Saur Krushi Vahini Yojana 2023
Saur Krushi Vahini Yojana 2023 या नव्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 75000 ऐवजी एक लाख 25 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. आणि त्यात दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ ही केली जाणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा {लोन} योजना ऑनलाइन आवेदन?
योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनी
- Saur Krushi Vahini Yojana 2023 या योजनेसाठी शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातील जमिनीचा वापर करण्यात येणार आहे.
- त्यातून शेतकऱ्यांना नियमितपणे उत्पन्नाचे संधीही मिळत आहे.
- महावितरणाच्या वीज वितरण उपकेंद्रापासून पाच किलोमीटरच्या आतील अंतरावरील शेतकरी या योजनेत आपली जमीन देऊ शकतात.
- आणि वर्षाला सव्वा लाख रुपये भाडे घेऊ शकतात.
- किमान तीन आणि अधिकाधिक 50- एकर पर्यंत जमीन शेतकऱ्यांना सौर ऊर्जेसाठी भाड्याने देता येणार आहे.
- उपकेंद्रापासून जवळील जमिनीला योजनेत प्राधान्य असणार आहे.
- या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना पंधरा लाख रुपयांचे अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.
- बऱ्याच जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी जमीन या योजनेसाठी देण्याचे प्रस्ताव दाखल केले आहे.
पशुपालकांसाठी वैरण व पशुखाद्य विकासाच्या ६ योजना
Saur Krushi Vahini Yojana 2023 परिमंडळात इतका प्रस्ताव आला आहे.
- सौर ऊर्जा प्रकल्पासाठी महावितरणाच्या लातूर परिमंडळातून शासन आणि शेतकऱ्यांचे एकूण 4548 एकर जमिनीचे प्रस्ताव दाखल झाले आहे.
- परिमंडळात लातूर बीड आणि धाराशिव जिल्हांचा समावेश आहे.
- यामध्ये लातूर जिल्ह्यातून 39 शेतकऱ्यांची 429 एकर तर 60 ठिकाणची 858 एकर शासकीय जमीन.
- आणि बीड जिल्ह्यातून 30 शेतकऱ्यांची 425 तर 64 ठिकाणची 1118 एकर शासकीय जमीन.
- आणि धाराशिव जिल्ह्यातून 18 शेतकऱ्यांचे 460 तर 102 ठिकाणचे 1258 एकर शासकीय जमीन महावितरणाला सौर ऊर्जा निर्मितीसाठी देऊ केली आहे.
- Saur Krushi Vahini Yojana 2023 या अभिनव योजना अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान मुख्य अभियंता यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
- अशा प्रकारे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 या नवीन योजनेसाठी जमीन भाड्याने देणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक एक लाख 25 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे.
- तसेच या रकमेमध्ये दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ ही केली जाणार आहे.
Online Pik Vima 2023 :असा भरा 1 रुपयात पीक विमा योजनेचा अर्ज