Table of Contents
Mahila Bachat Gat महिला बचत गट मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात कसा अडकत चालला आहे सर्वाधिक मायक्रो फायनान्स कंपन्या असणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश ऐकून खरं वाटणार नाही पण ही रियालिटी आहे.
महिला बचत गट मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात कसा अडकत आहे
- Mahila Bachat Gat राज्यातील 50 ते 55% गरीब कुटुंबांना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज पुरवठा होत असतो कर्ज देताना महिलांच्या हाती थेट पैसा गेला तर त्या पैशांचे पुरुषांपेक्षा महिला उत्तम व्यवस्थापन करतात.
- खर्चातील काटकसर कर्जाचे योग्य नियोजन घर खर्च कुटुंबाच्या गरजांसाठी व्यवसाय किंवा स्वयंरोजगारासाठी उपयोग करतात.
- याशिवाय व्यवसाय उद्योग या माध्यमातून महिला मेहनतीने रोजगार निर्मिती करून स्वतःचा विकास करतात.
महिला पैश्याचा वापर कसा करतात
- Mahila Bachat Gat खाद्यपदार्थ उदबत्ती,
- मेणबत्ती,
- पापड,
- फराळ मसाले,
- अश्या वेगवेगळे पदार्थ आणि उद्योग व्यवसाय महिलांनी उभे करून स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करतात असा दावा या मायक्रोफायनच्या अहवालातून देण्यात येतो.
- वास्तवात गंगा उलटी वाहताना दिसते कारण हाताच्या बोटावर मोजणी इतके महिला बचत गट आणि महिला वगळता कंपन्यांच्या कर्ज पुरवठ्याच्या व्याज आणि विविध चार्जेसमुळे विकासाऐवजी कर्जाच्या चक्रात अडकलेल्या महिलांची मोठ्या संख्येने ग्रामीण भागात पाहायला मिळते.
Mahila Bachat Gat कर्ज परत फेड करण का कठीण होत
- विविध कारणांनी शाश्वत उत्पन्नाचा आर्थिक स्त्रोत नसणं आणि कंपन्यांच्या कर्जाचे अव्वाच्या सव्वा व्याजदर चक्रवाढ व्याज विविध चार्जेस आणि दंड रक्कम यामुळे महिलांना कंपन्यांकडून घेतलेलं कर्ज परतफेड करणं कठीण होऊन जातं.
- पहिले कर्ज फेडण्यासाठी कंपन्यांकडूनच दुसरे जास्तीचे कर्ज घ्यावे लागते कर्ज घेण्याची वारंवारता वाढत जाते एकाच वेळी दोन किंवा तीन कंपन्यांचे कर्जदार होण्याची वेळ ही महिलांवर येते.
- यातून हळूहळू खांद्यावरील कर्जाचा बोजा वाढत जातो त्यातून महिला कर्जाच्या चक्रविहात अडकून जातात.
- ज्या महिला आर्थिक बाबतीत सक्षम नसतात किंवा कोणाचाही आधार नसतो ज्यांच्याकडे भांडवल नसतं योग्य सल्ला देणारी व्यक्ती कोणीही नसते.
- महिलांना कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्वावलंबी बनण्यासाठी कर्जाची अत्यंत गरज असते अशाच महिला बचत गटाच्या सदस्या होतात.
- यामध्ये भूमिहीन अल्पभूधारक मजुरी रोजंदारी करणाऱ्या पशुपालक घरगुती लघुउद्योग घरकाम स्वतःचा व्यवसाय स्वतःची शेती करणाऱ्या तळागाळातील महिलांचा समावेश होतो.
महिलाना मिळणार दहा लाख पर्यन्त कर्ज फक्त तीन दिवसात
महिलाना कश्या साठी कर्जाची गरज असते
- Mahila Bachat Gat महिलांना व्यवसाय उद्योग कौटुंबिक गरजा पशुपालन शेतीतील गुंतवणूक मुलांचे शिक्षण आरोग्य समस्या अशा वेगवेगळ्या कारणांसाठी कर्जाची गरज भासते.
- महिलांनी कर्ज घ्यायचं असेल तर बँका कडे तारण ठेवण्यासारखं काहीच नसल्याने बँका कर्ज देत नाही.
- दुसरीकडे खाजगी सावकाराच्या मनमानी व्याजदरामुळे कर्ज परवडत नाही कंपन्यांकडून मात्र तात्काळ आणि कमी कागदपत्रात कर्ज मिळतं.
- बचत गटातील महिलांना कितीही बचतीची सवय असली तरी दिवसेंदिवस व्यवसाय उद्योगात वाढती स्पर्धा असणं अत्यल्प मोलमजुरी शेतीत निर्माण झालेले दिसते.
- यामुळे उत्पन्नाची घसरण आणि वाढती महागाई अशा विविध कारणांनी कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील असा शाश्वत उत्पन्नाचा आर्थिक स्त्रोत तयार होत नाही.
सिबिल स्कोर खराब असल्यानंतरही बँक देईल कर्ज
कौटुंबिक दर्जा
- Mahila Bachat Gat परिणामी कौटुंबिक दर्जा पूर्ण करण्यास आणि इतर कारणांनी कर्ज घ्यावाच लागतं बचत गटांतर्गत वैयक्तिक महिला सदस्य एकमेकींच्या जामीनदार होऊन कंपन्यांकडून कर्ज मिळवतात.
- ग्रामीण भागात बदलत्या स्वरूपामुळे व्यवसाय धंदा उद्योग व्यापार फारसे काही यशस्वी होण्याची शक्यता नसते.
