Land Records Maharashtra
Land Records Maharashtra सण 1929 – 30 मध्ये झालेल्या मोजणी नंतरच्या काळात कुटुंब विभक्तीकरणामुळे तसेच जमिनीच्या हस्तांतरण व विक्रीमुळे असंख्य लहान लहान तुकडे पडत गेले. ब्रिटिश कालीन व त्यानंतरच्या काळात तग धरून असलेल्या जुन्या हद्दी व निशाण्या ह्या नाहीश्या होत गेल्या. जमिनीच्या हद्दीबाबतच्या जुन्या निशान्या क्वचितच पाहायला मिळतात याचाच परिणाम म्हणजे प्रत्येक गावात हद्दिबाबत असंख्य वाद विवाद होतांना दिसतात शासनातर्फे मात्र यावर अजून कोणतीच उपयुक्त कारवाई किंवा हालचाल झालेली दिसत नाही.
वृक्ष लागवड रोप, कलमांना ५०% अनुदान
महाराष्ट्र महसूल अधिनियम
- Land Records Maharashtra 1966 मधील कलम 132 ते 146 मध्ये जमिनीची हद्द ठरवणे व मोजणी करण्याबाबतच्या तरतुदी आहे.
- शेत जमिनीची हद्द अखून हद्द ठरविणे या बाबत तरतुदी 132 या कलमात आहे.
- तसेच 133 या कलमात गावाच्या हद्द ठरविण्याबाबत ची तरतूद आहे.
- तर कलम 134 मध्ये शेताच्या हद्दी ठरण्याबाबत तरतुदी दिलेल्या आहे.
- भूमापन करत्यावेळी जमिनीच्या किंवा धारण केलेल्या शेत जमिनीच्या हद्दीबाबत वाद नसेल आणि महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या अचूकपणाबद्दल खात्री दिली असेल.
- तर जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीने दाखवल्याप्रमाणे हद्द ठरवतात येते.
- हद्दीबाबत वाद असेल तर जमीन धारण करणाऱ्यास व शेजारील सर्व धारकांना योग्य ती नोटीस देऊन भूमापक सर्वांच्या उपस्थितीत जमिनीची मोजणी करू शकतात.
- त्यासाठी जमीन अभिलेख तपासण्या आवश्यक ठरते व त्यानुसार भोगवटाधारक शेजारील शेतकरी यांच्याकडून भोगवट्याची खात्री करून किंवा इतर पुरावा व माहिती उपलब्ध असेल त्याप्रमाणे शेतीची हद्द ठरविता येते.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे, अर्ज पद्धत, नियम व अटी
Land Records Maharashtra शेत जमिनीच्या वेड्यावाकड्या हद्दी सरळ करणे
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 137 अनुसार शेताच्या सीमा सरळ करण्यासाठीच्या अर्जावरून.
- तसेच स्वतःहून जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख अथवा त्यांची प्रतिनिधी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांनी योजना तयार करून त्याबाबतची प्रत गावातील चावडीवर लावली जाते.
- तसेच गावातून त्याबाबत काही हरकती असतील तर त्या मागवल्या जातात.
- त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यातर्फे सीमामध्ये फेरफार करताना दोन्ही बाजूंच्या नैसर्गिक भूमी रेषा व तसेच सोप्या शेतजमिनी मशागतीचा लाभ.
- आणि सीमा सरळ करताना सीमा चिन्हांमध्ये करावी लागणारी कपात याचा विचार करण्यात येतो.
- आणि याबाबत उद्भवणारी नुकसान भरपाई कायदेशीर तरतुदीनुसार वसूल करण्यात येते.
सामाईक क्षेत्र पीक विमा सहमती पत्र नमुना
बांधावरील रस्त्याच्या हक्क
- Land Records Maharashtra महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायद्यातील कलम 134 नुसार.
- शेत जमिनीचा बांध हा त्याच जमिनीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांच्या आजूबाजूच्या शेतात जाणे येण्यासाठी चा रस्ता समजला जातो.
- बांधावरील रस्त्याबाबत वाद उद्भवल्यास तहसीलदार त्या प्रकरणाबाबत सविस्तर चौकशी करून प्रकरणाबाबत निर्माण झालेले वाद सोडू शकतात.
- तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयावर अपील करता येते तसेच एक वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो.
हद्दीचे नुकसान करण्यास दंड
- हद्दीचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीस कायद्यानुसार योग्य दंड करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांचा असतो.
- स्थानिक महसूल अधिकाऱ्या द्वारे याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती पुरविली जाते.
सुकन्या समृद्धि योजनेच्या नियमांत बदल, आता या मुलीना मिळणार लाभ
Land Records Maharashtra जमीन मोजणीची प्रक्रिया (सरकारी जमीन मोजणी)
- यामध्ये सरकारी जमीन मोजणीच्या समावेश आहे तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकाऱ्यांकडून शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी.
- ज्या शेतकऱ्याला मोजणी करायची आहे त्याच्याकडून योग्य नमुन्यातील अर्ज सर्व शेजारी शेतकऱ्यांचे नाव व पत्ते व मोजणी फी भरून घेतल्या जाते.
- भूमी अभिलेख कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोजणी मध्ये साधी मोजणी, तातडीची मोजणी, अति तातडीची मोजणी, असे प्रकार आहे.
- ह्या प्रत्येक प्रकारच्या जमीन मोजणीची मोजणी फी पण वेगवेगळी आहे.
- प्रत्यक्ष मोजणीकरत्यावेळी आजूबाजूच्या सर्व जमीन धारकांनी उपस्थित राहून मोजणी सामग्री जमवणे व मोजणीसाठी मदत करणे अपेक्षित असते.
- मोजणी करताना संपूर्ण गटाची किंवा सर्वे क्रमांकाची मोजणी केली जाते.
- वरील माहिती नुसार जमिनीच्या हद्दी ठरवण्याबाबतचे कायदे याप्रमाणे असतात.
Maha Bhu Naksha 2023 :बांधाच्या लांबी रूंदीसह जमिनीचा नकाशा ऑनलाईन
Mahadbt Pipe Yojana 2023 महाडीबीडी पाईप अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरू