grain storage silo शेत मालाला चांगला भाव मिळण्याच्या आशेने शेतकरी काढणीनंतर शेतमाल घरातच साठवून ठेवतात शेतमाल घरात साठवून ठेवल्यामुळे दोन प्रकारे नुकसान होतो, ते म्हणजे या धान्याची गुणवत्ता चांगले राहत नाही, याशिवाय शेतमाल तसाच ठेवल्यामुळे पैशांची कमतरता भासते.
grain storage silo
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल घरात साठवून ठेवण्यापेक्षा वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षित साठवून ठेवावा अजून गोदामातील शेतमाल साठवून कशी फायदेशीर आहे. याविषयी शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ प्रशांत चासकर यांनी दिलेली माहिती पाहूया.
👉 वखार महामंडळाच्या गोदामच्या सर्व जिल्ह्यांची यादी 👈
शेतीमाल तारण व्यवस्थापन माहिती
- ज्या काळात सर्व शेतकरी एकाच वेळेस पिकाची काढणी करतात त्याच वेळेस शेतमालाला बाजार भाव कमी मिळतो.
- घरात शेतमाला एवढी काळजी घेऊन साठवला जात नाही त्यामुळे धान्याची नासाडी होते.
- घरामध्ये धान्याची पोती थरावर थर रचून ठेवले जातात शेतमालाच कीटक व बुरशीपासून संरक्षण होण्यासाठी विषारी किडनाशके गोळ्या वापरल्या जातात. grain storage silo
- त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढते त्यामुळे शेतमाल साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामासारख्या सुरक्षित जागेचा शेतकऱ्यांनी नक्की विचार करावा.
- शेतकऱ्यांनी शेतीमाल घरात साठवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्यास या शेतमालाला विमा संरक्षण तर मिळतच याशिवाय उंदीर, किडे, मुंग्या आणि बुरशी पासून संरक्षण होतं.
सरकार देतयं 1 रुपयात 4.5 लाख रुपये
शेतीमाल ठेवतांना शासनाने मासिक भाड्याचे ठरवलेले दर grain storage silo
- वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे ठरवलेले दर ही अत्यंत कमी आहेत.
- या शेतीमालाला सुमारे 7 रुपये प्रति महिना प्रति पते इतक्या कमी भाडं आकारला जातो.
- 50 टक्के गोदाम भाड्यात सूटही मिळते शेतकरी कंपनी असल्यास गोदाम भाड्यात 25% सूट मिळते.
- त्यानुसार गोदाम भाड्याचा हिशोब केल्यास सुमारे 4 ते 5 रुपये प्रतिप पोते मासिक बाळ्या शेतमालाचा संरक्षण होऊ शकतो.
- इतका कमी खर्चात जर आपल्या शेतमालाच महिनाभर संरक्षण होत असेल तर शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈
वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या सुविधा आहे
- उंदीर आणि भुशी पासून संरक्षण होण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामाची उंची ही जमिनीपासून सुमारे 3 फुटापर्यंत असते.
- गोदामाला ओलाव्यामुळे कोणताही नुकसान होत नाही. grain storage silo
- प्रत्येक पोत्याच्या थराखाली गोदामातील जमिनीलगत ड्रेनेज किंवा प्लास्टिकचा कागद अंथरला जातो.
- जेणेकरून दमट हवामान किंवा पावसाळ्यातील ओलसर हवामानामुळे धान्यामध्ये जमिनीतील ओलावा शोषला जात नाही, त्यामुळे सुद्धा धान्याचे संरक्षण होतं.
- गोदामाच्या छताला हवा खेळती राहण्यासाठी आणि प्रकाश गोदामात येण्यासाठी व्हेंटिलेटर बसवलेले असतात.
- गोदामातील खिडक्या समोरासमोर असल्याने हवा खेळते राहते या खिडक्यांना जाळ्या बसवल्याने बाहेरील पक्षी गोदामात येऊन साठवलेल्या धान्याचे नुकसान करत नाही.
- महामंडळामार्फत गोदाम आणि गोदामातील शेतीमालाला आग चोरी आणि कर्मचाऱ्यांकडून गैरवापर या तीन कारणासाठी मिळण्याचे संरक्षण दिला जातो.
- आग पासून संरक्षण व्हावं यासाठी आग रोधक यंत्रणा सुद्धा गोदामात बसवलेली असते.
मागेल त्याला सोलर, मंत्रिमंडळ मंजुरी
शेतमाल तारण कर्ज grain storage silo
गोदामातील शेतीमालावर गरज असल्यास 9% दराने तारण कर्जही काढता येतो किंवा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने दिलेली वखार पावती किंवा गोदाम पावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडे गहाण ठेवून त्यावर 6 टक्के दराने गरज असल्यास तारण कर्जही घेता येते.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम सुविधा ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारलेली असते. ही व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल वखार महामंडळाच्या गोदामातच ठेवण्यासाठी आग्रह असावं, यात शेतकरी कंपन्या आणि सहकारी संस्थांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच या सुविधेचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. grain storage silo