Table of Contents
NA Plots For Sale Near Me जमीन NA (बिगर शेती कशी करायची जर काही लोकांना विश्रांतीसाठी, फार्म हाऊससाठी आणि पर्यटनासाठी ज्या जागा NA कराव्या लागतात त्या जागा एकाने खरेदी करण्यापेक्षा ग्रुपने खरेदी करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल कायदा कलम १४४ नुसार शासनाची परवानगी घेणे बंधनकारक असतात. विकासधीन नियमानुसार १० गुंठे पेक्षा कमी जमिनीच्या क्षेत्रासाठी खरेदी विक्री करता येत नाही.
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री, स्थावर तारण, बक्षीस पत्र आणि दस्ताऐवज होऊ शकत नाही. सदर जमिनीची नगर रचना विभागाकडून आरक्षण करणे, भुसंपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनार्थ जमीन संपादन करणे गरजेचं ठरेल. पुनर्व सितांसाठी जमीन प्राप्त करुन देणं आदी गोष्टी होऊ शकत नाही. किंवा त्यात धोका असतो. त्यासाठी बिगर शेती जमीन करणे गरजेचे ठरणार.
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला जमा होणार, तुम्हाला मिळणार का ?
कागदपत्रे
- NA Plots For Sale Near Me जिल्हा अधिकारी कार्यालयात मिळणारा फॉर्म भरून त्या फॉर्म वर कोर्टाचा ५ रुपयांचा स्टॅम्प असणे गरजेचे आहे,
- जमिनीच्या ७/१२ उताऱ्याच्या ४ झेरॉक्स,
- जमिनीचा फेरफार उतारा,
- आणि जमिनीचे महसूल विभागाकडे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर महसूल अधिकारी (तलाठी किंवा तहसीलदार) यांकडून जमिनीचे
- कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे,
- जमिनीचा ८ अ चा उतारा.
- तालुका भूमी अभिलेख रेकॉर्ड कार्यालया कडून मिळालेला जमिनीचा नकाशा.
- आणि इमारतीसाठी NA करायचे असेल तर बिल्डिंग प्लॅनच्या ८ ची प्रत लागते,
- जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या आत येत नसल्याची खातरजमा करण्यासाठी चा चालू ७१२ उतारा पाहिजे.
खुशखबर ! अखेर तुकडेबंदी कायद्यात बदल
NA Plots For Sale Near Me
- जमीन राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, जलदगती महामार्ग यामध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण,
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलदगती महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र,
- ग्रामीण भागात ग्राम पंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र,
- शहरी भागात महापालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र.
- जमीन बॉम्बे वहिवाट आणि शेती कायदा १९४८ अंतर्गत असेल तर NA साठी परवानगी ४३/६३ नुसार मिळेल,
- NA करण्यात येणाऱ्या जमिनीवर गाव पातळीवरील शेतकरी सहकारी विकास सेवा सोसायटीचे कोणतेही कर्ज किंवा भरणा नसल्याचा दाखला,
- जमीन NA करायची आहे ती कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची किंवा अधिग्रहित करायची नाही असे सांगणारे तलाठ्याचे पत्र,
NA करण्यासाठी भरावा लागणारा कर
- शेत जमिनीचे रहिवासी जमिनीत रूपांतर करायचे असेल तर रेडी रेकनर,
- (सरकारने ठरवलेला भाव ) त्यानुसार जमिनीच्या ५०% रक्कम भरावी लागते.
- शेतजमिनीचे व्यवसायिक जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजार भावाच्या ७५% रक्कम भरावी लागते.
- शेत जमिनीचे निम-सरकारी जागेत रूपांतर करायच असेल तर जमिनीच्या बाजार भावाच्या २०% रक्कम भरावी लागणार.
- रहिवासी NA चे औद्योगिक मध्ये रूपांतर करायच असल्यास जमिनीच्या किमतीच्या २०% रक्कम भरावी लागणार. NA Plots For Sale Near Me
या कार्डचे नेमके फायदे काय ? ई श्रम कार्ड अर्ज पद्धत,
NA Plots For Sale Near Me अर्ज कसा आणि कुठे करावा
- तहसिलदार, जमीन NA केल्याच्या नंतर कोणत्याही पर्यावरणीय अडचणी किंवा कोणत्या प्रकल्पास धोका पोहचणार नाही याची पडताळणी करतात.
- जमीन NA करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा.
- जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज मिळाल्यावर जिल्हाधिकारी ७ दिवसात तहसिलदाराना अर्ज पाठवतात.
- त्यानंतर तहसिलदार या अर्जाची छाननी करून अर्जदार व्यक्तीच जमिनीचा मालक आहे का नाही याची पूर्तता करतात. तलाठ्यांकडून जमिनीची चौकशी करून घेतल्यानंतर
- आणि अष्याप्रकारे सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी जमीन रूपांतरांचा आदेश काढतात.
- जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन रूपांतरणाचा आदेश काढल्यानंतर तलाठी कार्यालयात जमिनीची ‘NA’ नोंद केली जाते.