New Sand Policy
New Sand Policy महाराष्टातील सर्वसामान्य नागरिकघरे बांधण्याचा विचार करत असाल तर राज्य शासनाच्या माध्यमातून 50 टन वाळू एका कुटुंबास 133 रुपये टन याप्रमाणे दिली जाणार आहे. पंधरा दिवसाच्या आत ही वाळू घरपोच मिळणार आहे ही वाळू कशा पद्धतीने मिळणार आहे हा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे
![New Sand Policy](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
नवीन वाळू धोरण नोंदणी
- New Sand Policy या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे.
- नवीन धोरणानुसार एका वर्षासाठी सर्व नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास म्हणजे एक टन 133 रुपये दराने वाळू देण्यात येणार आहे.
- वाळू मिळवण्यासाठी ग्राहकांना महा खनिज या पोर्टल वर वाळू खरेदीच्या मागणीची नोंदणी करणे आवश्यक असणारं आहे.
- एका कुटुंबासाठी एका वेळेस 50 टन वाळू मिळणार आहे असे महसूल मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
- वाळूचे निलाव वेळेवर होत नसल्यामुळे वाळूचा तुटवडा निर्माण झाला होता आणि यासाठी सर्वसामान्य नागरिकांना प्रतिब्रास वाळूसाठी जास्त पैसे द्यावे लागत होते.
- वाळूच्या तुटवडा वाळूसाठी अधिकचे पैसे अवैध वाळू उपसा याला आळा घालण्यासाठी राज्य शासन नवीन वाळू धोरण घेऊन आले आहे.
![New Sand Policy](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
विहिरीला आता 2.5 लाख अनुदान, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५० अंतराची अट रद्द
- नवीन वाळू धोरणाच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना ही मदत दिली जाणार आहे.
- या धोरण नुसार ज्या ग्राहकांना वाळू लागत असेल त्यांनी महा खनीज या पोर्टल वर किंवा वेब पोर्टल वर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे.
- आणि ज्या नागरिकांना हे शक्य नाही त्यांना सेतू केंद्रामार्फत ही नोंदणी करावी लागणार आहे.
- त्यानंतर ज्या लाभार्थ्यांनी नोंदणी केली असेल त्या लाभार्थ्यांचे शुल्क जिल्हाधिकारी ठरवणार आहे.
New Sand Policy एका कुटुंबासाठी एका वेळेस 50 टन वाळू देण्यात येणार आहे.
- कारण मोबाईल ॲप नुसार वाळूची मागणी नोंदविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे एका कुटुंबास एका वेळेत जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार देण्यात येणार आहे.
- या अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर पुन्हा वाळू मागणी करता येणार आहे.
![New Sand Policy](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
शेतजमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची?
वाळू ग्राहकांना 15 दिवसात घेता येईल
- New Sand Policy ज्या ग्राहकांनी वाळू मागणीची नोंदणी केल्यापासून पंधरा दिवसाच्या आत वाळू डेपो मधून नेता येणार आहे परंतु यासाठी खर्च ग्राहकांना करावा लागणार आहे.
- ही वाळू सहाशे रुपये किंवा 133 रुपये प्रति टन आणि सहाशे रुपये ब्रास यासाठी डेपो पासून लागणारे खर्च तुम्हाला द्यावे लागणार आहे.
- आणि त्या डेपो मध्ये जी वाळू आहे त्या ठिकाणी 133 रुपये प्रति टन वाळूचा भाव द्यावा लागणार आहे.
- म्हणजे सहाशे रुपये ब्रास याप्रमाणे तिथे जाग्यावर रेट घ्यायचा आहे.
- आणि त्या ठिकाणापासून घरापर्यंत आणण्याचा भाडं स्वतःला भरावा लागणार आहे.
- वाळू डेपो मधून वाळू नेताना ग्राहकांना आधार क्रमांक देणे आवश्यक आहे.
- त्यासाठी आधार कार्ड आवश्यक असणारं आहे.
- वाळू 600 रुपयांमध्ये उपलब्ध झाल्यावर वाळूचे लिलाव बंद करण्यात येणार आहे.
- आणि त्यानुसारच डेपो तून वाळू विक्री सुरू करण्यात येणार आहे.
- सर्वसामान्य नागरिकांसाठी घराच्या किमती आवाक्यात येईल अस मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आल आहे.
Suraksha Bima Yojana 2023 प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ऑनलाइन आवेदन
Balasaheb Thakrey Aapla Dawakhana :राज्यात नवीन 700 आपला दवाखाना