SCSS Interest Rate Calculator
SCSS Interest Rate Calculator देशात राबवल्या जाणाऱ्या सर्व स्मॉल सेविंग स्कीम म्हणजे लहान बचत योजनांचे व्याजदर दर तीन महिन्याने म्हणजेच वर्षातील प्रत्येक कॉटरला अपडेट केले जातात आता 2023 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी काय व्याजदर लागू करण्यात आले आहे.
तुम्ही हे वाचलं का ? याची माहिती वित्त मंत्रालयाने म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने 29 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या ऑफिस मेमो मध्ये दिली असून कोणत्या योजनांचे व्याजदर बदलले आहे. व्याजदर 2023 24 या आर्थिक वर्षात 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीसाठी लागू असतील जाणून घ्या खालील नुसार.
ऑफिस मेमो – पाहा संपूर्ण माहिती
ऑक्टोंबर ते डिसेंबर व्याजदर
- SCSS Interest Rate Calculator सेविंग अकाउंट व्याजदर
- बचत खाते याच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही इथून पुढेही वार्षिक चार टक्के व्याजदर बचत खात्यावर मिळेल.
- टाईम डिपॉझिट खाते
- टाईम डिपॉझिट खाते जे एक दोन तीन आणि पाच वर्षांसाठी असते ज्याला पोस्ट ऑफिस टी.डी म्हणतो त्यावरील व्याजदरात सुद्धा यावेळी कोणताही बदल झाला नाही.
- अनुक्रमे 6.9% 7 / 7 आणि 7.5% असे वार्षिक व्याजदर इथून पुढेही कायम राहतील.
- जर पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्यावर या अगोदर 6.5% वार्षिक व्याजदर होता तो आता असेल वार्षिक 6.7% इतका आहे.
- ज्येष्ठ नागरिक बचत योजना
- ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज पोस्टाच्या या योजनेतून मिळते पण मागच्या तीमाही सारखेच या तिमाहीला सुद्धा सीनियर सिटीजन सेविंग स्कीमच्या व्याजदरामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
- जुना व्याजदर जो वार्षिक 8.2% होता तो इथून पुढेही डिसेंबर 2023 पर्यंत वार्षिक 8.2% च असणार आहे.
- आता दर महिना व्याज देणारी पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम या योजनेच्या व्याजदर मध्ये बदल झालेला नसून वार्षिक 7.4% व्याजदर येथे लागू असणार आहे.
SCSS Interest Rate Calculator
- नॅशनल सेविंग सर्टिफिकेट
- नॅशनल सेविंग सर्टिफिकेटवर वार्षिक 7.7% आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेमध्ये 7.1% व्याज मिळेल.
- यानंतर आहे ठराविक कालावधीमध्ये दाम दुप्पट करणारी योजना.
- किसान विकास पत्र
- या योजनेमध्ये पैसे 115 महिन्यांमध्ये 7.5% वार्षिक व्याजदरानुसार दुप्पट होतात.
- योजनेचा व्याजदर तोच राहणार असून कालावधी सुद्धा तितकाच असणार आहे.
- सुकन्या समृद्धी अकाउंट योजना
- या योजनेचा व्याजदर जुनाच म्हणजे वार्षिक 8 टक्के इतका लागू असेल यातही यावेळी कोणताही बदल झालेला नाही.
- वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या या ऑफिस मेमोची लिंक खाली दिलेली आहे त्याठिकाणी सविस्तर पाहू शकता.