Vidhansabha Adhiveshan 2023
Vidhansabha Adhiveshan 2023 ‘शेतीमालाचे भाव पडतात तर कधी गगनाला भिडतात. आता टोमॅटोच्या बाबतीतही ते घडत आहे. त्यामुळे बियाण्यांची विक्री, पेरा आणि उत्पादन यांचा मेळ घालून बाजार नियमन करावे लागेल,’ असे सूतोवाच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (ता. २०) विधानसभेत केले.
![Vidhansabha Adhiveshan 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=193%2C109&ssl=1)
जिल्हा परिषद अनुदान योजना; संपूर्ण माहिती
सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला उत्तर
- Vidhansabha Adhiveshan 2023 सत्ताधारी पक्षाचे आमदार किरण लहामटे यांनी आणलेल्या २९३ च्या प्रस्तावान्वये चर्चेला उत्तर देताना मंत्री मुंडे यांनी सरकारची बाजू मांडली.
- या वेळी ‘आत्मा’ आणि ‘स्मार्ट’ यांसारख्या प्रकल्पांचे डिजिटायजेशन करून सेंटर ऑफ एक्सलन्स फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू करण्याचाही सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
- ही अभिमानास्पद गोष्ट आहे. डिजिटल युगात काही मानवी चुका असतात.
- राज्यातील ८५ लाख ८५ हजार शेतकरी पात्र आहेत. हे सर्व शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
![Vidhansabha Adhiveshan 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=192%2C108&ssl=1)
10 उत्तिर्णाना संधी!! जळगाव पोलीस पाटील भरती
Vidhansabha Adhiveshan 2023 अधिनियम दुरुस्ती अथवा कायदा याच अधिवेशनात
- कृषीनिविष्ठा आणि गुणनियंत्रणाबाबत काही प्रश्न निर्माण झाले.
- बोगस बियाणे, कृत्रीम टंचाई हे प्रकार सुरू नाहीत हे मी नाकारत नाही.
- त्यामुळे १९६६ आणि २००९ चा कापूस बियाणे नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करणारा अधिनियम अथवा नवीन बियाणे नियंत्रण कायदा याचा अधिवेशनात करू, असेही मुंडे यांनी सांगितले.
- विद्यमान कायदा सौम्य असल्याने फसवणूक होते.
- त्यामुळे कठोर कारवाई होत नाही. याच कायद्यात लिंकिंगविरोधातही कलम असेल, असेही ते म्हणाले.
![Vidhansabha Adhiveshan 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=195%2C110&ssl=1)
या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी १ लाख
मोठ्या कंपन्यांचे लिकिंग बंद करा
- Vidhansabha Adhiveshan 2023 मुंडे यांनी भाषण करताना लिंकिंग बंद करण्याबाबत सांगितले असता काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी, बड्या कंपन्या लिंकिंग करत आहेत.
- इफकोसारखी कंपनी लिकिंग करत असेल तर डीलरही तेच करणार.
- लिकिंक करणाऱ्या बड्या कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली.
- यावर शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन सुरू केली असून तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे, असे मंत्री मुंडे म्हणाले.
Emergency Alert Message 2023 : असे मॅसेज आले? सत्यता जाणून घ्या