Namo Shetkari 2023
Namo Shetkari 2023 पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान योजना एप्रिलमध्ये जाहीर केली होती त्यानुसार पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना नमो किसान योजनेतून पहिला हप्ता गुरुवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथून वितरित करण्यात येणार आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना सुरु; काय आहेत नियम व अटी ?
हे निकष बंधनकारक
- Namo Shetkari 2023 पी एम किसान योजनेच्या चौदाव्या त्यासाठी इ-केवायसी करणे आणि बँक खात्याला आधार ची जोडणी करणे यांनी कशाची अंमलबजावणी पूर्णपणे करण्यात आली नव्हती.
- मात्र पंधराव्या हप्त्यासाठी हे दोन्ही निकष आता बंधनकारक करण्यात आले आहे.
- त्यामुळे राज्याच्या नमो शेतकरी योजनेसाठी देखील हे निकष लागू करण्यात आली आहे.
- पी एम किसान योजनेत चौदा व्या हप्त्यासाठी राज्यातील 85 लाख 60 हजार 73 शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून मान्यता देण्यात आली होती.
- मात्र एक इ-केवायसी व आधार जोडणी वेळेत पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांचे मागील थकलेले हप्ते चौदावे हप्त्यात समाविष्ट करून देण्यात आले होते.
- त्यामुळे ही संख्या अंतिम झालेली नव्हती असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
- तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यासाठी पी एम किसानच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी अंतिम करावी असे निर्देश राज्य सरकारने दिले आहे.
- म्हणजे राज्य सरकारने स्पष्ट सांगितली आहे की ज्या पीएम किसान लाभार्थ्यांना 14 हप्ता मिळाला होता.
- त्यांना आणि ई केवायसी आधार जोडणी न केलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्यांनी ई केवायसी केली आहे खात्याला आधार लिंक केला आहे त्यांनाच या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्यात येईल.
- आणि असे एकूण लाभार्थी जवळपास 94 लाखापर्यंत आहे.
100% अनुदानावर फळबाग लागवड योजनेला मंजुरी
Namo Shetkari 2023 सोमवारी पैसे बँकेत जमा होणार
- त्यानुसार राज्यासाठी देखील पीएम किसान सारखेच स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची जबाबदारी महाआयटीकडे देण्यात आली आहे.
- त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले आणि रविवारी (दि.23) जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम होणार आहे.
- राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांचा निधी दिला असून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी संबंधित बँकांकडे हा निधी सोमवारी वितरित केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
- म्हणजे 23 तारखेला हा निधी संबंधित बँकांना वितरित करण्यात आला आहे.
- आणि त्यानुसार आता शिर्डी येथे गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नमो शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करणार आहे.
- त्यामुळे याद्या अंतिम करण्याचे नियोजन युद्ध पातळीवर सुरू आहे.
- मात्र पी एम किसान योजनेतील लाभार्थी संख्येच्या तुलनेत नमो किसान नमो किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत फार फरक पडणार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
- तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता मिळाला होता.
- त्याबरोबर काही कारणास्तव ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले होते.
- मात्र 14 वा हप्ता मिळाला नाही त्यांना या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे.
E-KYC करा तरच मिळेल 5 लाख पर्यंत लाभ अशी करा E-KYC केवळ 5 मिनिटांत