Table of Contents
PM Kisan 14th Installment 25 मे ते 4 जूनच्या दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याचा वितरण होणार आहे आणि यासाठी राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी पात्र व्हावे आणि कोणत्याही शेतकऱ्याचा हप्ता मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे यासाठी राज्याचे कृषीयुक्त सुनील चव्हाण यांच्या माध्यमातून एक पत्र काढून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आल आहे.
अटी शर्ती
- PM Kisan 14th Installment शेतकऱ्यांना हप्त्याचा वितरण करत असताना केवायसी केली तर लँड शेडिंग नो मध्ये हप्ता मिळत नाही लँड सेटिंग केलं तर बँकेला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे हप्ता मिळत नाही.
- आणि अशा विविध कारणांमुळे शेतकरी अपात्र होतात अशा अपात्र होणारे शेतकऱ्यांचा राज्यात आकडा खूप मोठा आहे.
- आणि याच पार्श्वभूमी वरती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याबद्दलची माहिती देऊन शेतकऱ्यांना या बाबी पूर्ण करण्यासाठीच आवाहन करण्यात आल आहे.
- या बाबीची पूर्तता करताना याची जबाबदारी कोणाची असेल आणि काय कारवाई करावी लागणार आहे याच्या संदर्भातील माहिती प्रसिद्धिपत्रिका मधून देण्यात आली आहे.
PM Kisan 14th Installment लँड शेडिंग नो
- लाभार्थ्यांचे लँड सीटिंग नो दाखवल्यानंतर त्या लाभार्थ्याला पुढील हप्त्याचे वितरण केलं जात नाही.
- याचा अर्थ की फिजिकल वेरिफिकेशन मध्ये नाव आल आहे जे भूमी अभिलेखचे अद्यावतचे रेकॉर्ड आहे ते या पीएम किसान मध्ये अपडेट होण आवशक आहे.
- यासाठी फिजिकल वेरिफिकेशन मध्ये नाव आला असेल तर सातबारा, बँकेच्या डिटेल, रेशन कार्ड,असेल अशा प्रकारची जी मागितलेले कागदपत्र आहे हे ग्रामसेवक, कृषीसाहेब,किंवा तलाठी, या पैकी एकाकडे वेद नमुन्यात फॉर्म भरून द्याव.
- यासाठी गावातील जे कृषी मित्र असतील या कृषी मित्रांकडे ते जबाबदारी देण्यात आली आहे बऱ्याच गावांमधून हा डाटा संकलित केला आहे तो डाटा तहसीलला पाठवलेला असतो.
- तरी बरेच शेतकरी अपात्र असते आणि ही पूर्णपणे कारवाई पार पाडण्याची जबाबदारी ही संबंधित तहसीलदारांची आहे.
- त्यामुळे तहसीलदार कार्यालयाला याच्या संदर्भात सूचना देण्यात आली आहे आणि डाटा अद्यावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
KYC प्रमाणीकरण
- PM Kisan 14th Installment लाभार्थ्याला स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून ओटीपी द्वारे किंवा जवळच्या सीएससी सेंटर वरती भेटून केवायसी पूर्ण करायची आहे.
- आधार संलग्न मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जातो किंवा आधार संलग्न बायोमेट्रिक आहे त्याचा व्हेरिफिकेशन केलं जातं आणि लाभार्थ्याची केवायसी केली जाते.
शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता होणार या दिवशी जमा
बँक खात्याला आधार संलग्र
- PM Kisan 14th Installment बऱ्याच शेतकऱ्यांनी बँकेमध्ये आधार कार्ड दिलेल असत परंतु बँकेच्या माध्यमातून आधार लिंक केल्यानंतर त्याचे एमपीसीआय मॅपिंग न झाल्यामुळे त्या लाभार्थ्याच्या बँक खात्याला आधार ची लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.
- आणि एमपीएससीला मॅपिंग न झाल्यामुळे पर्यायाने डीबीटी माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयांच्या वितरण करता येत नाही.
- यासाठी परत एकदा बँकेमध्ये जाऊन बँकेला आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
- किंवा जवळचे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये भेटून दोनशे रुपयांच्या डिपॉझिटसह पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते खोलून दोन दिवसांमध्ये हे प्रक्रिया पूर्ण करू शकता.
- आणि या तिन्ही प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या हप्त्याच वितरण केले जाणार आहे.
- याची प्रक्रिया 25 मे पर्यंत पूर्ण करावी अशा प्रकारचा आव्हान कृषी युक्त्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
- 25 मे पर्यंत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा मे मध्ये येणार हप्ता हा पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे.
- राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजना ही योजना राबवली जाण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- आणि या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी पात्र होतील या लाभार्थ्यांचा डाटा त्या योजनेसाठी घेतला जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- या प्रकारापैकी एखादा प्रकारांमध्ये असाल तर बीमा पूर्ण करून घ्या जेणेकरून येणारा 14 हप्ता खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल.
ration card latest update 2023 :रेशन कार्ड मोठी बातमी मोफत मिळणार
One Response