Mahila sanman
Mahila sanman 2023 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दिनांक ३१ मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यास या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी दिनांक ३१ मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत/ गट ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यास या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात येत आहे.
सदर पुरस्कार हा दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी देण्यात यावा.
सदर पुरस्काराचे स्वरूप, पात्रता निकष, पुरस्कारार्थी महिलेची निवड करण्याची कार्यपध्दती व यंत्रणा खालीलप्रमाणे राहील
Mahila sanman 2023 पुरस्काराचे स्वरुप
- १) सन्मानपत्र
- २) सन्मानचिन्ह
- ३) शाल व श्रीफळ (नारळ)
- ४) रोख रक्कम (रु. ५****/- प्रती महिला)
Property Rights :पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का?
Best Education For Children 2023 :मुलांना शाळेत टाकन्याअगोदर हे नक्की पहा
9 Responses