Table of Contents
Property Nominee Registration 2 जो अर्ज देत आहात तो अर्ज तहसीलदार साहेबांची नावे देता त्यामुळे वर प्रति माननीय तहसीलदार असो आणि जो तालुका असेल त्या तालुक्याचे नाव लिहावे लागते. त्यानंतर अर्जदार म्हणून स्वतःचे नाव अगोदर लिहावे लागते आणि अर्जाचा विषय लिहावा लागतो त्या अमुक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे वारस या नात्याने नाव लावणे बाबत. आणि खाली अर्जाचा मुख्य मजकूर की अमुक व्यक्ती मयत झाला असून त्याचा खाते क्रमांक अमुक असा असून त्यानंतर त्याचे नावावर असणारी प्रॉपर्टी चे गट नंबर लिहावे लागते. त्यानंतर त्यामध्ये व्यक्तीला कोण कोण आणि कोणत्या नातेसंबंधाने वारस आहे याचा संपूर्ण तपशील आणि त्या वारसाचे संपूर्ण नाव वय आणि संपूर्ण पत्ता लिहावा लागेल. त्यानंतर सर्व वारसांची नावे मृत व्यक्तीचे वारस या नात्याने लावण्यात यावी असा मजकूर लिहून त्याखाली जो अर्जदार आहे त्याची सही करावे लागते.
वारसाच्या हक्काबाबत कायद्यामध्ये काय तरतूद असते
अर्जामध्ये आणि एफिडेव्हिट मध्ये कोणता आणि काय मजकूर असावा.
- Property Nominee Registration 2 ज्यावेळेस तहसीलदार साहेबांसमोर अर्ज आणि एफिडेव्हिट करतो त्यावेळेस अर्जदार एकच असेल तरी चालतो आणि त्या अर्जावर एफिडेव्हिट एकच वारसाच्या सह्या असल्या तरी चालतात.
- तलाठी कडे असा अर्ज आणि एफिडेव्हिट देत असताना वारस दारांच्या आधार कार्डची झेरॉक्स शक्यतो जोडणे आवश्यक राहते.
- त्यानंतर तहसीलदार साहेबांसमोरील द्यायचा अर्ज तयार झाला की त्यात मजकुराचे एफिडेव्हिट करावे लागते. कधी कधी शंभर रुपये तर कधी कधी त्याहून अधिक किमतीचे स्टॅम्पवर करणे गरजेचे असते.
- असा अर्ज आणि एफिडेव्हिट तयार झाला तर नागरी सुविधा केंद्र मध्ये तो अर्ज आणि एफिडेव्हिट देतात.
- साधारणपणे एक तास ते चार तास एवढे कालावधीनंतर त्या आठवडेविट वर तहसीलदार साहेबांचा सही शिक्का मिळतो.
- यानंतर दुसरा अर्ज करावा लागेल की जो संबंधित गावच्या गावकामगार तलाठी यांची नावे करायचा आहे
Property Nominee Registration 2 अर्ज पद्धत
- सर्वप्रथम वर मा.गावकामगार तलाठी जे गावाचे नाव असेल ते नाव लिहावे लागेल त्यानंतर जसं तहसीलदार समोर देण्यासाठीचा अर्ज पाहिला अगदी त्याच मजकुराचा अर्ज लिहावा लागतो.
- त्याबरोबर त्या अर्जामध्ये हे देखील लिहावे लागेल की तहसीलदार साहेबांसमोर इतर वारस नोंदी संदर्भात एफीडेव्हिड करून आणलेले आहे.
- त्याचा क्रमांक अमुक असा असून त्यामध्ये नमूद केलेप्रमाणे मृत व्यक्तीचे नाव काढून त्याचे वारस या नात्याने सर्व वारसांची नावे मृत व्यक्तीच्या प्रॉपर्टीला लावून द्यावी आणि त्याखाली अर्जदाराने सही करावी लागते.
- असा अर्ज आणि त्यासोबत सर्वतोपरी कागदपत्रे तहसीलदार साहेबांसमोर केलेले एफीडेव्हिड मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला,
- सर्व वारसांचे आधार कार्ड ची झेरॉक्स असे सर्व कागदपत्रे या अर्ज सोबत जोडून तलाठी यांच्याकडे दिली तर तलाठीकडे असणाऱ्या वारसाच्या रजिस्टर ला वारसांची नोंद लिहितात आणि कच्चा फेरफार लिहितात.
सातबारा उताऱ्याला नाव लावण्याची प्रक्रिया
फेरफार लिहिणे आणि फेरफार प्रमाणित करणे
- Property Nominee Registration 2 या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे तलाठी मिळालेल्या माहितीवरून फक्त फेरफार लिहितात परंतु त्या फेरफार वर काही हरकत आली नाही तर तो फेरफार मंजूर करण्याची जबाबदारी ही मंडल अधिकारी यांची असते.
- अर्जाने नावाची नोंद वारस रेकॉर्डला नोंदवले नंतर जो कच्चा फेरफार लिहिला जातो त्याची नोंद होण्यासाठी किंवा कोणाची त्या नोंदीला तक्रार आहे का यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाते.
- दिल्या मुदतीत जर कोणाची तक्रार किंवा हरकत या नोंदीला आली नाही तर मंडलाधिकारी सर्कल तो फेरफार प्रमाणित करतात.
- आणि सातबारा उतारा वरील मयत व्यक्तीच्या नावाला कंस करण्यात येऊन सर्व वारसांची नावे त्या मृत व्यक्तीचे वारस या नात्याने सातबारा उताराला लावली जाते.
एखाद्या व्यक्तीने हरकत घेतली असेल?
सातबारा उताऱ्याला नाव लावण्याची प्रक्रिया
- Property Nominee Registration 2 तहसीलदार साहेबांसमोरील अर्ज आणि एफिडेविटला एक ते दोन दिवस तसेच तलाठी नोंद लिहिणे आणि ती प्रामाणिक होणे.
- यासाठी 15 ते 16 दिवस एकूण 18 ते 20 दिवसांमध्ये अशी वारस नोंद होऊन जाते असे वारस नोंदीमध्ये एखाद्या वारसाचे नाव डावलले गेले तर कायद्याने काय करता येईल.
- 1)
- पंधरा दिवसांच्या मुदतीचे हरकत मागवली की लगेच हरकत घेतली असेल.फेरफार झाल्यानंतर हरकत घेतली असेल.
- पहिला परिस्थितीचा विचार केला तर फेरफार लिहिल्यानंतर तलाठी यांनी पंधरा दिवसांची जी मुदत दिली असेल त्या पंधरा दिवसांच्या मुदतीच्या आत हरकत नोंदविले असेल तक्रारी अर्ज दिलेला असेल.
- तर तलाठी साहेब ते सर्व वारस नोंदीचे रेकॉर्ड मंडल अधिकारी म्हणजे सर्कल ऑफिसर यांच्याकडे वर्ग करतात आणि मंडळ अधिकारी त्या प्रकरणाची तक्रार रजिस्टर लिहितात ज्यांनी वारस नोंदीसाठी अर्ज दिलेला होता त्यांना.
One Response