Land Record Rule 2023
Land Record Rule 2023 एक म्हणजे स्वतः कमावलेली आणि दुसरी वडीलोपार्जित वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे जी संपत्ती वडील आजोबा किंवा पणजोबा कडून लाभलेली असते त्याला वडिलोपार्जित संपत्ती असे म्हणतात.
![Land Record Rule 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
वडीलांच्या संपत्तीवर ‘मुलींचा’ वारस हक्क
- Land Record Rule 2023 जन्म नंतर मुलांचा आणि मुलींचा त्यावर हक्क तयार होतो.
- वडिलोपार्जित संपत्ती वर पत्नी आणि मुलांचा बरोबरीचा वाटा असतो.
- म्हणजे जर एका कुटुंबात तीन मुलं असतील तर त्या तिन्ही मुलांना समान तीन हिस्से मिळतील.
- आणि तिसऱ्या पिढीच्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या हिश्यातून समान वाटणी मिळेल.
- जर वडिलोपार्जित संपत्ती असेल आणि वडील आणि आई दोघांचा मृत्यू झाला असेल आणि त्यांना एक मुलगा आणि मुलगी तर त्या दोघांनाही समान वाटणी मिळेल.
- जर कदाचित वडिलांचा मृत्यू झाला आणि आई हयात असेल व त्यांना दोन मुले व दोन मुली किंवा तीन मुले किंवा एक मुलगी असेल तर पत्नीला अर्धा हिस्सा मिळतो.
- मुलांना अर्धा हिस्सा मिळतो त्यामध्ये त्यांची समान वाटणी होते.
![Land Record Rule 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पिक कर्जाची मागणी वाढली? शेतकऱ्यांना पीक कर्जाचे ८५३ कोटी ४८ लाख जमा
Land Record Rule 2023
- तसेच वडिलोपार्जित संपत्ती असलेल्या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला.
- आणि त्यांनी दुसरा विवाह केला तर दुसऱ्या पत्नीला त्या संपत्तीमध्ये काही अधिकार मिळत नाही.
- पण जर त्या दुसऱ्या पत्नीपासून त्यांना अपत्य असतील तर मात्र त्यांना समान वाटनी होते.
- 2005 पूर्वी दिलेल्या वारसाहक्क कायदा 1956 नुसार वडिलांच्या संपत्तीत मुलींना वगळून वाटणे व्हायची.
- परंतु 2005 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली व मुलांप्रमाणेच मुलींनाही संपत्तीत समान हक्क प्राप्त झाला.
- हिंदू कुटुंबामध्ये मुलगा हाच करता मानला जात असल्यामुळे त्यावेळी तसा कायदा होता.
- जर पूर्वी वाटणी झाली असेल तर त्या मुलीला वाटणी मिळणार नाही तसेच ती वाटणी आता रद्द करता येणार नाही.
- कारण त्यावेळी कायद्यात असे नियम लागू होते.
- त्याप्रमाणे वडील भाऊ नातेवाईक हे मुलीला कायदेशीररित्या तिचा वारसा हक्क नाकारू शकत नाही.
- मुलगी लग्नानंतर वडिलांच्या संपत्तीत दावा करू शकते व हिस्सा मागू शकते.
- मुलीने जर आंतरजातीय विवाह केला आहे आणि ते आंतरजातीय विवाह केला म्हणून तिचा वारसा हक्क नाकारत असतील ते बेकायदेशीर आहे.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पीक विमा भरला पेमेंटला अडथळे येताय अस करा पेमेंट
वडिलांनी स्वतः कमावलेली संपत्ती?
- Land Record Rule 2023 वडिलांनी जर संपत्ती स्वतः कमावली असेल तर मुलींना हिस्सेदारी द्यायची की नाही हे वडिलांच्या मर्जीवर अवलंबून आहे.
- जर त्यांना हिस्सा द्यायचा नसेल तर मुलगी काही करू शकत नाही.
- तिच्याकडे कायद्याने संपत्तीचा घेण्याचा अधिकार नाही.
- तसेच वडिलांचे संपत्ती जर स्वतः कमावलेली असेल आणि त्यांच्या मृत्यू पश्चात ती कोणा विशिष्ट व्यक्तीला देण्याबाबत सूचना केली नसेल.
- किंवा मृत्युपत्र किंवा इच्छापत्र केलेली नसेल तर त्यांच्या मुलांना त्यात समान हक्क मिळतो.
- अशा वेळेस मुलगी अविवाहित आहे की विवाहित असा भेदभाव करता येत नाही.
- हा कायदा हिंदू बौद्ध जैन आणि शीख समाजाला लागू होतो वरील माहिती हिंदू वारसा हक्क कायदा 2005 नुसार दिली आहे.
E PIK PAHANI KHARIP 2023 :ई पीक पाहणी खरीप हंगाम 2023 सुरू
Sukanya Samriddhi Yojana 2023 सुकन्या समृद्धि योजनेच्या नियमांत बदल, आता या मुलीना मिळणार लाभ