Table of Contents
CM Relief Fund आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्ज करण्यापूर्वी खालील प्रमाणे प्राथम्याने कार्यवाही करावी.
महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना (मोफत उपचार):-
- मोफत उपचार :-
- CM Relief Fund या योजनेच्या जिल्हयाच्या समन्वयकास फोन करुन पेशंटला नामतालिकेवरील (Empaneled) दवाखान्यात (www.jeevandayee.gov.in) सोबतजिल्हा समजपकांचे नाव व संपर्कक्रमांकाची यादी. ॲडमिट करावे.
- चॅरिटी हॉस्पीटल (मोफत / सवलतीच्या दरात):-
- जिल्हयातील चॅरिटी हॉस्पीटलमधील उपलब्ध बेडबाबत माहिती चॅरिटी इन्स्पेक्टर/ त्यांचे कार्यालयातून घेवून
- त्यानुसार रुग्णास चॅरिटी बेड उपलब्ध असलेल्या दवाखान्यात ॲडमिट करावे. (www.charity.maharashtra.gov.in)
- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) (मोफत उपचार)-
- ०-१८ वर्षे वयापर्यंतच्या पेशंटसाठी या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात.
- जिल्हयाच्या समन्वयकास फोन करून योजनेतील दवाखान्यात ॲडमिट करावे. (www.rbsk.gov.in)
👉 महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना (मोफत उपचार)
CM Relief Fund मुख्यमंत्री सहाय्यता निधी :-
- 1) हृदयदरोग
- २) मेंदूरोग,
- 3) नवजात बालके
- 4) मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रत्यारोपण,
- 5) यकृत प्रत्यारोपण,
- 6) कर्करोग,
- 7) अपघात,
- 8) डायलिसिस,
- 9) हृदयप्रत्यारोपण,
- 10) CVA व 11) Bone Marrow Transplant ,
- या 11 गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकिय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.
- संपर्क क्र. 022-22026948
- सविस्तर माहिती व रुग्णालयाची यादी वेबसाईटवर आहे (cmrf.maharashtra.gov.in)
👉 चॅरिटी हॉस्पीटल (मोफत / सवलतीच्या दरात)
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना,
- CM Relief Fund महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालये यामध्ये लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
- व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या प्रयोजनार्थ उपलब्ध सिमित निधीचा ययोचित वापर व्हावा म्हणून उपरोक्त योजनांचा लाभ मिळू न शकणान्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून लाभ देण्यात येतो.
- रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या प्रकरणांची शहानिशा करणे शक्य नसल्यामुळे अशा रुग्णांना अर्थसहाय्य देय नाही.
- राज्याबाहेरील रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते.
- तसेच त्यांचेकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णांलयाना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचेकडील समितीच्या शिफारशीनुसार व त्यांनी अर्थसहाय्याची शिफारस केल्यास त्या रक्कमेच्या ५०% इतकी रक्कम प्रदान करण्यांत येत आहे.
👉 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यत निधी अर्ज
CM Relief Fund अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी.
- अर्ज (विहीत नमुन्यात)
- वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र, मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
- तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. 1.60लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
- रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
- रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
- संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
- रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
- अपघात असल्यास, FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे.
- अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.
- अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवून त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.