Krushi Unnati Yojana 2023
Krushi Unnati Yojana 2023 कृषि उन्नती योजनेअंतर्गत बियाणे व लागवड उप अभियानाअंतर्गत राज्यात ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी सन २०२२-२३ या वर्षातील सर्वसाधारण प्रवर्गाचा २४०१ ३९९५ या लेखाशिर्षाअंतर्गत (केंद्र हिस्सा) रु. ६४८.८० लाख इतका निधी सन २०२३ – २४ या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना वितरीत करण्यात येत आहे.
शासन निर्णय
- 1) Krushi Unnati Yojana 2023
- त्यास समरुप २४०१ ए १५४ या लेखाशिर्षाअंतर्गत राज्य हिस्सा रु. ४३२.५३ लाख निधी दि.३१.०३.२०२३ रोजी वितरीत करण्यात आलेला आहे.
- २)
- सदर योजनेअंतर्गत होणारा खर्च चालू सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता मंजूर केलेल्या अनुदानातून भागविण्यात येऊन पुढील लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
खतासाठीच्या अनुदानासाठी क्लिक करा
सर्वसाधारण प्रवर्ग केंद्र हिस्सा लेखाशिर्ष
- Krushi Unnati Yojana 2023 २४०१ पीक संवर्धन,
- (००) (२३) कृषि उन्नती योजना- बियाणे व लागवड साहित्य (केंद्र पुरस्कृत योजना)
- (केंद्र हिस्सा ६० टक्के)
- २४०१ ३९९५ (कार्यक्रम)
- ३३, अर्थसहाय्य
- ३)
- सदर योजना राबविताना खालील अटी व शर्तींचे पालन करण्यात यावे.
- १.
- सदर योजना केंद्र शासनाच्या संदर्भाधीन मार्गदर्शक सूचनांनुसार व केंद्र शासनाच्या निधी वितरीत करण्याच्या अटी व शर्ती नुसार राबविण्यात यावी.
- २.
- खर्चाचे लेखे सुव्यवस्थित ठेवुन सदर खर्चाचे लेखा परिक्षण अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्रे केंद्र व राज्य शासनाला लवकरात लवकर प्रगती अहवालासह सादर करण्यात यावेत.
- ३.
- योजनेच्या वेगवेगळ्या बाबींवरील भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल केंद्र व राज्य शासनास प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत सादर करण्यात यावा.
- ४.
- योजनेशी संबंधित ताळेबंद व लेखापरिक्षण जमा खर्चाच्या रकमा यांचा अहवाल अंमलबजावणी यंत्रणेने द्यावा. त्यामध्ये वर्षाच्या सुरुवातील अखर्चित रकमा व व्याजाद्वारे मिळालेले उत्पन्न स्पष्टपणे नमूद करण्यात यावे. जेणेकरून पारदर्शी स्वरुपात रकमा विचारात घेता येईल व सदिग्धता राहणार नाहित.
- ५.
- कोणत्याही परिस्थितीत मंजूर कार्यक्रमापेक्षा जास्तीचा कार्यक्रम राबविला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
- ६.
- सदर योजनेकरीता प्राप्त झालेला निधी हा ज्या संवर्गासाठी मंजूर केलेला आहे त्याच संवर्गासाठी खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी.
लागवडीसाठीच्या अनुदानासाठी क्लिक करा
- ४) Krushi Unnati Yojana 2023
- सदर योजनेकरीता आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना योजनेचे नियंत्रण अधिकारी म्हणून व त्यांच्या कार्यालयातील सहायक संचालक,
- लेखा – १ यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
- ५)
- सदर निधी खर्च करतांना विहित कार्यपध्दती अनुसरुन सर्व वित्तीय कायदे/ टेंडर नियामावली व नियमांचे / प्रक्रियेचे / वित्तीय अधिकारांच्या मर्यादेत.
- P. W.D. म्यॅनूअलच्या अधिन राहून/C.V.C.तत्वानूसार / CAG च्या निर्देशानुसार / प्रचलित शासन निर्णय/नियम/परिपत्रक/ तरतुदीनुसार, बजेट व कोषागार नियमावलीनुसार खर्च करण्याची कार्यवाही अंमलबजावणी यंत्रणांनी करावी.
- कोणत्याही परिस्थितीत कुठलाही शासन निर्णय/अधिकाराचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रिय कार्यालयाची राहिल.
- ६)
- प्रस्तुतचा शासन निर्णय हा महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका (भाग – १) १९७७ मधील परिच्छेद १४२ व १४४ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या शक्तीनुसार.
- नियोजन विभागाच्या मंजूरीनुसार व वित्त विभागाने अनौ.सं.क्र.१३०/२०२३/व्यय-१, दि.२७.०४.२०२३ नुसार दिलेल्या मंजुरीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
- ७.
- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक २०२३०५०४१६२८११८१०१ असा आहे.
Magel Tyala Vihir 2023 :आता मागेल त्याला मिळेल विहीर आताच करा अर्ज
Thibak Sinchan Yojana 2023 :80% अनुदानासाठी ठिबक सिंचन योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा
One Response