Namo Shetkari Samman Nidhi Yojana
Namo Shetkari Samman Nidhi Yojana नमो शेतकरी सन्माननीय योजनेसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद ग्रामीण भागामध्ये सुविधांसाठी दीड हजार कोटी रुपयांचे तर 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहे.
कापसाला युरिया खताचा वापर केव्हा करावा आणि किती?
ग्रामीण भागात सुविधांसाठी इतका निधी उपलब्ध
- Namo Shetkari Samman Nidhi Yojana विविध मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता. १७) ४१ हजार २४३ कोटी २१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहे.
- यामध्ये राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली.
- राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या तीन हप्त्याची थकबाकी आणि चौथा हप्ता अदा करण्यासाठी ३ हजार ५६३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पडीक जमिनीतुनही करता येईल लाखोंची कमाई, सरकारची ही स्किम माहितेय का?
Namo Shetkari Samman Nidhi Yojana सादर केलेल्या मागण्या
- उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २०२३ – २४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
- ४१ हजार २४३ कोटींच्या पुरवणी मागणीत १३ हजार ९१ कोटी अनिवार्य खर्चाच्या २५ हजार ६११ कोटी रुपये कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या, २ हजार ५४० कोटींचा निधी हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आहे.
- या पुरवणी मागण्यांवर पुढील आठवड्यात २४ आणि २५ जुलैला चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील.
देशातील बाजारात टोमॅटो आवक कशी होतेय?
हप्ता जुलै अखेर शक्य
- Namo Shetkari Samman Nidhi Yojana पुरवणी मागणीत जल जीवन मिशन योजनेसाठी सर्वाधिक म्हणजे 5 हजार 856 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देणारी योजना घोषित केली होती.
- त्यानुसार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जुलै अखेरपर्यंत मदतीचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
- आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि जुलै अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनेचे मिळून चार हजार रुपये जमा केले जातील.
सर्व महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, असा करा अर्ज
Namo Shetkari Samman Nidhi Yojana खातेनिहाय निधी
- नगरविकास — ६ हजार २२४ कोटी
- पाणी पुरवठा आणि स्वच्छता –५ हजार ८७३ कोटी
- कृषी आणि पदुम — ५ हजार २१९ कोटी
- शालेय शिक्षण आणि क्रीडा — ५ हजार १२१ कोटी
- सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य — ४ हजार २४४ कोटी
- सार्वजनिक बांधकाम — २ हजार ९८ कोटी
- ग्रामविकास — २ हजार ७० कोटी
- आदिवासी विकास — १ हजार ६२२ कोटी
- महिला आणि बालविकास — १ हजार ५९७ कोटी
- सार्वजनिक आरोग्य — १ हजार १८७ कोटी
MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती, 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी
Namo Shetkari Yojana list 2023 :लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येणार