Government Schemes For Farmers
Government Schemes For Farmers गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा 75 टक्के ग्रामीण भागातील लोक असे आहे की त्यांकडे गाई आहे म्हशी शेळ्या कोंबड्या अशा खूप सारे प्राणी आहे पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाचे ठिकाण नाही शेड त्यांसाठी अवेलेबल नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाई म्हशी शेळ्या कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
बँक आधार लिंक ची स्थिती तपासा अगदी एक मिनिटात
योजनेचा उद्देश
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून.
- गाय, म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
- नागरिकांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे त्यांना अजून एक जोडधंदा सुरू करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट या योजनेचा आहे. Government Schemes For Farmers
आई वडिलांना न सांभाळणाऱ्यांची आता वारस नोंदणी होणार नाही
Government Schemes For Farmers योजनेची वैशिष्ट्ये
- गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.
- त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
- त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
- या योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाचे जे पैसे आहे ते थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे डीबीटीच्या सहाय्याने बँक खात्यामध्ये ते जमा होणार आहे. Government Schemes For Farmers
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे, अर्ज पद्धत, नियम व अटी
Government Schemes For Farmers गाय गोठा योजनेअंतर्गत मिळणारा अनुदान ?
- या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांसाठी पक्क्या गोट्यांचे बांधकाम करण्यात येईल दोन ते सहा गुरांसाठी एक मोठा गोठा बांधातील येईल.
- यासाठी 77 हजार 188 रुपये अनुदान दिले जाईल.
- जर दोन ते सहा गुरेअसतील तर त्यांसाठी गोठा बांधण्यासाठी 77 हजार 188 रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे.
- सहा पेक्षा जर जास्त गुर असतील म्हणजे बारा गुरांसाठी तर त्यासाठी याच्या दुप्पट अनुदान मिळेल.
- 12 ते 18 गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळेल गुरांकरिता 26.95 चौरस मीटर जमीन पुरेशी धरण्यात आली आहे.
- तसेच त्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी.
- आणि गोठ्यामध्ये जे गव्हाण चारा टाकण्यासाठी करणार आहोत त्याच मेजरमेंट आहे त्याच जे मोजमाप आहे ते 7.7×2 मीटर × 65 मीटर आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्र संकेत टाके बांधण्यात येतील.
- जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 लिटर क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात येणार आहे.
- सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील.
- गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांची टॅगिंग आवश्यक राहील जनावरांचे टॅग सुद्धा आवश्यक राहणार आहे.
- जर दोन ते तीन शेळ्या असतील तर त्यासाठी स्वतःच्या खर्चातून शेड बांधणे परवडणार नाही पण यासाठी सुद्धा सरकारने अनुदान जाहीर केलेला आहे अनुदानाचा फायदा घेऊ शकता.
- या योजनेअंतर्गत म्हणजे गाय गोठा योजना अंतर्गत 10 शेळ्यांना शेडबंधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान मिळणार.
- 20 शेल्यांसाठी दुप्पट आणि 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.
- शेळीसाठी बांधण्यात येणारे शेड सिमेंट व विटा लोखंडाच्या सळ्या यांच्या आधारे बांधण्यात येणार आहे.
- या योजनेअंतर्गत जर शंभर पक्षी असेल शंभर कोंबड्या असतील तर त्याची शेडची बांधणी कशी असेल.
- तर 7.75 चौरस मीटरचे पूर्ण शेड असणार आहे त्यापैकी 3.75 मीटर बाय दोन मीटर अशी या शेडची बांधणी असेल.
- लांबी कडील बाजू 30 cm व उंची 20 सेंटीमीटर जडींची विटांची जोत्यापर्यंत भिंत बांधण्यात येईल.
- तसेच छातीपर्यंत कुक्कुट जाळी 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटिमीटर च्या खांबांना आधार दिलेली असेल.
- आखूड बाजूस दोन सेंटीमीटर गाडीची सरासरी 2.20 मिटर उंचीची भिंत असेल.
- छता साठी लोखंडी किंव्हा सिमेंट पत्रांचा वापर करण्यात येईल पायासाठी मुरमाची भर घालण्यात येईल त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा एक सहा प्रमाण असलेला मजबूत थर असेल.
- पक्षांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल जर लाभार्थ्याकडे 150 पेक्षा जास्त पक्ष्यांची कोंबड्यांची संख्या असेल तर दुप्पट अनुदान मिळेल. Government Schemes For Farmers
सरकार ने पशुपालन क्षेत्र के लिए लॉन्च की अब तक की पहली ऋण गारंटी स्कीम
Government Schemes For Farmers अर्ज कोठे करावा ?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराने ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा.
- आणि वर त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन अर्ज घेऊ शकता डाऊनलोड करू शकता आणि अर्जात विचारलेले संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करायचा आहे.
- त्याबरोबर अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पोचपावती घ्या अर्ज सादर केल्यानंतर.
आवश्यक कागदपत्र ?
- आधार कार्ड,
- रेशन कार्ड,
- शेतकरी असणे आवश्यक आहे,
- अर्जदारचा पासपोर्ट आकाराचा फोटो,
- कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला,
- मतदान कार्ड,
- मोबाईल नंबर रजिस्टर असावा,
- आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर असावा,
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा,
- अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा,
- आदिवासी प्रमाणपत्र,
- जन्माचे प्रमाणपत्र,
- जातीचे प्रमाणपत्र,
- कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे,
- ज्या जागेत शेड बांधण्यासाठी अनुदान घेणार आहात त्या जागेत अर्जदाराचे सहीसह हिस्सेदार असल्याचे संमती पत्र,
- ना हरकत प्रमाणपत्र,
- ग्रामपंचायत शिफारस पत्र,
- अल्पभूधारक प्रमाणपत्र,
- अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक सरपंच व नगरसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र आवश्यक आहे,
- अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र जॉब कार्ड असणे आवश्यक आहे,
- अर्जदारांना जनावरांसाठी गोठा शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे,
- या गोठ्यामध्ये काय काय करणार आहात किती जागा आहे जनावरे किती आहे याचं अंदाजपत्रक याबरोबर जोडायचा आहे.
- हा अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नेऊन जमा करावा लागेल.
- आणि त्यानंतर त्याची पोच पावती अर्जाची पोच पावती सुद्धा घेणे आवश्यक आहे.