Maharashtra Land Right Proofs
Maharashtra Land Right Proofs जमिनीच्या मालकी हक्काचे वाद सुर असल्याचा दिसून येत तर राज्यभरात असे हजारो खटलेही प्रलंबित आहे त्यामुळे जी जमीन करतो किंवा ज्या जमिनीवर स्थावर मालमत्ता घर किंवा व्यवसायाची इमारत आहे ती जमीन मालकीची आहे हे पटवून देण्यासाठी काही पुराव्यांच जतन करून ठेवणं गरजेचं असतं असे नेमके कोणते सातपुरावे आहे त्याची माहिती जाणून घ्या.
![Maharashtra Land Right Proofs](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/05/image2-773x1024-1.jpg?resize=215%2C285&ssl=1)
खरेदी खत
- Maharashtra Land Right Proofs ज्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो त्यांना जमिनीच्या मूलमालक सिद्ध करण्यासाठी खरेदीखत अवश्य असतो.
- खरेदीखत एक सरकारी कागदपत्र असत खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो या खरेदी खातात काय असतं.
- तर ज्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार होणार आहे ती दोन व्यक्तींची नावे अणि किती तारखेला किती क्षेत्रावर आणि किती रुपयांमध्ये तो व्यवहार झाला याची सविस्तर माहिती दिली असते.
- आता सरकारने 1985 पासून चे खरेदीखत आणि जुने दस्त ऑनलाइन उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
Maharashtra Land Right Proofs सातबारा उतारा
- सातबारा उताऱ्यात दोन गाव नमुने असतात एक गाव नमुना सात आणि गाव नमुना 12 गाव नमुना सात मध्ये जमिनीच्या मालका विषयाची माहिती दिली असते तर गाव नमुना बारामध्ये पिकांची नोंदवही असते म्हणजे त्या जमिनीवर कोणते पिकं घेतल्याची माहिती दिली असते.
- आता गाव नमुना 7 आहे त्यात भोगवटाधाराची पद्धत नमूद केली असते म्हणजेच भुधरणापद्धत दिलेली असते.
- यावरून जमिनीचा खरा मालक कोण याची ओळख होते त्या भूधारणापद्धती चार प्रकार पडतात.
- भोगवटादार 1
- अशा प्रकारच्या जमिनी येतात, त्याच हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात शेतकरी त्या जमिनीचा मालक असतो.
- भोगवटादार 2
- जमिनीचा हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध असतात सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचा हस्तांतरण करता येत नाही.
- भोगवटादार 3
- सरकारी प्रवर्गात मोडणाऱ्या जमिनी येतात या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.
- भोगवटादार 4
- सरकारी पट्टेदार या जमिनी येतात यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनी असतात.
- या जमिनी 10,30,50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिले जातात.
- सरकारने गेल्या काही वर्षांपासून डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे दरवर्षी नवीन अपडेट सातबारा उतारा काढणं सोयस्कर ठरतं.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
खाते उतारा आणि 8 अ
- Maharashtra Land Right Proofs एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असते या सगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली जमीन एकत्रितपणे 8 अ आल्यावर नमूद केली असते.
- आठ उताऱ्यामुळे एखाद्या गावात मालकीची जमीन कोण कोणत्या गटात आहे त्याची माहिती मिळते.
- त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी आठचा उतारा किंवा खाते उतारा हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
- महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने एक ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरीचा 8 अ उतारा देण्यास सुरुवात केली आहे.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
जमिनीचे मोजणी नकाशे
- एखाद्या जमिनी संदर्भात जर का वाद उद्भवल्यास आणि त्यावेळी जर जमिनीचा नकाशा असल्यास त्या जमिनीवर मालकी हक्क प्रस्थापित करू शकता.
- त्यामुळे जमिनीचे मोजणीचे नकाशे जपून ठेवणं गरजेचं असत.
- एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती या नकाशाद्वारे मिळते.
- तसेच शेताला लागून कोणता गट क्रमांक आहे म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याची जमीन आहे याची माहिती दिली असते.
- त्यामुळे गट नकाशा किंवा शेताच्या नकाशा जमिनीचा नकाशा हा जमिनीच्या मालकी हक्काचा महत्वाचा पुरावा ठरतो.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
जमीन महसुलाच्या पावत्या
- दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यांमार्फत महसूल भरल्याची पावती केली जाते.
- या पावत्या जपून ठेवल्या तर याचा जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.
जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले
- मालकीची जमीन असेल आणि त्या जमिनीवर एखादी केस किंवा खटला चालू असेल तर त्या केस संदर्भातली कागदपत्र जबाबदाच्या प्रती आणि निकाल पत्र जपून ठेवणं गरजेचं असतं.
- वेळप्रसंगी किंवा काही अडचण आल्यास ही सगळी कागदपत्र जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून किंवा त्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा ठोकण्यासाठी पुरावा म्हणून वापरता येतो.
![Jeevan Umang Table](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
प्रॉपर्टी कार्ड
- बिगर शेतजमीन क्षेत्रावर जर प्रॉपर्टी असेल किंवा घर व्यवसायाची इमारत असेल तर मालकीची हे सिद्ध करणारा महत्त्वाचा सरकारी पुरावा किंवा कागद.
- प्रॉपर्टी काढून त्या प्रॉपर्टी कार्डवर बिगर शेत जमीन क्षेत्रात किती क्षेत्रावर कोणत्या व्यक्तीची इमारत आहे घराची किंवा व्यवसायाची याची माहिती दिली असते.
- त्यामुळे बिगर शेत जमीन क्षेत्रातील स्थावर मालमत्तेचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी कार्ड महत्त्वाचा ठरतो.
- या व्यतिरिक्त जर बिगर शेत जमीन क्षेत्रात घर असेल तर घरपट्टी भरल्याच्या पावत्याही जपून ठेवू शकता वेळप्रसंगी त्यांचाही पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.
Best Government Schemes 2023 :अपंग विधवा आणि कुटुंबासाठी कल्याणकारी योजना
3 Responses