Ayushman Bharat Yojna 2023 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची अपडेट आहे राज्य सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना या दोन्ही योजनांचा आता एकत्रीकरण झालेला आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना दवाखान्याच्या खर्चासाठी पाच लाख रुपये आरोग्य कवच दिले जाणार आहे लवकर या योजनेचे कार्ड वाटप सुरू होणार आहे यासंदर्भात 28 जून 2023 रोजी मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकी मध्ये दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करून राज्यातील सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Ayushman Bharat Yojna 2023 कशा पद्धतीने या योजना राज्यात राबवल्या जाणार आहे या योजनेचा लाभ कसा दिला जाणार आहे याची सविस्तर माहिती पाहा खालील नुसार. माहिती व जनसंपर्क महासंचनलयाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आलेली आहे
मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे होणारे लाभ व वैशिष्ट्ये