What is Credit card क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड म्हणजे काय असतं याचा नेमका उपयोग काय किंवा हे काम कसं करतो क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्यांचा यात फायदा कसा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रेडिट कार्ड घ्यावं की नाही तसंच याचे फायदे आणि तोटे काय आहे क्रेडिट कार्ड म्हणजे काय कुठलीही खरेदी करता तेव्हा एकतर रोख पैसे देतो किंवा डेबिट कार्ड वापरता म्हणजे ते मशीन मध्ये स्वाईप करतो किंवा आता नवीन प्रकारही यूपीआय म्हणजे गुगल पे फोन पे इत्यादी पण या सगळ्यात बँकेतले पैसे ताबडतोब कापले जातात.
What is Credit card क्रेडिट कार्ड हे एक असं कार्ड असतं ज्याचा उपयोग करून बँक खात्यातले पैसे खर्च न करता एखादी गोष्ट खरेदी करू शकता आणि त्याचे पैसे त्यावेळी बँक देते आणि काही दिवसानंतर ते पैसे बँकेला परत द्यायचे असतात आणि मुख्य म्हणजे बँक यावर कुठलेही व्याज आकारत नाही.