NOC
Dast Nondani विशेष म्हणजे अशा प्रकरणातील दस्त नोंदणी म्हणजे रजिस्ट्री दुय्यम निबंधक यांना नोंदणी अधिनियमानुसार नाकारता येत नसल्यामुळे या बाबीचा गैरफायदा काही ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी बनावट स्वरूपाचे गावठाण प्रमाणपत्र देऊन घेत होते.
जमीन एनए N/A (बिनशेती) कशी करायची? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
बनावट स्वरूपाचे गावठाण प्रमाणपत्र ?
- Dast Nondani अश्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मालमत्तेचे हस्तांतरणा बाबतची दस्त नोंदणी केल्या जात होती.
- याबाबतची अनियमित्त दुय्यम निबंधकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ही बाब निर्दशनास आणून दिली होती.
- छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांनी ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांच्या या बनवेगिरीचा बंदोबस्त करण्याकरिता.
Dast Nondani
- आता मालमत्ता ही मूळ गावठाण मध्ये असल्याचे प्रमाणपत्र निर्गमित करताना महसुली गट नंबर किंवा सर्वे नंबर मध्ये मालमत्ता नसल्याचे तलाठ्याकडून तपासणी करून घ्यावे असा आदेश आता दिलेला आहे.
- त्यासोबतच तलाठ्याच्या अहवालावरून मंडळ अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र सुद्धा घ्यावे लागणार आहे.
- त्यानंतरच आता मालमत्तेची दस्त नोंदणी म्हणजे रजिस्ट्री ही करता येणार आहे.
- असा आदेश आता 23 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी असतील कुमार पांडे यांनी काढला आहे.
- तसेच आठ अ मध्ये गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक आढळून आल्यास N.A म्हणजे नॉन अग्रिकल्चर म्हणजे अकृषिक आदेश दस्त नोंदणी म्हणजे रजिस्ट्री करिता आवश्यक करण्यात आलेला आहे. Dast Nondani
नवीन रेशन दुकान साठी अर्ज सुरू