- त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड ही मोलमजुरी रोजंदारी छोट्या व्यवसाय उद्योग करून करावी लागते एवढं करूनही कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही.
- तर घरच्या दवणीची जनावर जसं की गाई असतील म्हशी असतील शेळी मेंढी बैल शेतीमाल घर शेती सोने दागिने मौल्यवान वस्तू यांची विक्री करून कर्जाची परतफेड कुठल्याही परिस्थितीत करावी लागते.
मायक्रोफायनन्स कंपन्यांकडून महिलांचा टार्गेट कसा होतो
- Mahila Bachat Gat मायक्रोफायनन्स कंपन्यांकडून महिलांना टारगेट करून कर्ज वाटप केलं जातं कंपन्यांकडून महिलांना बचत गटांना कर्ज दिल तर जास्त प्रमाणावर उपयोग होतो.
- कारण महिला घेतलेल्या कर्जाचा थेट जिवन उन्नतीसाठी उपयोग करतात असं या मायक्रो फायनान्स कंपन्यांचे मत आहे.
- दुसरं महिला कर्जवेत फेटतात कंपन्यांकडून कर्ज देताना महिला मोल मजुरी रोजंदारी करून कर्जाच्या हप्ते देऊ शकतील का?
- एवढाच विचार केला जातो यासंदर्भात एका कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी खाजगीत सांगितले महिलांच्या समस्या लक्षात घेऊन कर्ज पुरवठा करण्यात येतो.
- यामध्ये महिला बचत गटाला जरी कर्ज देत असला तरी कर्जाची रक्कम महिलांच्या वैयक्तिक खात्यात जमा केली जाते बचत गटातील महिलाच एकमेकींना जामीनदार असले त्याचा प्रश्न येत नाही.
- कारण महिलाच जामीनदार असल्याने कर्जाची मागणी आणि वसुली बचत गटातील महिलाच करतात महिलांना असलेली बचतीची सवय पैशांचा काटकसरीने वापर व्यवसाय उद्योग यामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी या सगळ्या गोष्टींमुळे कंपन्यांसाठी महत्त्वाचे असतात.
धान्याला कीड लागू नये म्हणून काय करावे
- Mahila Bachat Gat कंपनी कर्ज घेणाऱ्यांनी कशासाठी कर्ज घेतले याच्याशी काही संबंध ठेवत नाही केवळ कर्ज घ्या एवढंच कंपन्यांचं टार्गेट असतं
- कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्ज शिबिर सेमिनारमध्ये सामाजिक बांधिलकीची भूमिका मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून मांडली जाते.
- गरजवंतांना कर्ज पुरवठ्याच्या रूपाने आधार देऊन आम्ही उपकार करत असल्याचं कंपन्यांकडून दाखवलं जातं जाणीवपूर्वक नफेकोर हेतू दिसू दिला जात नाही.
- कंपन्यांचे जास्तीत जास्त कर्ज वाटप आणि जास्तीत जास्त वसुली हे उद्दिष्ट राहिलेले दुसरा म्हणजे या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कर्ज वाटप आणि वसुली यांच्याशी जोडलेला असतो.
- त्यामुळे जास्तीत जास्त वेतन आणि नोकरीची सुरक्षितता यासाठी कर्मचाऱ्याला जीव ओतून कर्ज वाटप आणि कर्ज वसुली करावी लागते कर्जाची 100% कर्ज वसुली झाली पाहिजे असं टार्गेट कर्मचाऱ्यांना सुद्धा दिला जातो.
- काही कंपन्यांकडून थकीत कर्ज वसुलीचा कंत्राटी काम कर्ज वसुली एजंट संस्थांना टक्केवारी मध्ये दिला जातो त्यामुळे ठीक कर्ज वसुली संदर्भात नियमबाह्य आणि मर्यादा सोडणारे प्रकार घडल्याची उदाहरणे असतात.
Mahila Bachat Gat कंपन्यांचे कार्य व्यवहार आणि जाचक वसुली पद्धतीचे प्रतिसाद
- विधिमंडळात देखील उमटले राज्य शासनाकडून अजून ठोस पावली उचलली गेलेली नाही बचत गटांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मदतीसाठी शासनाकडून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची निर्मिती केली आहे.
- वेळखाऊ कर्ज प्रक्रिया आणि कर्मचाऱ्यांची अनास्था यामुळे बचत गटांना त्याचा फारसा फायदा होत नाही.
- सुरुवातीला तळागाळातील महिला गरजवंतांना कंपन्यांनी कमी म्हणजे 15 ते 20 टक्के व्याज दाराने कर्ज देण्यास सुरुवात केली होती.
- कंपनी कर्ज देताना महिला गटांकडून केवळ अर्ज म्हणजे हमीपत्र घेतलं त्यासोबतच मतदान कार्ड आणि जामीनदार घेऊन त्वरित पैसे उपलब्ध करून दिले
- त्यामुळे कर्ज मिळणं सुलभ वाटत मात्र कर्जाची सवय लागताच व्याजाचा दर 24 ते 26 टक्क्यांपर्यंत वाढवला याशिवाय दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केली तर ठीक नाहीतर सक्तीने कर्ज वसुली करण्यास सुरुवात केली जाते.
- जास्तीच व्याजदर आणि जाचक कर्ज वसुली असेल तर गरजेला वेळेवर पैसे मिळाल्यामुळे सुरुवातीला बचत गटांकडून फारसा विरोध केला जात नाही.
- त्यामुळे कंपन्यांना मनमानी करण्यास वाव मिळाला परिणामी महिला आणि महिला बचत गट मायक्रो फायनान्सच्या चक्रवात अडकून गेल्या दिसून येत. Mahila Bachat Gat
3 Responses