Pik Vima Online
Pik Vima Online पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023 करिता ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे, कोणत्या पिकाकरिता कोणती शेवटची तारीख आहे तसेच कोणत्या जिल्ह्याकरिता कोणती कंपनी शासनाकडून नियुक्त करण्यात आली आहे, तसेच इतर अधिक माहिती या लेखात पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023 करिताची जाणून घ्या खालील नुसार.
प्रधानमंत्री पिक विमा योजना
- पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी तीन वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
- यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.
आशा स्वयंसेविका ची दिवाळी मानधनात झाली मोठी वाढ
योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत Pik Vima Online
रब्बी हंगाम 2023-24 मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेस सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी हंगाम करिता ज्वारी या पिकाकरिता बागायत व जिरायत दोन्ही करिता 30 नोव्हेंबर 2023 ही असणार आहे. तुम्ही हे वाचलं का ?
तसेच गहू बागायत तसेच हरभरा रब्बी कांदा करिता 15 डिसेंबर 2023 व उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग पिकाकरिता 31 मार्च 2024 अशी अंतिम तारीख ही असणार आहे. त्यासाठी पिक विमा योजनेचे ऑनलाईन पोर्टल हे कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
रब्बी हंगामात गहू बागायत, रब्बी ज्वारी बागायत व जिरायत, हरभरा उन्हाळी भात, उन्हाळी भुईमू व रब्बी कांदा, इत्यादी सहा पिके या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग हा घेता येणार आहे.
👉 अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अशी करा सहभागी नोंदणी
- Pik Vima Online सन 2023 24 पासून सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
- त्या अनुषंगाने शेतकरी विषयाची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे.
- त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टल वर स्वतः शेतकरी यांना तसेच बँक विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र म्हणजे सीएससी केंद्र यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.
- रब्बी हंगामा करिता सुद्धा या ठिकाणी फक्त एक रुपयावरून शेतकऱ्यांना पिक विमा काढता येणार आहे.
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग नोंदणीसाठी सामूहिक सेवा केंद्र म्हणजे सीएससी धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रक्कम रुपये चाळीस रुपये देण्यात येते.
- त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र म्हणजे सीएससी धारकाकडून केवळ एक रुपया भरून पिक विमा योजने सहभाग नोंदवायचा आहे.
- कर्जदार शेतकऱ्यांना योजनेस सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेस सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे.
- कर्जदार शेतकरी योजने सहभागी होणार नसेल तर तसे त्यांनी विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.
- योजनेतील सहभागा संदर्भात शेतकऱ्यांना अडचण तसेच सामूहिक सेवा केंद्र ने म्हणजे सीएससी सेंटर चालकाने अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास अर्ज भरण्याकरिता त्यावेळेला आपल्या संबंधित पिक विमा कंपनीचे कार्यालय, नजीकचे बँक, तहसीलदार /तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क शेतकऱ्याला साधता येणार आहे.
योजना कार्यान्वयीन यंत्रणा पुढील प्रमाणे :- Pik Vima Online
कोणत्या जिल्ह्याकरिता कोणती कंपनी रब्बी हंगाम 2023 करिता शासनाकडून नियुक्त करण्यात आलेली आहे ते खालील प्रमाणे आहे.
- अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा या जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे.
- परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी आणि जालना, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे.
- त्यानंतर नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नियुक्त असणार आहे.
- छत्रपती संभाजी नगर, भंडारा, पालघर, रायगड या जिल्ह्यांसाठी चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नियुक्त आहे.
- वाशिम, बुलाना, सांगली, नंदुरबार, बीड या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे.
- हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव या जिल्ह्यांसाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नियुक्त करण्यात आलेली आहे.
- त्यानंतर यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक असणार आहे.
- लातूर जिल्ह्यासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ची निवड करण्यात आलेली आहे.
- अशा प्रकारे रब्बी हंगाम 2023 करीता पिक विमा अर्ज भरणे सुरू झालेले आहे. Pik Vima Online