Partition Of Joint Family Property
Partition Of Joint Family Property बऱ्याच वेळा अस होत असत प्रॉपर्टी मधील सहहिस्तेदारांचे वाढप झालेले नसते किंवा कोणत्याही सदस्य दाराचा प्रॉपर्टी मधील येणार हिस्सा कन्फर्म झालेला नसतो किंवा वाटपासाठी खूपच उशीर होत असतो. काही असे पक्षकार असतात की त्यांच्या आजोबांचे चुलत आजोबांचे वाटप झालेले नसते तर अशा परिस्थितीमध्ये अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जाव लागत ज्या अडचणींमुळे पैसा आणि वेळ दोन्ही कोर्ट कचेरी मध्ये घालावा लागतो तर याविषयी माहिती पाहा.
वाटप लवकर न केल्याने काय होत
- 1)
- Partition Of Joint Family Property सह हिस्सेदार सर्वच्या सर्व प्रॉपर्टीची किंवा काही प्रॉपर्टीची विक्री करू शकतो सर्वात कॉमन घडत असली ही बाब आहे.
- एखादा सह हिस्सेदार त्याच्या नोकरीनिमित्त किंवा उदरनिर्वाहासाठी परगावी राहत असेल.
- आणि अन्य दुसरा सहहिस्सेदार जो गावामध्ये राहत असतो तो संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून किंवा ए कु में अशी नावची नोंद असते.
- त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर एकमेव वारस असल्याचे भासून एकट्याच्या नावाची नोंद सातबारा उताऱ्यावर लावून ते संपूर्ण प्रॉपर्टी विकू शकतो किंवा त्या प्रॉपर्टी मधील काही भागाची विक्री करू शकतो.
- या प्रॉपर्टी मध्ये जर दोन्ही सह हिस्सेदारांमध्ये वाटप झालेले असेल तर एका सहहिस्सेदाराने दुसऱ्या सहहिस्सेदाराचा हिस्सा डावलून त्याच्या हिस्स्याची विक्री केलीच नसते किंवा त्याला करताच आली नसती.
पाहा सरकारतर्फे जमीन संपादित केल्यावर
- 2)
- जर वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये चतुःसीमापूर्वक वाटप झाले नसेल आणि त्या प्रॉपर्टी मध्ये बांधकाम वगैरे करायचे असेल तर सहहिस्सेदार चतुःसीमापूर्वक आणि सरसनिरस मनाने वाटप झाले नसल्याने बांधकाम करू देणार नाही.
- किंबहुना कोर्टामध्ये विरुद्ध किंवा बांधकामाविरुद्ध stay घेऊ शकतो त्यापुढे जाऊन प्रॉपर्टी विकसित करायची असेल किंवा काही विकासकामे त्यामध्ये करायची असेल तर त्या सहहिस्सेदाराची संमती घ्यावी लागते.
- आणि शक्यतो असे घडत नाही एखादा सहहिस्सेदार त्या बांधकामाला किंवा विकासनाला परवानगी अथवा संमती देईल आणि मग कुटुंबामध्ये वादविवाद उत्पन्न होण्याची दाट शक्यता असते.
- 3)
- जर नाव प्रॉपर्टीच्या सातबारा उताऱ्यावर सामाईकत असेल तर तो त्या प्रॉपर्टी मधला हिस्सा विकू शकणार नाही.
- आणि वाटप झाल्याशिवाय त्यांचा प्रत्येकाच्या हिस्स्याचा स्वतंत्र सातबारा किंवा स्वतंत्र नकाशा बनलेला नसल्याने सामाईक प्रॉपर्टी असेल.
- जर त्यामध्ये प्रत्येकी कोणाला किती हिस्सा येत आहे हे जर माहिती असेल तरी त्या प्रॉपर्टी चे चतुसिमापूर्वक जोपर्यंत वाटप होत नाही तोपर्यंत कायद्याने त्या प्रॉपर्टीची विक्री करता येणार नाही.
प्रॉपर्टी मधील अविभाज्य हिस्स्याची विक्री करत असेल त्याबाबतच काय ?
- अशावेळेस अविभक्त खरीदस्ताचे सह हिस्सेदाराची संमती देणार म्हणून सही घ्यावी लागते.
- त्या झालेल्या खरेदीदस्तानंतर दोन्ही सहहिस्सेदारांमध्ये दिवाणी दावे किंवा अन्य कोर्ट कारवाई सुरू होतात.
- आणि त्यामुळे आयुष्यभरासाठी सहहिस्सेदारांमध्ये वैर आणि भांडणे निर्माण होतात त्यामुळे प्रॉपर्टी संदर्भाने लवकरात लवकर वाटप करून घेणे आवश्यक असते.
वडिलोपार्जीत संपत्तीतून मुलिंचे नाव वगळल्यास काय करावे
Partition Of Joint Family Property
- Partition Of Joint Family Property ज्यावेळेस एखाद्या प्रकल्पासाठी सरकारतर्फे जमीन संपादित केली जाते आणि त्या संपादित झालेल्या जमिनीचा जेव्हा मोबदला ठरवला जातो
- त्यावेळेस सातबारा उताऱ्यावर किती नावे आहे हे पाहिले जात नाही त्याऐवजी हे पाहिले जात कि सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र किती आहे.
- किंवा एखाद्याच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र पाच एकर आहे आणि सातबारा उताऱ्यावर तेरा नावे आहे.
- तर येणारे भूसंपादनाचे पैसे 20 लाख रुपये त्या सातबारा उतारा मधील सर्व सहहिस्सेदारांना कसे वाटप करणार.
- कारण सातबारा उताऱ्यावरील जी 13 नावे असेल ते सर्व एकमेकांचे भाऊ-बहीण असतीलच असे नाही कोणी 3 व्यक्ती एखाद्या भावाचे मयत वारस असेल.
- अशा परिस्थितीमध्ये 13 हिस्सेदारला समान हिस्सा आणि त्या समान हिस्स्या प्रमाणे त्या 20 लाख रुपयांमधील समान वाट्याने पैसे देणे हे कायद्याने आणि सद्सद्विवेकबुद्धीने चुकीचे ठरते.
- त्यामुळे त्या पैशासाठी किंवा त्यामध्ये येणाऱ्या हिस्स्यासाठी कलह निर्माण होतो आणि एखाद्या सहहिस्सेराने जर तशी हरकत किंवा तक्रारी अर्ज संबांधीत भूसंपादन अधिकारी यांना दिलि तर भूसंपादनाचे सर्वच पैसे स्थगित ठेवले जाते.
- आणि मग कुटुंबात असलेले प्रेमळ आणि शांततापूर्ण वातावरण ढवळले जाते आणि एकमेकांविरुद्ध क्लेश निर्माण होतो,
- यामुळे सहहिस्सेदारांमध्ये वेळेत वाटप होणे आणि ते वाटप सरसनिरसमनाने होणे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे चतुसीमापूर्वक होणे अतिशय गरजेचे असते.
National Saving Certificate 2023 :पाहा पोस्ट ऑफिसमध्ये एफ डी चे फायदे
How To Remove Illegal Possession From Property :प्रॉपर्टी मधील अवैध कब्जा कसा काढावा
One Response