Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana 2023 Online Apply जीआर यामध्ये मुलींचे मुलींचे जन्मदर वाढवणे मुलींचे शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे, यासाठी जर पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान दिलं जातं ते कसं यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे आणि ही योजना किंवा जीआर नेमका काय आहे की संपूर्ण माहिती जाणून घ्या.
‘लेक लाडकी योजना’
लेक लाडकी योजनेचा नवीन सादर करण्यात आलेला जीआर या योजनेअंतर्गत किंवा या नवीन जीआर अंतर्गत १ एप्रिल 2023 नंतर ज्या मुली जन्माला आलेले आहे तर त्या मुलींसाठी एक लाख एक हजार रुपयापर्यंतच अनुदान त्यांना दिला जाणार आहे.
एक एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमी करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे.
सदर योजनेचे उद्दिष्टे खालील प्रमाणे आहे :- Lek Ladki Yojana 2023 Online Apply
- 1) मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे,
- 2) मुलींच्या शिक्षणास चालना देणे,
- 3) मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे,
- 4) कुपोषण कमी करणे,
- 5) शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणणे,
- हे या योजनेचा उद्देश आहे.
अनुदान कसे मिळणार आहे
या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांना पिवळा व केशरी रेशन कार्ड आहे त्या कुटुंबातील मुलींना अशाप्रकारे मिळणार लाभ
- मुलींच्या जन्मानंतर 5000 रुपये, 1 लीत गेल्यानंतर 6000 हजार रुपये,
- 6 वीत गेल्यानंतर 7000 रुपये,
- 11 वीत गेल्यानंतर 8 हजार रुपये,
- आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये.
याप्रमाणे एकूण 1 लाख 1 हजार रुपये एवढी रक्कम मुलींना अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे.Lek Ladki Yojana 2023 Online Apply
अटी व शर्ती :- Lek Ladki Yojana 2023 Online Apply
ही योजना ज्या कुटुंबांना पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही योजना दिनांक एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहणार आहे तसेच घरामध्ये, कुटुंबामध्ये जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलीला ही योजना लागू राहील.
पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहते, मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
दिनांक एक एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी एक मुलगा आहे त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीच किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे.
लाभार्थी कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे, लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे, लाभार्थी कुठे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावे,
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2023
लागणारी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी जन्माचा दाखला,
- कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, ( वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे) याबाबत तहसीलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
- लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील)
- पालकाचे आधार कार्ड,
- बँकेचे पासबुकच्या पहिल्या पणाची छायांकित प्रत,
- रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी,
- 75 हजार रुपयाचा जो लाभ मिळणार आहे त्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झालेला असणार आहे म्हणूनच तिचं नाव मतदार यादी मध्ये नोंदवणं आवश्यक आहे.
- तिचं मतदान पत्र तिच्यासोबत असणं आवश्यक आहे,
- संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजे बोनाफाईड,
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र,
- अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहणार आहे, या सगळ्यांनी नोंद घ्यावी. Lek Ladki Yojana 2023 Online Apply
वारस नोंद करायची का? तलाठ्याशिवाय करा ‘असा’ घरबसल्या अर्ज
अर्ज कोठे करायचा Lek Ladki Yojana 2023 Online Apply
- लेक लाडकी योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे अंगणवाडी सेविका संबंधित पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांची असणार आहे.
- अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खासदार जमा करून ऑनलाइन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांकडे सादर करायचा आहे.
- हा पूर्ण जीआर पीडीएफ स्वरूपात वर लिंक दिलेली आहे आणि या योजनेचा फॉर्म सुद्धा या GR मधून डाऊनलोड करू शकता.
- डायरेक्टली तो फॉर्म इथून डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून तो व्यवस्थित भरून तुम्ही अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांकडे तुमचा अर्ज सादर करू शकता.