Fake Fertilizer Update 2023 गेल्या चार ते पाच हवामानात परिणामकारक बदल झाला असून. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम राहण्यासह काही ठिकाणी रिमझिम, तर कुठे समाधानकारक पाऊस झाला. यामुळे अधिक विलंब न करता अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली आहे. या दरम्यान, पिकांसाठी खत आणि औषधी खरेदी करताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
Fake Fertilizer Update 2023 अकोल्यातील आसरा इंडस्ट्रीजवर झालेल्या कारवाईनंतर जिल्ह्याचा कृषी विभागही ‘अलर्ट मोडवर असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील १० टक्के शेतकऱ्यांचे अर्थचक्र वर्षातील दोन हंगामांवर विसंबून आहे. त्यापैकी खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून चार लाख हेक्टरपेक्षा अधिक पेरणी या हंगामात केली जाते.