Crop Loan Distribution
Crop Loan Distribution पाऊस लांबल्याने पीक कर्जाचे मागणीचे प्रमाण घटले होते. परंतु मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे अशा पल्लवीत झाल्याने पीक कर्जाची मागणी वाढत असून.
![Crop Loan Distribution](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
बैंक ग्राहकों के लिए अच्छी खबर, SBI ने दी 2 बड़ी खुशखबरी?
पावसामुळे अशा पल्लवीत पीक कर्जाची मागणी वाढली?
- Crop Loan Distribution तीन महिन्याच्या काळामध्ये जिल्ह्यामधील एक लाख 11 हजार 158 शेतकऱ्यांना 853 कोटी 48 लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यामध्ये आलेले आहे.
- कर्ज वाटपाचे हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्ट त्यांच्या तुलनेमध्ये 52% इतके असून पुढील तीन महिन्यांमध्ये 48% पीक कर्ज वाटपाचे आव्हान बँके पुढे ठेवण्यामध्ये आले आहे.
- जिल्ह्यामध्ये 2023 -24 च्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत व्यावसायिक ग्रामीण आणि जिल्हा बँकांना एकूण 1640 कोटी रुपये पिके कर्ज वाटपाचे उद्दिष्टे देण्यामध्ये आले आहे.
- त्यानुसार एप्रिल पासून पीक कर्ज मागणी शेतकऱ्यांकडून होत होती एप्रिल आणि मे मध्ये असलेल्या प्रस्तावांचे छाननी करून पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्यामध्ये आली आहे.
- जूनमध्ये सुरुवातीपासूनच पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली होती.
- शेतीसाठी पीक कर्ज घ्यावे की नाही या विवंचनेमध्ये शेतकरी होते.
- पाऊस लांबल्यामुळे होणाऱ्या मागणीत घट झाली परंतु काही बँका वगळता इतर सर्व बँकांनी तात्पुरतेने पीक कर्ज वाटपाच सुरुवात केली आहे.
- 30 जून पर्यंत 853 कोटी 48 लाख रुपयांची पीक कर्ज वाटप करण्यामध्ये आले असून.
- याचे प्रमाण 52% असून जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रचा यांनी सांगितलेले आहे.
![Crop Loan Distribution](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पीक विमा भरा फक्त १ रुपयात, असा भरा ऑनलाईन फॉर्म
Crop Loan Distribution या बँकांकडून 13 ते 17 टक्के पिक कर्ज वाटप
- यामध्ये डीसीबी बँकेने दोन कोटी 25 लाख रुपये,
- युनो बँकेने एक कोटी 74 लाख रुपये,
- पंजाब नॅशनल बँकेने एक कोटी,
- आयसीआयसीआय बँकेने सात कोटी 66 लाख रुपये,
- बँक ऑफ इंडियाने पाच कोटी छप्पन लाख रुपये,
- एचडीएफसी बँकेने आठ कोटी चाळीस लाख रुपये,
- आयडीबीआय बँकेने पाच कोटी 89 लाख रुपयांचे पिक कर्ज वाटप केलेले आहे,
- उद्दिष्टच्या तुलनेमध्ये युनो व डीसीबी वगळता अन्य बँकाकडून वाटपांचे प्रमाण १३ ते १७ टक्के देण्यात आले आहे.
![Crop Loan Distribution](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पुढील चार दिवस राज्यात जोरदार पाऊस
या बँकांचा परफॉमर्न्स खालावला
- 1)
- Crop Loan Distribution युनियन बँकेने 45 शेतकऱ्यांना 85 लाखांचे वाटप केले आहे,
- आरबीएल ने दहा शेतकऱ्यांना 85 लाखांचे वाटप केले,
- दोन्ही बँकांच्या कर्ज वाटपाचे प्रमाण उद्दिष्टांच्या तुलनेमध्ये 9% आहे,
- ॲक्सिस बँकेने सत्तावीस शेतकऱ्यांना एक कोटी दहा हजार चे कर्ज वाटप करण्यात आले असून वाटपाचे प्रमाण पाच टक्के आहे.
- 2)
- कॅनराच्या दोन आणि सेंट्रल बँकांच्या चार शाखा मधून एक कोटी ६५ लाखांचे कर्ज वाटप आतापर्यंत झाले आहे,
- या बँकांच्या वाटपाचे प्रमाण केवळ तीन टक्के आहे,
- महत्वाचं म्हणजे कोटक महिंद्रा बँकेने तीन कोटींचे उद्दिष्टे असताना अद्यापपर्यंत एक रुपयाचेही पीक कर्ज वाटप केले नसल्याची बाब शासनाच्या दृष्टीमध्ये करण्यात आली आहे.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
दूध उत्पादकांना दिलासा, असे ठरणार दुधाचे दर
Crop Loan Distribution या बँकांकडून सर्वाधिक पीक कर्ज वाटप
- महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 51 शाखा मधून 45 हजार तीनशे पाच शेतकऱ्यांना 343 कोटी 24 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यामध्ये आले आहे हे प्रमाण 82 टक्के आहे.
- एसबीआयच्या 42 शाखांमधून 20 हजार 317 शेतकऱ्यांना 204 कोटी 44 लाख रुपयांचे एक कर्ज वाटप करण्यात आले असून हे प्रमाण 55% इतके आहे.
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 37 हजार 711 शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप केले आहे.
- उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण 48% एवढे आहे.
- बँक ऑफ बडोदाच्या 5 शाखा मधून 2 हजार 526 शेतकऱ्यांना 35 कोटी 82 लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आले असून याचे प्रमाण 60% एवढे आहे.
- तर शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारे राज्यांमधील या काही बँका द्वारे शेतकऱ्यांना आवश्यक असलेले पीक कर्जे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे.
- जर पिक कर्जाची आवश्यकता असेल तर तुम्ही सुद्धा या बँकाकडून लवकरात लवकर पीक कर्ज घेऊ शकता.
MSEB Electrical Accident 2023 आला पावसाळा! विद्युत अपघाताचे धोके टाळा, ही सुरक्षा घ्या