Jilha Parishad Mega Bharti ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील २,५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे २,०३० जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ७ मेदरम्यान भरतीची जाहिरात ७ प्रसिद्ध होणार असून यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे.
जिल्हा परिषद
- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागा भरणार त्यात राज्यातील आहेत.
वेळापत्रक जाहीर : सुमारे अठराशे जागा भरण्याची शक्यता
- Jilha Parishad Mega Bharti जिल्हा परिषदांमधील सहा हजारांवर जागांची भरती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
- जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ व गट ‘ड’ या संवर्गाच्या 2 हजार ७२६ जागा रिक्त आहेत.
- यामध्ये दोन हजार ५३८ जागा या गट क मधील आहेत, तर १८८ जागा गट ‘ड’मधील आहे.
- ग्रामविकास विभागाने राज्यातील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे.
- नाशिक जिल्हा परिषदेत एकूण दोन हजार ७२६ जागा रिक्त असून, त्यात गट ‘ड’मधील १८८ जागा रिक्त आहेत.
- मात्र, ग्रामविकास विभागाने गट ‘ड’ची रिक्त पदे भरण्यास परवानगी दिलेली नाही.
- केवळ गट ‘क’ संवर्गातील पदांची भरती करायची असल्यामुळे दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के जागांची भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे.
- गेल्या तीन वर्षांपासून ही भरतीप्रक्रिया रखडली होती. त्यात भरतीसाठी अर्ज मागवीत, ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.
- त्यामुळे बेरोजगारांमध्ये मोठी नाराजी होती.
- त्यानंतर पुन्हा फेब्रुवारीत या प्रक्रियेला प्रारंभ होणार असताना पुन्हा विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे ती लांबणीवर पडली होती.
Jilha Parishad Mega Bharti प्रक्रिया चार महिने चालण्याची चिन्हे
- फेब्रुवारीपासून प्रतीक्षेत असलेली पदभरतीची जाहिरात अखेर मे महिन्याच्या प्रारंभी जाहीर होणार आहे.
- पदभरती जाहिरातीनंतरही नियुक्त्या प्रदानपर्यंतची ही प्रक्रिया सुमारे तीन ते चार महिने चालण्याची शक्यता आहे.
- पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागवणे, उमेदवारी अर्जाची छाननी, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे, उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करणे, परीक्षा आयोजन आणि निकाल व नियुक्त्या देणे, अशी ही प्रक्रिया चालणार आहे.
Instant Loan On Adhar Card :आधार कार्ड वर 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये
Mahila Udyog Nidhi Yojana :महिलाना मिळणार दहा लाख पर्यन्त कर्ज फक्त तीन दिवसात
Land Record Nominees :जाणून घ्या काय असते वंशावळी? अधिकृत नोंदी कोठे मिळतील.
10 Responses