Crop Insurance 2023
Crop Insurance 2023 जून जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांचे तसेच शेतजमिनीचे जे नुकसान झाले होते त्या नुकसान याची भरपाईची मदत आता शासनाकडून देण्यात आलेली आहे त्याबाबत शासनाकडून अधिकृत जीआर काढण्यात आला आहे आहे त्या जी आर ची लिंक खाली दिलेली आहे त्याठिकाणी जी पाहू शकता. हा जी आर 3 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाकडून शासन मार्फत काढण्यात आला आहे यामध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच १०७१ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी शासन मार्फत मंजूर करण्यात आलेली आहे.
PM आवास योजना 2023, प्रत्येकाला मिळणार पैसे, 2 नवीन नियम लागू
कोण कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे
- Crop Insurance 2023 जून जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांच्या शेतजमिनीच्या नुकसानी करिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जीआर आहे. पावसाळी हंगाम 2023 आदेश क्रमांक एकनुसार हा जीआर काढण्यात आला आहे.
- अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
- तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीं करिता इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते.
- शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक सी एल एस 2022 प्र.क्र. 349 म. दिनांक 27-3- 2023 अन्वय अतिवृष्टी पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसान करिता व इतर नुकसानी करिता बाधित त्यांना मदत प्रदान करण्यास शासनाचे मान्यता देण्यात आली आहे.
- विभागीय आयुक्त अमरावती व औरंगाबाद यांकडून जून ते जुलै 2023 या महिन्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी अनुक्रमे दिनांक 30-8-20123 व दिनांक 31-8-2023 च्या पत्रांवर निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे.
👉 📑 जी आर पाहण्यासाठी क्लिक करा
Crop Insurance 2023 शासन निर्णय
- जून ते जुलै 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता,
- राज्य आपत्ती प्रदेशात निधीमधून संदर्भातील क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी एकूण 1071 कोटी 77 लाख हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.
- जून जुलै 2023 मध्ये शेती पिकांच्या जमिनीचे झालेला नुकसानिक्रेता वितरित करावयाच्या लेखाशिर्ष निहाय तपशील या तक्त्यामध्ये सगळं तपशील देण्यात आलेला आहे जी आर पाहण्यासाठी वर लिंक दिलेली आहे.
शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा कधी मिळणार
हे 11 जिल्हे पात्र असणार
- Crop Insurance 2023 अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, आणि लातूर अशाप्रकारे या 11 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- अशा प्रकारे आता जून जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांचे तसेच शेत जमिनीचे जे नुकसान झाले होते त्या नुकसानीच्या भरपाईसाठी आता शासनाकडून मदत वितरित करण्यात आली आहे.
- आणि ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वर जी आर ची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता.
3 लाख किसानों पर बोझ बना कर्ज, अब माफ करने जा रही सरकार, लिस्ट में चेक करें अपना नाम