September Rain
September Rain हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मुर्तीजे महापात्रा यांनी सप्टेंबर चा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड दिला त्यामुळे सहाजिक शेतकऱ्यांच लक्ष हवामान विभागाच्या अंदाजाकडे होतं.
‘या’ योजनेत 2 कोटी महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; जाणून घ्या कसा होईल फायदा?
हवामान विभागाने दिलेला अंदाज
- September Rain हवामान विभागाच्या अंदाजाने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढवली आहे.
- हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी 91 ते 109% पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
- पण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाजही दिला आहे.
- ऑगस्ट च्या शेवटी आयोडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल सक्रिय झाला.
- आयोडी नेमका काय आणि त्याचा मान्सूनच्या पावसाची काय संबंध आहे.
- आयओडी सक्रिय झाल्याने देशात सप्टेंबर महिन्यात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे असं हवामान विभागाने स्पष्ट केला आहे.
- सप्टेंबर महिन्यात ईशान्य भारत पूर्व भारताच्या शेजारील भाग हिमालयाच्या पायथ्याच्या अनेक भागात तसेच पूर्व मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या काही भागात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मधमाशी पालन योजनेसाठी अर्ज सुरु
September Rain या ठिकाणी कमी पावसाचा अंदाज
- तर देशाच्या इतर भागात सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
- महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आणि तामिळनाडू, या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
- देशात ऑगस्ट महिन्यात गेल्या 122 वर्षातील सर्वात कमी पाऊसमान होतं असेही हवामान विभागाने या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं आहे.
- ऑगस्ट महिन्यात पूर्व उत्तर प्रदेश बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तर पश्चिम बंगाल, केरळ, लक्षद्वीप, कर्नाटका, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.
- तर इतर विभागांमध्ये सरासरी पाऊस पडला असं हवामान विभागाने सांगितल आहे.
- ऑगस्ट महिन्यात देशात सरासरीपेक्षा 36 टक्के कमी पाऊस झालाय मध्य भारतात सरासरीच्या तुलनेत 47% कमी पाऊस झाला.
September Rain
- तर दक्षिण भारतातील पाऊस सरासरीपेक्षा 60% कमी पडला.
- एक जून ते 31 ऑगस्ट या काळात देशात सरासरी पेक्षा दहा टक्के कमी पाऊस पडला आहे असेही हवामान विभागाने सांगितल आहे.
- मान्सून हंगामातील आत्तापर्यंत पावसाचा विचार करता देशात दहा टक्के तूट झाली आहे.
- दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 10% कमी पाऊस पडला आहे.
- तर मध्य भारतातील पाऊसमान दहा टक्क्यांनी कमी आहे असेही हवामान विभागणी या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितल आहे.
- राज्यात आतापर्यंत पावसाची मोठी तुट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा होती पण सप्टेंबर महिन्यातही सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार आहे.
- असा अंदाज दिल्याने आता शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढली आहे.
- ही सगळी माहिती होती हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या प्रेस कॉन्फरन्स वर.
गावठाण मालमंत्ता रजिस्ट्री [दस्त नोंदणी] महसूलची NOC आवश्यक