Thibak Sinchan Subsidy महा डीबीटी पोर्टलच्या अंतर्गत सूक्ष्म सिंचन सुविधेसाठी राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना ज्या अंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासाठी अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी साठी 55% आणि बहुउधारक शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान घोषित करण्यात आल होत. त्यानंतर या योजनेमध्ये 2021 22 साठी मुख्यमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या अंतर्गत पूरक अनुदान.
अल्पभूधारक शेतकरी आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यासाठी 25% आणि बहुउधारक शेतकऱ्यांसाठी 30% या पद्धतीने अत्यल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांना 79 टक्के आणि बहुउदारक शेतकरी बांधवांना ७५ टक्के अनुदान घोषित करण्यात आलं होत. या अगोदर ही योजना महाराष्ट्रातील 246 तालुक्यांमध्ये लागू होते त्यानंतर याची व्याप्ती वाढवून आणखी ती 107 म्हणजे अशा पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे सर्व तालुक्यांमध्ये ही योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
One Response