Potash Fertilizer
Potash Fertilizer खालील प्रमाणे नाव असलेल्या कंपन्यांच्या खत प्रकाराची खरेदी सुद्धा केलेली असेल तर नक्कीच ही चिंतेची बाब आहे. नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या खालील नुसार.
![Potash Fertilizer](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
राज्यात आला नवा 7/12 उतारा; सातबारा मध्ये करण्यात आलेला बदल
काय आहे खत प्रकरणाचा अहवाल
- तर राज्य शासनाच्या कृषी विभागाने बाजारात विक्रीकरिता आलेल्या विविध खत कंपन्यांच्या खताचे नमुने विविध ठिकाणावरून जमा करून गुणवत्ता तपासणी करिता प्रयोगशाळेत पाठविलेले होते. प्रयोगशाळेतून खत नमुन्याबाबत अहवाल प्राप्त झालेला असून एकूण नमुन्यांपैकी असलेल्या तक्त्यातील तब्बल 25 कंपन्यांच्या खताचे नमुने प्रयोगशाळा तपासणीमध्ये अपात्र ठरलेले आहे.
- सदर खताचे नमुने हे छत्रपती संभाजी नगर मधील कृषी विभागाच्या प्रयोगशाळेंमधील तपासणीमध्ये अपात्र ठरलेले आहे.
- सदर नमुने आता परत पर राज्यातील प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविण्यात येणार असून.
- तिथे सुद्धा ते नमुने अपात्र ठरल्यास संबंधित कंपनी विरुद्ध कृषी विभागाकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
- शेतकऱ्यांनी मात्र प्रार्थना करावी की बोगस खत कंपन्यांनी तपासणी प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना मॅनेज करून अहवाल बदलून न घ्यावा.
- असे पण परराज्यातील प्रयोगशाळेचा अहवाल सुद्धा कंपन्यांच्या विरोधात आला तरी शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले असेल ते भरून निघणार नाही.
- खरे तर अशा कंपन्यांची खते बाजारात विक्री करिता येण्याअगोदरच शासनाकडून त्या खतांची नमुने ही तपासली जायला हवी. dbt fertilizer
![Potash Fertilizer](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
तलाठी सज्जा मुख्यालयी राहण्याबाबत परिपत्रक
Potash Fertilizer अप्रमाणित खतांच्या कंपन्या
अप्रमाणित | खतांच्या | कंपन्या |
कंपनीचे नाव | खतांचे प्रकार | नमुने |
इफको | २०:२०:०:१३ | 1 |
झुआरी ॲग्रो केम | सिंगल सुपर फॉस्पेट | 2 |
आरसी फर्टिलायझर | सिंगल सुपर फॉस्पेट | 5 |
केपीआर क्रॉप सायन्स | सिंगल सुपर फॉस्पेट | 3 |
कोरामंडल १ | एसएसपी | 3 |
ग्रीनफिल्ड ॲग्रिकेम | १८:१८:१० | 1 |
ढेकळे सेंद्रिय | पीडीएम पोटॅश | 1 |
यारा खत | एनपीके | 1 |
यारा खत | कॅल्शियम नायट्रोजी | 1 |
महाराष्ट्र बायो फर्ट | पोटेशियम सल्फेट | 1 |
धर्मराज पीक रक्षक | झिंकटेड बेंटोनाईट सल्फर | 1 |
आरएम फॉसपेट आणि केम | एसएसपी / झेन | 1 |
अमप्रा बायो बॅक्ट | ग्रेड – 2 | 1 |
सल्फर मिल्स | झीन | 1 |
प्रिव्ह लाईफ सिन्स | झीन | 1 |
निर्माण फर्टिलायझर | पीडीएम | 1 |
आरती फर्टिलायझर | एसएसपी जी | 1 |
पूर्वा केमटेक | ग्रेड – 2 | 1 |
श्रीपुष्कार केमिकल्स | एसएसपी जी | 1 |
रामा कृषी रसायन | एसएसपी झेड ॲण्ड बी | 1 |
आरपीव्ही ॲग्रो टेक | पीडीएम | 1 |
वनीता ॲग्रो केम | एनपीके १३:४०:१३ | 1 |
स्मार्ट केम टेक्नॉलाजी | एनपीके १३:४०:१३ | 1 |
ॲपक्स ॲग्रो | मोनो ऑमोनिया फॉस्पेट | 1 |
महाफिल्ड स्पेशॉलिटी फर्टी | एनपीके ५०:४०:२८ | 1 |
![Potash Fertilizer](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
ज्येष्ठ नागरिक/पालक कोर्टाचा निर्णय; निर्णय काय आहे हायकोर्टाने दिलेला निकाल