Shetkari Anudan Yojana
Shetkari Anudan Yojana या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज महाडीबीटी वेबसाईटवर सादर करून द्या. महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान योजना लाभ घेण्यासाठी जो ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे तो अगदी सोपा आहे. जर पूर्ण माहिती असेल तर केवळ पाच मिनिटांमध्ये हा अर्ज सादर करू शकता नसेल तर माहिती घेऊन हा अर्ज सादर करू शकता. तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधल्यास अधिक सोयीचे ठरेल कारण त्यांकडे वाण कोणते उपलब्ध आहे हे कळेल. आणि त्यानुसार बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज केला तर अधिक सोयीच ठरेल.
अर्ज करण्याची पद्धत
- Shetkari Anudan Yojana महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर या आणि महाडीबीटी शेतकरी पोर्टल ओपन झाल्यावर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा किंवा आधार ओटीपी च्या साह्याने लॉगिन करू शकता.
- लॉगिन केल्यानंतर अर्ज सादर करा ही लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा त्याठिकाणी विविध पर्याय दिसतील त्यापैकी बियाणे औषधी व खते या पर्यायासमोरील बाबी निवडा या बटणावरती क्लिक करा.
- बियाणे अनुदान मिळण्याची पद्धत प्रात्यक्षिक आणि दुसरी पद्धत प्रमाणित प्रात्यक्षिक बियाण्यासाठी 100% अनुदान असते.
- तर प्रामाणिक बियाण्यासाठी 50% अनुदान मिळते अर्ज सादर करताना जी माहिती भरायची आहे ती व्यवस्थित भरा.
- तालुका गाव शहर सर्वे क्रमांक इत्यादी माहिती अगोदरच उपलब्ध असेल ही माहिती ज्यावेळेस महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केली होती त्या आधारावर ही माहिती आपोआप आली असेल.
- बियाणे असेल पीक निवडा पीक निवडल्यावर ज्यासाठी अनुदान पाहिजे आहे ती बाब निवडा जसे की प्रमाणित बियाण्याची वितरण किंवा पीक प्रत्यक्ष बियाण्याचा प्रकार निवडा.
- जुने वाहन हवे आहे की नवे ते निवडा जे बियाण लागत असेल ते दिलेल्या यादीतून निवडा किती क्षेत्रावर पिकाची लागवड करायची आहे ते क्षेत्र चौकटीत टाका आणि जतन करा या पर्यायावर क्लिक करा.
- त्या पर्यायावर क्लिक केल्यावर एक सूचना येईल घटक आधीपासूनच जोडला आहे म्हणजेच अर्ज सादर झाला नाही घटक आधीपासूनच जोडला आहे.
- मागील वर्षी कदाचित बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तो अर्ज रद्द करण्याचे लक्षात राहिल नाही.
- त्यामुळे अर्ज सादर होऊ शकला नाही जर नवीन असाल तर ही अडचण येणार नाही परंतु मागील वर्षी बियाणे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर अगोदर तो अर्ज रद्द करावा लागतो.
- कारण महाडीबीटी पोर्टलवर एका घटकासाठी एकदाच ऑनलाईन अर्ज सादर करता येतो तर यावर पर्याय म्हणजे अगोदरचा अर्ज रद्द करणे.
कुळकायद्यामधील जमीन खरेदी करावी का?
Shetkari Anudan Yojana अर्ज रद्द कसा करवा
- जुना अर्ज करण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटणावर क्लिक करा.
- विविध योजनांसाठी केलेल्या अर्जाची माहिती दिसेल बियाणे योजनेसाठी केलेला मागील अर्ज शोधा आणि त्यासमोरील कॅन्सल लाल रंगाच्या बटनावरती क्लिक करा.
- कॅन्सल बटणावरती क्लिक कराल त्यावेळी ओटीपी नोंदणीकृत मोबाईलवर जाईल त्यावर आलेला ओटीपी दिलेल्या चौकटीत टाका आणि सबमिट बटनावरती क्लिक करा.
- पहिला अर्ज रद्द झाला असेल परत एकदा नवीन अर्ज सादर करा पहिल्यासारखी घटक आधीपासूनच जोडलेला आहे अशा सूचना येणार नाही आणि अर्ज यशस्वीपणे जतन होईल.
- आणि बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन 23.60 पैसे भरावे लागतील हे पेमेंट कसे करावे लागते.
मनरेगा कामगारांसाठी आनंदाची बातमी
बियाणे योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारा शुल्क
- Shetkari Anudan Yojana बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी 23.60 पैसे एवढे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.
- त्यानंतर अर्ज सादर होणार आहे हे पेमेंट करण्याची पद्धत अशी आहे अर्ज जतन केल्यावर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे.
- अशी सूचना येईल अजून एखादा अर्ज करायचा असल्यास यास बटणावरती क्लिक करा किंवा आता कोणताही अर्ज करायचा नसेल तर नो बटणावरती क्लिक करा.
- नवीन अर्ज करायचा नसेल नो या बटनावरती क्लिक करा अर्ज सादर करा असे बटन दिसेल त्यावरती क्लिक करा एक सूचना येईल ती वाचून घ्या आणि पहा या बटणावरती क्लिक करा.
- योजनेसाठी क्रम म्हणजे प्राधान्य क्रमांक द्या अटी व शर्ती समोरील चौकट बॉक्स मध्ये टिक करा आणि अर्ज सादर करा बटणावर क्लिक करा.
- जसे अर्ज सादर करा या बटणावर क्लिक कराल तेवढे पेमेंट करण्याची तपशील दिसेल मेक पेमेंट या बटणावर क्लिक करा पेमेंट करण्याची पद्धत निवडा.
- यासाठी विविध पेमेंट पद्धती दिसेल त्यापैकी कोणतीही एक पद्धत वापरून पेमेंट करू शकता.
- यूपीआय पेमेंट पद्धत सगळीकडे वापरली जाते त्यामुळे क्यूआर कोडद्वारे पेमेंट करू शकता.
- पेमेंट केल्यावर कसलीही कृती करू नका पेमेंट पेज आपोआप रीडायरेक्ट होईल आणि 23.60 पैशांची पावती जनरेट होईल.
- बियाणे अनुदान योजनेसाठी यशस्वीपणे अर्ज सादर झाल्याची खात्री करा आणि सोयाबीन किंवा इतर कोणत्याही वेण्यासाठी अर्ज तर केला पण तो यशस्वीपणे सादर झाला का याची खात्री करून घ्या.
- त्यासाठी महाडीबी पोर्टलच्या मुख्य पेजवर या आणि महाडीबीटी डॅशबोर्ड च्या डाव्या बाजूला अर्ज केलेल्या बाबी हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर छाननीअंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा ज्या योजनेसाठी अर्ज केला आहे त्या सर्व योजना दिसणार आहे.
- यामध्ये बियाणे अडदान योजना असेल त्याची पावती प्रिंट करून घ्या प्रिंटचा पर्याय दिलेला आहे तर अशा पद्धतीने बियाणे अनुदान योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
Tar Kumpan Yojana 2023 :शेतकऱ्यांना खुशखबर लवकरच मिळणार 90% अनुदानावर तार कुंपण
One Response