते बंद करायचे असेल तर त्यासाठी काही अटी आहे.
पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जुलै 2023
Post Office NSC Scheme मॅच्युरिटी पूर्वी खाते बंद करण्याच्या अटी
- सिंगल अकाउंट मधील खातेधारकाचा किंवा संयुक्त खात्यातील एका किंवा सर्वच खातेदारकांचा जर मृत्यू झाला तर खाते मुदतपूर्व बंद करता येते.
- NSC प्रमाणपत्र जिथे तारण ठेवलेले आहे जर त्या ऑथॉरिटीज कडून ते जप्त करण्यात आले तरी सुद्धा खाते मुदतपूर्वक बंद होते.
- आणि कुठल्याही कारणास्तव जर कोर्टाने खाते बंद करण्याचे आदेश दिले असतील तरीही खाते मुदतपूर्वक बंद करता येते.
वृक्ष लागवड रोप, कलमांना ५०% अनुदान
एनएससी प्रमाणपत्र फक्त या ऑथॉरिटी कडे ट्रान्स्फर करता येते किंव्हा तारण ठेवता येते.
- Post Office NSC Scheme द प्रेसिडेंट ऑफ इंडिया,
- गव्हर्नर ऑफ द स्टेट,
- आरबीआय,
- शेड्युल बँक,
- को-ऑपरेटिव्ह सोसायटी,
- को-ऑपरेटिव्ह बँक,
- कॉर्पोरेशन पब्लिक प्रायव्हेट, गव्हर्नमेंट कंपनी,
- लोकल ऑथॉरिटी,
- किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनी,
- याप्रकारे काही परिस्थितींमध्ये खाते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर सुध्दा करता येते.
- जर खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला.
- संयुक्त खात्यातील एका खातेधारकाचा मृत्यू झाल्यास उर्वरित खातेधारकांना आणि कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे किंवा खाते तारण ठेवले असेल तर त्या ऑथॉरिटीकडे.
पीक विमा भरला पेमेंटला अडथळे येताय अस करा पेमेंट
Post Office NSC Scheme व्याजदर
- योजनेमध्ये जमा रकमेवर वार्षिक 7.7% कंपाऊंड व्याजदर दिला जात आहे.
- जनरेट होणारे व्याज मॅच्युरिटी नंतर म्हणजे पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर खातेदारकाला जमा रकमेसह परत केले जाते.
- एक हजार रुपये पाच वर्षांसाठी जमा केले तर एकूण 449 रुपये व्याज जनरेट होतो.
- आणि पाच वर्षानंतर 1 हजार 449 रुपये परत मिळतात याप्रमाणे जर दहा हजार रुपये पाच वर्षांसाठी जमा केले.
- तर मॅच्युरिटीच्या वेळी व्याजासहित 14,493 रुपये परत मिळतील.
- जमा केलेल्या 50 हजार रुपयांच्या रकमेवर एकूण 22,465 रुपये व्याज जनरेट होतो.
- आणि शेवटी एकत्रित 72 हजार 465 रुपये परत मिळतात.
- किंव्हा एक लाख रुपये जमा केले तर एक लाख 44 हजार 930 रुपये परत मिळतात.
- एकूण 44 हजार 930 रुपये व्याज पाच वर्षांमध्ये मिळते.
- जर तुम्ही पाच वर्षांसाठी दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर एकूण व्याज जनरेट होणार चार लाख 49 हजार 300 रुपये.
- पाच वर्षात मिळतील 14 लाख 49 हजार 300 रुपये.
E PIK PAHANI KHARIP 2023 :ई पीक पाहणी खरीप हंगाम 2023 सुरू
Sukanya Samriddhi Yojana 2023 सुकन्या समृद्धि योजनेच्या नियमांत बदल, आता या मुलीना मिळणार लाभ